दलाल स्ट्रीटवर (Dalal Street) होळीचा जल्लोष
जितेश सावंत, मुंबई : गेल्या आठवड्यात भारतीय बाजारांनी सकारात्मक संकेतांच्या जोरावर ४ टक्के वाढीसह विजयी सिलसिला सुरू ठेवला याची प्रमुख कारणे,रशिया आणि युक्रेन यांच्यामधील शांतता चर्चेतील प्रगती , कच्च्या तेलाच्या किमतीतील घसरण तसेच १० आठवड्यांनंतर परदेशी संस्थात्मक गुंतवणूकदारांची (FIIs) खरेदी.व फेडचा 25bps ने दर वाढवण्याचा बाजाराला अनुकूल असा निर्णय. डॉलरच्या तुलनेत भारतीय रुपया देखील वधारला. या सगळ्याचा एकत्रित परिणाम बाजारावर दिसला.
७ मार्च रोजी सेन्सेक्सने ७ महिन्यांच्या नीचांकी पातळी गाठली होती. त्यात विक्रमी उच्चांकापासून १६ टक्क्यांनी घट झाली होती. १५मार्च वगळता, ८ सत्रांमध्ये सेन्सेक्समध्ये ५००० हून अधिक अंकांची वाढ झाली आहे.व या कालावधीत निफ्टी मध्ये १,४०० हून अधिक अंकांची वाढ झाली आहे.
परदेशी संस्थागत गुंतवणूकदारानी (FII) १७ मार्च रोजी संपलेल्या आठवड्यात १,६८५. ८७ कोटी रुपयांच्या समभागांची खरेदी केली.
निफ्टीकरिता १६,८००-९०० हा खालचा स्तर महत्वाच्या राहील निफ्टी १७,५०० चा वरचा स्तर गाठण्याचा प्रयत्न करेल.ReadAlso-अनुकूल संकेतांमुळे भांडवली बाजारात (Stock Market) वाढ.
सलग पाचव्या दिवशी तेजी. Market extends winning streak for fifth day
बाजाराची आठवड्याची सुरुवात चांगली झाली . सेन्सेक्स-निफ्टी सलग पाचव्या दिवशी हिरव्या चिन्हात बंद होण्यात यशस्वी झाले.एफआयआयची विक्री आणि कच्च्या तेलाच्या किमती यात घट झाल्याने बाजारात खरेदी परतली. रशिया-युक्रेनच्या बाबतीत होत असलेल्या राजनैतिक प्रगतीमुळे ही प्रक्रिया यापुढेही सुरू राहील व भारतीय बाजारपेठा तुलनेने चांगली कामगिरी करताना दिसतील या अपेक्षेने बाजारात सकारात्मकता दिसली. जगभरातील गुंतवणूकदार व्याजदरात वाढ होणार या तयारीत आहेत. तसेच भारतातही WPI मध्ये वाढ झाली पण बाजाराने त्याला फारसे महत्त्व दिले नाही व सेन्सेक्सने ९०० अकांची उसळी घेतली. सोमवारच्या कामकाजात बँकिंग, ऑटो आणि आयटी समभागात खरेदी झाली, तर रियल्टी, फार्मा आणि मेटलमध्ये नफावसूली दिसून आली. दिवसभराच्या अखेरीस सेन्सेक्स ९३५ अंकांनी वधारून ५६,४८६ वर बंद झाला. दुसरीकडे, निफ्टीने २४० अंकांनी वाढ घेऊन १६,८७१ चा बंददिला.
