प्रगत शेतीसाठी डिजिटल तंत्रज्ञान …

 प्रगत शेतीसाठी डिजिटल तंत्रज्ञान …

परभणी, दि. 17 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : डिजिटल तंत्रज्ञानाने मानवाचे जीवन व्‍यापले असून शेती क्षेत्रातही डिजिटल तंत्रज्ञानाचा वापर वाढणार आहे. भविष्‍याचा वेध घेऊन डिजिटल शेती Looking to the future of digital agriculture करिता लागणारे मनुष्‍यबळ निर्मितीवर परभणी कृषि विद्यापीठ भर देत आहे. या प्रकल्‍पाच्‍या माध्यमातून विविध प्रशिक्षण कार्यक्रम, कार्यशाळा आदीचे आयोजन करण्‍यात येत आहे. हे डिजिटल तंत्रज्ञान कौशल्‍य व ज्ञान कृषिचे विद्यार्थी व विद्यापीठ शास्‍त्रज्ञांनी अवगत करून कृषि संशोधनात याचा समावेश करण्‍याचे आवाहन अध्यक्षीय भाषणात कुलगुरू मा डॉ अशोक ढवण यांनी केले.

वसंतराव नाईक Vasantrao Naik मराठवाडा कृषि विद्यापीठातील नवी दिल्‍ली येथील भारतीय कृषि अनुसंधान परिषद पुरस्‍कृत राष्‍ट्रीय कृषि उच्‍च शिक्षण प्रकल्‍प (नाहेप) च्‍या वतीने दिनांक १४ ते १६ मार्च दरम्‍यान शेती स्‍वयंचलनातील प्रगत डिजिटल तंत्रज्ञान यावर आंतरराष्‍ट्रीय कार्यशाळेचे आयोजन करण्‍यात होते, या कार्यशाळेच्‍या समारोपीय कार्यक्रमात ते बोलत होते. प्रमुख पाहुणे म्हणून अकोला येथील डॉ पंजाबराव देशमुख कृषि विद्यापीठाचे माजी कुलगुरू मा डॉ व्‍ही एम मायंदे आणि अहमदाबाद येथील इस्‍त्रो – अंतराळ उपयोग केंद्राचे अंतराळ शास्‍त्रज्ञ मा डॉ बिमल कुमार भट्टाचार्य यांची ऑनलाईन पध्‍दतीने उपस्थिती होती. तर व्‍यासपीठावर आयआयडी खरगपुर येथील शास्‍त्रज्ञ डॉ अलोक कांती देब, प्राचार्य डॉ उदय खोडके, कुलसचिव डॉ धीरजकुमार कदम, नाहेप प्रकल्‍प मुख्‍य अन्‍वेषक डॉ गोपाल शिंदे, आयोजन सचिव डॉ कैलास डाखारे आदींची प्रमुख उपस्थिती होती.

मार्गदर्शनात डॉ व्‍ही एम मायंदे म्‍हणाले की, विदेशात कृत्रिम बुध्‍दीमत्‍ता, ब्‍लॉकचेन तंत्रज्ञान, इंटरनेट ऑफ थिंग्‍ज आदी डिजिटल तंत्रज्ञानाचा मोठया प्रमाणात वापर होत आहे, भारतासारख्‍या शेतात अल्‍ पभूधारक शेतक-यांची संख्‍या जास्‍त आहे, त्‍यांना किफायतीशीर डिजिटल तंत्रज्ञान विकसत करावे लागेल. यासाठी परभणी कृषि विद्यापीठाने नाहेप प्रकल्‍पाच्‍या माध्‍ यमातून पुढाकार घेतला आहे. . For this, Parbhani Agricultural University has taken initiative through Nahep project मराठवाडयात मुख्‍य पीक उत्‍पादकतेता स्थिरता आली असून भविष्‍यात डिजिटल तंत्रज्ञानाच्‍या आधारेच ही उत्‍पादकता वाढीस मदत होईल. डिजिटल तंत्रज्ञानाने कमीतकमी शेती निविष्ठांचा कार्यक्षम वापर करून पीक उत्‍पादनात शाश्‍वत वाढ करणे शक्‍य होईल, अशी आशा त्‍यांनी व्‍यक्‍त केली.भाषणात मा डॉ बिमल कुमार भट्टाचार्य यांनी डिजिटल शेतीत डाटा विज्ञानाचे महत्‍व असून कृषि शास्‍त्रज्ञांनी त्‍यावर काम करण्‍याची गरज असल्‍याचे ते म्‍हणाले .

डॉ अलोक कांती देब यांनी पदव्‍युत्‍तर विद्यार्थ्‍यांनी कार्यशाळेत प्राप्‍त केलेल्‍या डिजिटल तंत्रज्ञान बाबतच्‍या कौशल्‍य व ज्ञानाचा उपयोग पदव्‍युत्‍तर संशोधनात करण्‍याचे आवाहन केले. कार्यक्रमात सहभागी विद्यार्थी, शास्‍त्रज्ञ व प्राध्‍यापकांना मान्‍यवरांच्‍या हस्‍ते प्रमाणपत्र वितरित करण्‍यात आले. कार्यक्रमात आयोजन सचिव डॉ कैलास डाखोरे यांनी कार्यशाळेचा कार्यवृत्‍तांत मांडला तर प्रकल्‍प मुख्‍य अन्‍वेषक डॉ गोपाल शिंदे यांनी प्रास्‍ताविक केले. सुत्रसंचालक डॉ विणा भालेराव यांनी केले.

या तीन दिवसीय कार्यशाळेत शेतीचे स्‍वयंचलिकरण, कृषि यंत्रमानव, कृषि ड्रोन, शेतीत इटरनेट ऑफ थिंग्‍सचा वापर, कृत्रिम बुध्‍दीमत्‍ता, माहिती तंत्रज्ञानाचा शेतीतील उपयोग, अन्‍न प्रक्रियेतील स्‍वयंचलिकरण, स्‍वयंचलित शेतीयंत्र आदी विषयावर  अमेरिका, फिलिपाईन्‍स तसेच देशातील नामांकित संस्‍थेतील शास्‍त्रज्ञांनी मार्गदर्शन केले. कार्यशाळेत विद्यापीठातील प्राध्‍यापक, शास्‍त्रज्ञ व विद्यार्थी कार्यशाळेत सहभागी झाले होते.Digital technology for advanced farming …

ML/KA/PGB

17 Mar 2022

mmc

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *