मुख्यमंत्री शिंदे यांचे उत्तर प्रदेशात जल्लोषात स्वागत

नवी दिल्ली, दि. ९ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे काल उत्तर प्रदेशची राजधानी लखनऊ येथील विमानतळावर आगमन झाले.
मुख्यमंत्री शिंदे कालपासून उत्तर प्रदेशच्या दौऱ्यावर असून काल सायंकाळी त्यांचे लखनऊ येथील विमानतळावर आगमन झाले. यावेळी उत्तर प्रदेशचे जलसंपदा मंत्री स्वतंत्र देवसिंह यांनी पुष्पगुच्छ देऊन शिंदे यांचे स्वागत केले. तसेच, उत्तर प्रदेश वासियांनी शिंदे यांचे जल्लोषात स्वागत केले.
यावेळी मुख्यमंत्री शिंदे यांनी येथील जनतेचे धन्यवाद मानले.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत मंत्री गिरीश महाजन, दादाजी भुसे, संदिपान भुमरे, गुलाबराव पाटील आणि अन्य मंत्री तसेच आमदार या दौऱ्यामध्ये सहभागी आहेत.
मुख्यमंत्री आणि त्यांच्यासोबत असणारे मंत्री तसेच आमदार आज लखनऊ येथे थांबणार असून उद्या अयोध्या येथे ‘प्रभू श्री रामचंद्र’ यांच्या जन्मस्थळी दर्शन घेतील.
ML/KA/SL
9 April 2023