सेन्सेक्समध्ये १००० अंकांची तेजी,कंपन्यांच्या चौथ्या तिमाहीच्या आकड्यांचे उत्तम प्रदर्शन व वेळेअगोदर पाऊस दाखल झाल्याच्या बातमीचा प्रभाव.

 सेन्सेक्समध्ये १००० अंकांची तेजी,कंपन्यांच्या चौथ्या तिमाहीच्या आकड्यांचे उत्तम प्रदर्शन व वेळेअगोदर पाऊस दाखल झाल्याच्या बातमीचा प्रभाव.

मुंबई, दि.22 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : या आठवड्यात बाजारावरती विदेशी बाजरातील संकेत,कोरोना रुग्णसंख्येतील घट,अमेरिकेतील महागाईचे आकडे, कंपन्यांचे चवथ्या तिमाहीचे आकडे व आठवड्याच्या शेवटच्या दिवशी भारतीय मौसम विभागाने पावसासंबंधी केलेले निवेदन या सगळ्याचा प्रभाव राहिला.सेन्सेक्स आणि निफ्टीने आपली तीन आठवड्यातील उत्तम कामगिरी बजावली. Sensex, Nifty Clock Best Weekly Gains In Three Months
 
पहिल्याच दिवशी सेन्सेक्समध्ये ८५० अंकांची उसळी Markets started the week on strong note
 
आठवडयाच्या पहिल्याच दिवशी सुरुवात तेजीने झाली. बाजारात सर्वत्र तेजीचा माहोल होता.सेन्सेक्स 800 अंकांनी  वधारला. निफ्टीने पार केला १४,९०० चा टप्पा. बँकिंग क्षेत्रात तसेच वित्तीय संस्थांच्या समभागात  तुफान तेजी होती,. आय.सी आय.सी. आय (ICICI),  एस.बी. आय(SBI),एच डी.एफ.सी(HDFC) व एच डी.एफ.सी बँक(HDFC Bank) या समभागात चांगलीच तेजी होती त्यामुळे मार्केटला चांगलाच सपोर्ट मिळाला., कोरोनाच्या रुग्णसंख्येत घट झाल्याने बाजारात  वातावरण होते. गुंतवणूकदारांचे  लक्ष कोरोना रुग्णसंख्या,तसेच अमेरिकेत जाहीर होणाऱ्या महागाईच्या आकड्यांवरती होते. सिप्लाचे(CIPLA)  चवथ्या तिमाहीचे निकाल हे निराशाजनक राहिले.लार्सन अँड टुब्रो(L&T) या कंपनीचे चवथ्या तिमाहीचे निकाल हे ठीकठाक होते  परंतु कोलगेट(COLGATE) कंपनीचे निकाल हे अनुमानापेक्षाही उत्तम होते. Markets started the week on strong note and end with a percent gain supported by the auto, metal and financials. Sensex, Nifty Log Best Single-Day Gains In Over A Month Led By Financials.
 
 
सेन्सेक्सने पार केला ५०,००० चा टप्पा
आशियाई बाजारातून आलेले मजबूत संकेत तसेच कोरोना रुग्णसंख्येत झालेली लक्षणीय घाट या पार्शवभूमीवर सेन्सेक्स व निफ्टीने अनुक्रमे ५०,००० व१५,००० चा महत्वपूर्ण टप्पा पार केला. HDFC BANK, BAJAJ FINANCE, RIL आणि ICICI BANK या समभागांनी बाजरात जोश भरला. वाहन(Auto) आणि मेटल(Metal) क्षेत्रात सुद्धा चांगलीच तेजी होती. १२ मार्च नंतर निफ्टीने १५१०० चा स्तर व १ एप्रिल नंतर सेन्सेक्सने ५०,००० चा टप्पा पार केला .कोरोनाचा कहर आता हळूहळू कमी होईल व टाळेबंदी शिथिल होईल या आशेने मंगळवारी  हॉटेल सेक्टर/बांधकाम क्षेत्र या समभागात सुद्धा तेजी होती. दिवसभरात  सेन्सेक्सने ७०० अंकांची उसळी घेतली.Sensex, Nifty Close At Two-Month High As New Infections Slow.. Sensex Nifty ends with healthy gains.
 
निफ्टीला बंद भाव १५,००० च्या वरती ठेवण्यात यश Nifty holds 15,000
बुधवारी बाजाराची सुरुवात कमजोरीने झाली. विदेशी संकेत सुद्धा नरम होते. बुद्ध जयंती निमित्य कोरियन मार्केट तसेच नॅशनल डे असल्याने हाँगकाँग मधील बाजार बंद होते.बाजरात बराच उतार चढाव होता अश्या मार्केटमध्ये सिमेंट,हॉटेल तसेच रेल्वेचे समभाग आपली तेजी टिकवून होते. फार्मा शेअर्स चांगलीच तेजी होती. रिलायन्स (RIL), स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI), लार्सन अँड टुब्रो (L&T)  आणि सन फार्मा ( SUN PHARMA) या शेअर्स , मधील तेजीमुळे बाजाराला चांगलाच आधार मिळाला. निफ्टीने आपला बंद भाव १५,००० च्या वरती ठेवण्यात यश मिळवले. Markets erase some of the previous session gains and end 0.5 percent lower dragged by the metal and financials. Sensex, Nifty Snap Two-Day Winning Streak.
मार्केटमध्ये  प्रचंड उतारचढाव निफ्टीचा बंद भाव १५,००० च्या खाली Nifty slips below 15,000
सलग सातव्या दिवशी कोरोना रुग्णसंख्येत घट झाल्याने गुरुवारी सकाळी भारतीय बाजारात वाढ झाली परंतु आशियाई बाजारात मिश्र संकेत होते. वैश्विक बाजारात कमोडिटीसच्या किमतीत घट आल्याने मेटलच्या किमतीत घसरण झाली त्यामुळे गुरुवारी मेटल शेअर्स चांगलेच आपटले. आशियाई देशातील कोरोनाच्या रुग्णसंख्येतील वाढ व अमेरिकेतील महागाईची चिंता यामुळे क्रूड ऑइल मध्ये घसरण झाली. गुरुवारी बाजारात फारच उतारचढाव होता.एच.डी.एफ.सी बँक HDFC BANK, हिंडाल्को  HINDALCO आणि टी.सी.एस. TCS या शेअर्स मधील घसरणीने बाजारात दबाव वाढला. सलग दुसऱ्या दिवशी बाजारात मंदी होती.निफ्टीने आपला बंद भाव १५,००० च्या खाली दिला. Sensex, Nifty decline on the day of weekly expiry. Markets end lower for the second consecutive session with Nifty below 15,000 mark, dragged by financials and metal stocks.
आठवडयाच्या शेवटच्या दिवशी सेन्सेक्समध्ये १००० अंकांची उसळी Sensex zooms 1000 points
आठवडयाच्या शेवटच्या दिवशी बाजारावरती तेजीवाल्यांची पकड होती. चांगल्या विदेशी संकेतामुळे तसेच सलग आठव्या दिवशी कोरोनाच्या नवीन रुग्णसंख्येत संख्येत घट झाल्याने बाजारात उत्साहाचे वातावरण होते. बाजाराची सुरुवात चांगली झाली. बँकिंग,सिमेंट.बांधकाम,आय.टी तसेच एफ.एम.सी.जी ह्या क्षेत्रात तेजी होती. बँकिंग  आणि वित्तीय संस्था यातील जोरदार खरेदीच्या जोरावर सेन्सेक्सने १००० अंकांची उसळी घेतली. रिझर्व्ह बँकेने त्यांच्याकडील अतिरिक्त ९९,१२२ करोड रुपये केंद्र सरकारकडे हस्तांतरण करणार असल्याचे सांगितले तसेच स्टेट बँक ऑफ इंडियाचा तिमाही निकाल देखील उत्तम लागला,भारतीय मौसम विभागाने बंगालच्या खाडीत पाऊस पडत असून तो वेळेअगोदरच दाखल झाल्याचे  दुपारी अधिकृत रित्या जाहीर केले या सगळ्या गोष्टीचा परिणाम म्हणून सेन्सेक्स १% हून अधिक वाढला. बाजाराच्या वाढीकरिता एचडीएफसी (HDFC) एचडीएफसीबँक (HDFC BankS), आयसीआयसीआय बँक (ICICI Bank) आणि कोटक महिंद्रा (Kotak Mahindra) या शेअर्स चे योगदान अधिक राहिले.. Markets posted strong gains led by the banking and financial stocks.
(मार्केट मध्ये गुंतवणूक करताना तज्ञ व्यक्तीचा सल्ला घ्यावा )
जितेश सावंत
शेअर बाजार तज्ञ,
Technical and Fundamental Analyst-Stock Market
jiteshsawant33@gmail.com
 
JS/KA/PGB
22 May 2021
 
 
 
 
 

mmc

Related post