पाच दिवसांची तेजी थांबली,सर्वांच्या नजरा फेडच्या बैठकीकडे. Market snaps five-day winning run, all eyes on Fed meeting
मंगळवारी ५ दिवसांची तेजी थांबल्याचे दिसून आले सेन्सेक्स-निफ्टी १ टक्क्यांहून अधिक घसरून बंद झाले. संमिश्र जागतिक संकेतांमुळे बाजाराची सुरुवात सकारात्मकतेने झाली परंतु सर्व नफा गमावून बाजार नकारात्मक क्षेत्रात गेला. वाहन वगळता सर्वच क्षेत्रात विक्री झाली .दुपारनंतर बाजारात विक्रीचा दबाव वाढला . कारण चीनमध्ये कोविड-१९ ची सतत वाढत जाणारी रुग्णसंख्या याशिवाय रशिया आणि युक्रेनमध्ये सुरू असलेले युद्ध आणि यूएस फेडची आगामी बैठक यामुळे बाजारात अनिश्चिततेचे वातावरण पसरले . शेवटच्या ट्रेडिंग तासात बाजारात थोडी रिकव्हरी झाली असली तरी अखेरीस मार्केट लाल चिन्हाने बंद झाले.दिवसभरात सेन्सेक्समध्ये १,००० अंकांची घसरण झाली. दिवसभराच्या अखेरीस सेन्सेक्स७०९ अंकांनी घसरून ५५,७७६ वर बंद झाला. दुसरीकडे, निफ्टीने २०८अंकांनी घसरून १६,६६३ चा बंददिला.
बाजारात तेजी परतली, फेडच्या निर्णयापूर्वी निफ्टी १६,९०० च्या वर बंद. Market stages smart rebound
बुधवारी बाजाराने सारी कसर भरून काढली.भारतीय बाजारांमध्ये एक स्मार्ट रिकव्हरी दिसून आली आणि मागील ट्रेडिंग सत्रातील संपूर्ण घसरण भरून काढली. चौफेर खरेदीमुळे सेन्सेक्स-निफ्टी सुमारे २ टक्क्यांच्या वाढीसह बंद झाले. बाजाराची सुरुवात गॅप-अप ओपनिंगने झाली आणि दिवसभर बाजारात सकारात्मकता कायम होती. वॉल स्ट्रीटकडून मिळालेल्या सकारात्मक संकेतामुळे भारतीय बाजारात जोरदार उसळी पाहायला मिळाली. तसेच कच्च्या तेलाच्या किमतीतील नरमता व रशिया आणि युक्रेनसोबतच्या शांतता चर्चेतील प्रगतीच्या बातम्यां आल्यानेही बाजारातील उत्साह वाढला. दिवसभराच्या अखेरीस सेन्सेक्स १,०३९ अंकांनी वधारून ५६,८१६वर बंद झाला. दुसरीकडे, निफ्टीने ३१२ अंकांनी वाढ घेऊन १६,९७५ चा बंददिला.
दलाल स्ट्रीट वर होळीचा जल्लोष, सेन्सेक्स १,०४७ अंक वधारला. Holi cheer for D-St; Sensex up 1,047
गुरुवारी बाजाराची सुरुवात दमदार झाली. गॅप अप ओपनिंग झाल्यानंतर संपूर्ण दिवस बाजारात तेजीचा जोर होता. कच्च्या तेलाच्या किमती घसरल्याने, रशिया-युक्रेन चर्चेतील प्रगती आणि FII खरेदीमुळे बाजार चांगलाच वधारला तसेच US FED चा निर्णय अंदाजानुसार जाहीर झाल्याने निफ्टी-सेन्सेक्स दोन्ही अडीच टक्क्यांहून अधिक वाढले. BULLS नी बाजारात मोठ्या उत्साहात होळी साजरी केली. बाजारात चौफेर खरेदी झाली. दिवसभराच्या अखेरीस सेन्सेक्स १,०४७ अंकांनी वधारून ५७,८६३ वर बंद झाला. दुसरीकडे, निफ्टीने ३११ अंकांनी वाढ घेऊन १७,२८७ चा बंद दिला. ReadAlso-भांडवली बाजाराने ( Stock Market) गाठला सात महिन्याचा खालचा स्तर
(लेखक शेअर बाजार तज्ञ, तसेच Technical and Fundamental Analyst आहेत.) jiteshsawant33@gmail.com