कोरोना काळात वित्तीय संस्थांचा ग्राहकांशी संपर्क तुटला

 कोरोना काळात वित्तीय संस्थांचा ग्राहकांशी संपर्क तुटला

नवी दिल्ली, दि.24 (एमएमसी न्यूज नेटवर्क): कोरोनाच्या (corona) दुसर्‍या लाटेने बँका (Banks) आणि वित्तीय संस्थांसमोर ग्राहकांशी (consumers) संपर्क तुटल्याचे संकट उभे ठाकले आहे. काही दिवसांपूर्वी बिगर-बँकिंग वित्तीय कंपन्यांनी (NBFC) म्हटले होते की एवढ्या मोठ्या प्रमाणात लोक कोरोना (corona) पॉझिटिव्ह झाले आहेत त्यामुळे त्यांचे कर्मचारी आणि वसुली प्रतिनिधी ग्राहकांशी (consumers) संपर्क साधू शकत नाहीत. आता हेच भारतीय स्टेट बँकेने (SBI) देखील सांगितले आहे. भारतीय स्टेट बँकेचे म्हणणे आहे की संसर्गाची गती वाढल्यामुळे आणि टाळेबंदीमुळे ग्राहकांशी संपर्क साधता येऊ शकत नाही. त्याचा वसुलीवर परिणाम होत आहे. एक समस्या अशीही उद्भवली आहे की बँका आणि वित्तीय संस्था कर्जाच्या स्थितीचे आकलन करू शकत नाहीत.
कोरोनाच्या (corona) दुसर्‍या लाटेमुळे व्यवसायावर होणार्‍या परिणामाबाबतच्या प्रश्नावर भारतीय स्टेट बँकेचे (SBI) अध्यक्ष दिनेश खारा म्हणाले की परिस्थितीचा आढावा घेतला जात आहे. किरकोळ कर्जाच्या स्थितीवरही लक्ष ठेवले जात आहे, परंतु समस्या अशी आहे की आमचे कर्मचारी बाहेर जाऊ शकत नाहीत.
 

कर्जवसुलीची प्रक्रिया पूर्णपणे विस्कळीत
The debt recovery process is completely disrupted

खारा यांनी सांगितले की सध्या परिस्थिती अत्यंत नाजूक आहे. जून अखेरीस परिस्थिती स्पष्ट होईल, तेव्हाच परिणामाचे मूल्यांकन होऊ शकेल. त्याआधी एनबीएफसींनी (NBFC) भारतीय रिझर्व्ह बँकेला (RBI) विनंती केली होती की ते मोठ्या प्रमाणात ग्राहकांशी (consumers) संवाद साधू शकत नाहीत. यामुळे कर्जवसुलीची प्रक्रिया पूर्णपणे विस्कळीत झाली आहे. विशेषत: बिगर-शहरी भागात कोणतेही बँक कर्मचारी जाऊ शकत नाहीत. सुक्ष्म वित्तीय संस्थांसमोरही (एमएफसी) हीच समस्या आहे.
 

कर्ज वसुलीत घट
Decrease in debt recovery

अनेक एनबीएफसी आणि एमएफसी ग्राहकांकडून (consumers) दररोज किंवा आठवड्यातून एकदा वसुली करत असतात. सध्या ही संपूर्ण प्रक्रिया विस्कळित झाली आहे. अलीकडेच पतमानांकन संस्था इक्राने एका अहवालात म्हटले होते की एप्रिल-मे 2021 मध्ये एमएफसीच्या कर्ज वसुलीत 10 टक्क्यांची घट होईल.
एनबीएफसीची संघटना एफआयडीसीचे सरचिटणीस महेश ठक्कर यांनी भारतीय रिझर्व्ह बँकेच्या (RBI) गव्हर्नरना मदत पॅकेजबबात पत्र लिहिले आहे. त्यांनी असे लिहिले आहे की राज्यांनी लादलेल्या टाळेबंदीमुळे (Lockdown) अनेक राज्यांत कार्यालये बंद केली जात असून ग्राहकांशी संपर्क साधणे कठीण झाले आहे. अडकलेल्या कर्जाच्या बाबतीतही परिस्थिती अत्यंत वाईट होण्याची भीती देखील त्यांनी व्यक्त केली आहे.
 
The second wave of corona has put banks and financial institutions at risk of losing contact with consumers. A few days ago, non-banking financial companies (NBFCs) said that such a large number of people have become corona positive so their employees and recovery representatives cannot contact consumers.
 
PL/KA/PL/24 MAY 2021

mmc

Related post