पर्यटकांवर मधमाशांचा हल्ला …

 पर्यटकांवर मधमाशांचा हल्ला …

छ. संभाजी नगर दि. ९ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : वेरूळ लेणीत पर्यटकांवर मधमाशांनी हल्ला केला असून यात 15 ते 20 पर्यटक जखमी झाले आहे. छत्रपती संभाजी नगर जिल्ह्यातील वेरूळ येथील लेणी क्रमांक 16 या जगप्रसिद्ध कैलास लेणीच्या वरील भागास शनिवारी दुपारी सव्वा बाराच्या सुमारास पर्यटकांवर आग्यामोहळाच्या मधमाशांनी हल्ला करून व पंधरा ते वीस पर्यटकांना जखमी केले.

सर्व जखमी पर्यटकांना वेरूळ येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात तात्काळ स्थानिकांच्या मदतीने दाखल करून त्यांना वैद्यकीय उपचार करण्यात आले. यावेळी प्राथमिक आरोग्य केंद्र वेरूळचे वैद्यकीय अधिकारी श्रेयस वाघमारे यांनी सर्व जखमी पर्यटकांच्या चेहऱ्यावरील, हातावरील, पाठीवर, मानेवर, मधमाशांनी चावा घेतलेले काटे काढले व आईस पॅक लावून औषधोपचार केले.

वेरूळ लेणीच्या वरील भागास काही पर्यटक हे लेणी बघण्यासाठी गेले होते व दुपारी सव्वा बाराच्या सुमारास एकाएकी आगे मोहोळ उठले आणि काही कळण्याच्या आत पर्यटकांवर हल्ला केला. या जखमी पर्यटकात रघुनंदन कडापा, कार्तिका कडापा, स्पंदना कडापा, सहाना कडापा, पलानीस्वामी, रेखा कुमारी, यांच्यासह 15 ते 20 पर्यटक या मधमाशांच्या हल्ल्यात जखमी झाले आहेत. या जखमी पर्यटकांना घेऊन वेरूळ येथील स्थानिकांनी तात्काळ दवाखान्यात दाखल करून त्यांच्या वैद्यकीय उपचार मिळवण्यासाठी मदत केली.

यावेळी अतिरिक्त जिल्हाआरोग्य अधिकारी जी.एम कुंडलीवार यांनीही येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात जखमी झालेल्या पर्यटकांची भेट घेऊन पाहणी केली. पर्यटकांना किमान दोन तास निरीक्षणाखाली ठेवण्यात आले होते.

ML/KA/SL

9 April 2023

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *