आर्थिक वर्षाच्या शेवटच्या दिवशी बाजाराची (Stock Market) धमाकेदार तेजी

 आर्थिक वर्षाच्या शेवटच्या दिवशी बाजाराची (Stock Market) धमाकेदार तेजी

दि. १, जितेश सावंत (एमएमसी न्यूज नेटवर्क) : आर्थिक वर्ष 2023 मधील अंतिम आठवड्याचा शेवट दमदार झाला. सुरवात देखील एकदम सकारात्मक झाली होती. 31 मार्च रोजी संपलेल्या आठवड्यात तीन आठवडे सुरु असलेल्या विक्रीला ब्रेक लागताना दिसला.रिझव्‍‌र्ह बँकेकडून व्याजदर आणखी वाढतील या अपेक्षेने गुंतवणूकदार काहीसे सावध राहिले होते परंतु आश्वासक जागतिक संकेत,F&O एक्सपायरी,FII ची खरेदी,आणि बँकिंग क्षेत्राच्या कामगिरीबद्दलची चिंता कमी झाल्याने आठवड्यात निर्देशांकात 2 टक्क्यांहून अधिक वाढ झाली. Indian equities signed off with an over 1.5% surge in the final session of the week and financial year.

सरत्या आर्थिक वर्षात सेन्सेक्स 0.70 टक्क्यांनी मजबूत झाला तर निफ्टीत 0.60 टक्क्यांची घसरण झाली. वर्ष 2023 मध्ये बाजाराने गुंतवणूकदारांची निराशा केली.आर्थिक वर्ष 2022-23 मध्ये ब्लूचिपच्या तुलनेत लहान शेअर्सना अधिक फटका बसला. जगभरातील मध्यवर्ती बँकांनी व्याजदरात केलेली वाढ,, मोठी चलनवाढ आणि रशिया-युक्रेन युद्ध यामुळे छोट्या कंपन्यांच्या शेअर्समध्ये घसरण पहावयास मिळाली. Foreign institutional investors were net sellers of Indian equities for the second consecutive financial year. Indian equities managed the gains in FY23, primarily because of the backing of domestic institutional investors

आर्थिक वर्ष 2023 मध्ये 40 आयपीओ लाँच करण्यात आले होते. त्यापैकी एलआयसी सर्वात वाईट आयपीओ ठरला. गुंतवणूकदारांचे या आयपीओने सर्वाधिक नुकसान केले.
अर्थव्यवस्थेसंबंधीच्या सकारात्मक आकड्यांनी शुक्रवारी अमेरिकन बाजारात जोश भरला. फेब्रुवारीमध्ये महागाई कमी झाल्यामुळे डाऊ जोन्स 1.26% वाढून बंद झाला.
आर्थिक वर्षाच्या शेवटच्या दिवशी झालेली बाजारातील तेजीचा असर सोमवारी देखील बाजारावर दिसेल.पुढील आठवड्यात 04 एप्रिल रोजी महावीर जयंती व 07एप्रिल रोजी गुड फ्रायडे असल्याने बाजार बंद राह्तील.त्यामुळे कामकाजाच्या दृष्टीने येणार आठवडा छोटा आहे
येणाऱ्या आठवड्यात गुंतवणूकदारांचे लक्ष ७ तारखेला जाहीर होणाऱ्या RBI च्या interest rate decision कडे असेल.
Technical view on nifty शुक्रवारी निफ्टीने 17359 चा बंद दिला.वर जाण्याकरिता निफ्टी 17379-17428-17487-17512-17568 हे स्तर पार करेल. तसेच जर निफ्टीने 17200 चा स्तर तोडला तर निफ्टी 17126-17080-16985 ह्या पातळ्या गाठेल.

बाजारात तेजी परतली, सेन्सेक्समध्ये 126 अंकांची वाढ

आठवड्याची सुरवात एकदम दमदार झाली. जागतिक बाजारातील तेजी मुळे भारतीय बाजार देखील वधारला. मजबूत सुरुवातीनंतर, दिवस जसजसा पुढे सरकत गेला तशी तेजी वाढत गेली. परंतु शेवटच्या तासातील ऑटो, कॅपिटल गुड्स, पॉवर समभागातील विक्रीमुळे निर्देशकांची वाढ रोखली गेली.परंतु फार्मा क्षेत्रात खरेदी दिसून आली. दिवसभराच्या अखेरीस सेन्सेक्स 126.76 अंकांनी वधारून 57,653.86 वर बंद झाला.दुसरीकडे निफ्टीत 40 अंकांची वाढ होऊन निफ्टीने 16,985.70 चा बंद दिला.

सेन्सेक्स,निफ्टी किंचित घसरणीसह बंद झाले.
सकारात्मक सुरुवातीनंतर, बाजार नफा टिकवून ठेवण्यात अयशस्वी ठरला आणि नफा आणि तोटा यांच्यात दिवसभर झुलत राहिला. रिझव्‍‌र्ह बँकेकडून व्याजदर आणखी वाढतील या अपेक्षेने गुंतवणूकदार सावध राहिले त्यामुळे मंदीवाल्यानी बाजाराचा ताबा घेतला.बाजार बंद होताना निर्देशांकात किरकोळ घसरण झाली. दिवसभराच्या अखेरीस सेन्सेक्स 40.14 अंकांनी घसरून 57,613.72 वर बंद झाला.दुसरीकडे निफ्टीत 34 अंकांची घट होऊन निफ्टीने 16,951.70 चा बंद दिला. Indices ended Tuesday’s session in the red territory

सेन्सेक्स 346 अंकांनी वधारला. Sensex rises 346 points
मंथली एक्सपायरीच्या दिवशी अजून एका अस्थिर सत्रात बाजाराने चांगली बढत घेतली. बाजाराची सुरुवात सकारात्मकतेने झाली तथापि, सत्राच्या मध्यभागी झालेल्या विक्रीने सर्व नफा मिटला गेला. परंतु शेवटच्या तासातील सर्व क्षेत्रांतील खरेदीमुळे बाजाराला दिवसाच्या उच्चांकाच्या जवळ बंद होण्यास मदत झाली. दिवसभराच्या अखेरीस सेन्सेक्स 346.37 अंकांनी वधारून 57,960.09 वर बंद झाला.दुसरीकडे निफ्टीत 129 अंकांची वाढ होऊन निफ्टीने 17,080.70 चा बंद दिला.

सेन्सेक्सने 1,031 अंकांची तेजी नोंदवली. Sensex rallies 1,031 pts.
आर्थिक वर्षाच्या शेवटच्या दिवशी भारतीय बाजारात तुफान तेजी पाहावयास मिळाली. सलग दुसऱ्या दिवशी बाजाराने तेजीची मालिका सुरु ठेवली. आश्वासक जागतिक संकेतांच्या पार्श्वभूमीवर बाजाराची सुरुवात गॅप अप ओपनिंगने झाली. चहुबाजूंच्या खरेदीमुळे सेन्सेक्स आणि निफ्टी या दोन्ही निर्देशांकांमध्ये मोठी तेजी दिसून आली.बँक,फायनान्स, आयटी आणि मेटल्स निर्देशांक 1 ते 2.5 टक्क्यांनी वधारले. सेन्सेक्स जवळपास सेन्सेक्स 1,100 अंकांनी वाढला.

दिवसभराच्या अखेरीस सेन्सेक्स 1031अंकांनी वधारून 58992 वर बंद झाला.दुसरीकडे निफ्टीत 279 अंकांची वाढ होऊन निफ्टीने 17360 चा बंद दिला.

(लेखक शेअरबाजार तज्ञ, तसेच Technical and Fundamental Analyst आहेत.)

jiteshsawant33@gmail.com

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *