पेरणीसाठी तयार केले घरगुती पेरणी यंत्र

 पेरणीसाठी तयार केले घरगुती पेरणी यंत्र

वाशिम, दि. १(एमएमसी न्यूज नेटवर्क) : कारंजा तालुक्यातील झंझोरी येथील प्रयोगशील शेतकरी अजय ढोक यांनी तीळ पेरणी करण्यासाठी प्लास्टिकच्या बॉटलपासून पेरणी यंत्र बनवून त्याद्वारे आपल्या शेतात उन्हाळी तिळाची पेरणी केली.

या युवा शेतकऱ्याने लावलेल्या या देशी शोधाचे फलीत झाले असून उन्हाळ्यात तीळ शेती उत्तमरीत्या बहरली आहे. आकाराने सूक्ष्म असणाऱ्या तेलवर्गीय तीळ बियांची पेरणी करताना ट्रॅक्टर पेरणी यंत्राद्वारे अडचण यायची यावर उपाय म्हणून अजय ढोक यांनी पाण्याच्या प्लास्टिक बॉटलचा उपयोग केला.

प्लास्टिक बॉटलच्या तळाशी छिद्रे पाडून त्याला पेरणी यंत्रावर बसविण्यात आले. दरम्यान, या देशी शोधामुळे तीळ पेरणीसाठी शेतकऱ्यांचा वेळ वाचण्याबरोबरच दिर्घ क्षेत्रावर तीळ लागवडीसाठी सुद्धा याचा लाभ होत आहे.

ML/KA/SL

1 April 2023

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *