नवीन वर्षातील पहिले सूर्यग्रहण , त्याचे काय होतील त्याचे जागतिक परिणाम ?

 नवीन वर्षातील पहिले सूर्यग्रहण , त्याचे काय होतील त्याचे जागतिक परिणाम ?

जितेश सावंत दि. ९ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : येत्या २० एप्रिल रोजी या वर्षातील पहिले सूर्यग्रहण होणार आहे . हे ग्रहण
(Eclipse) सकाळी ७ वाजून ४ मिनिटांनी सुरु होणार असून दुपारी १२ वाजून २९ मिनिटांनी संपेल. हे ग्रहण संकरित सूर्यग्रहणआहे(hybrid solar eclipse) संकरित सूर्यग्रहणात, चंद्र सूर्य आणि पृथ्वी यांच्यामध्ये असल्यामुळे काही ठिकाणी ते कंकणाकृती ग्रहण म्हणून दिसेल.

हे सूर्यग्रहण भारतात दिसणार नाही पण ते ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड, पूर्व आणि दक्षिण आशिया, पॅसिफिक महासागर, फिलिपिन्स अंटार्क्टिका आणि हिंदी महासागरात दिसेल.

ह्या ग्रहणाचा प्रभाव हा मेष राशीवर आणि अश्विनी नक्षत्रावर जास्त असेल. ग्रहणाचे परिणाम हे दीर्घकालीन असतात. Usually The Eclipse leave its after effects for long duration.

हिंसाचार,अशांतता, ताणतणाव वाढतील. ह्याकाळात संपूर्ण देशात/जगात मोठ्या प्रमाणात हिंसाचार,अशांतता, आंदोलन/संप, अग्निकांड/मोठ्या दुर्घटना,युध्दजन्य परिस्थिती वाढेल. जगभरातील देशात पोलीस /मिलिटरीचा प्रभाव/नियंत्रण वाढेल.सैनिकांच्या हालचाली वाढतील.प्रजा मोठ्या उत्साहाने चळवळी करतील. प्रजेचे मानसिक स्वास्थ्य बिगडेल/ताणतणाव वाढतील.

रेल्वे तसेच रस्त्यावरील अपघाताची संख्या वाढेल. बॉम्बस्फोट,स्फोटक घटना,विषारी वायूचे प्रकार यामुळे सामूहिक मृत्यूचा घटना होण्याची शक्यता.


सत्तापरिवर्तनाचे योग
काही महत्वाचे कायदे करताना विरोध होईल.लोकसभा/राज्यसभा यात विरोध पाहावयास मिळेल. या समितीतील सदस्यांच्या मृत्यूची शक्यता.कायद्यात फेरफार करताना टोकाचे/तीव्र मतभेद निर्माण होतील/ विवादपूर्ण चर्चा.जहाल भाषणे होतील.समाजात जोराची टीका व चर्चा ऐकावयास मिळते.

संसदेत नवीन कायद्याविषयीची चर्चा होईल. काही ठिकाणी सरकारे डळमळीत होतील,राष्ट्रपती राजवट लागेल मित्र शत्रू होतील.सत्ता दुभंगली जाईल. सत्ताधाऱ्यांना विश्वासघात अनुभवयास मिळेल.राजनैतिक षडयंत्र तसेच विद्रोहाच्या घटना.राजकीय नेत्यांचे राजीनामे तसेच काही ठिकाणी पायउतार व्हावयास लागेल. काही ठिकाणी सत्तापरिवर्तन होईल.

सरकारमधील ताळमेळ बिघडेल.घटकपक्षाशी विसंवाद,अमलीपदार्थाच्या गुन्हयात अडकतील आरोप होतील.सत्तेचा माज चढलेले नेते/मंत्री अधिकाऱ्यांना अपमानीत करतानाच्या घटना दिसतील.

काही संसद सदस्य,मंत्रीगण यांच्या प्रकृती बिघाड होईल,गंभीर आजारपण, तसेच मृत्यूची शक्यता. काही संसद सदस्य आंपल्या भावनांना/संवेदनांना आवर घालू शकणार नाहीत व त्यामुळॆ विचित्र वर्तणूक करू शकतील.सिनेमा,सर्कस, खेळाची मैदाने यामध्ये हिंसा,भय,आतंकवादी प्रकार पाहावयास मिळतील.जहाज अपघात होतील,कर्मचारांच्या संपामुळे समुद्रातील व्यापारात बाधा उत्पन्न होईल.

कायदेत ज्ज्ञांसाठी प्रतिकूल,सांप्रदायिकता तसेच धार्मिक फूट पाडण्याचे प्रकार घडतील/वाढतील.काही कार्यक्रम,
संमेलने,स्पर्धा,आय.पी.एल(IPL)सारख्या स्पर्धा यात खंड पडण्याचीशक्यता. उच्चशिक्षित तसेच धार्मिक व्यक्ती यांना मोठे पद मिळेल.महिला गुन्हेगारांना शिक्षा होईल,काही स्कँडल बाहेर पडतील.

नवे शोध लागतील. नवीन अवकाशयान निर्माण होतील.जनावरांना या ग्रहणाचा फार त्रास होईल. वातावरणातील उष्णतेचे प्रमाण खूप वाढेल. तूप,तिळाचे तेल,गुळ,उडद,मूग, सुती कपडे,कापूस,गहू,पिवळ्या वस्तू ,लोखंड,सुगंधित पदार्थ,सुका मेवा यांचे भाव वाढतील.

( लेखक शेअर बाजारतज्ञ आणि ज्योतिष विशारद आहेत )

के. पी. विशारद ,नक्षत्र सम्राट, वास्तू तज्ञ (Astro Vastu Consultant)

jiteshsawant33@gmail.com

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *