पाऊस गारपिटीने पिकांचे नुकसान

अहमदनगर दि ९ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : पाऊस आणि गारपिटीने अहमदनगर जिल्ह्यातील शेवगाव आणि नेवासा तालुक्यातील शेतकऱ्यांच्या तोंडचा हिरावला घास, शेवगाव तालुक्यात सव्वा दोन हजार हेक्टरचे तर नेवासा तालुक्यात चार हजार हेक्टर क्षेत्राचे नुकसान झाले.
कांदा वाफ्यात साचले पाणीच पाणी, गहू आणि बाजरी पीक झाले भुईसपाट, काहींच्या घरावरील छत उडून संसार आले उघड्यावर, आंबा, डाळिंब बागांनाही बसला मोठा फटका.
अहमदनगर शहरात विजांच्या कडकडाटासह वादळी पावसाने सर्वत्र दाणादाण उडाली . काही वेळ शहरात गारपीट झाली. अनेक ठिकाणी झाडे, विद्युत खांब कोसळल्याने तसेच वीज तारा तुटल्याने शहराचा वीजपुरवठा खंडित झाला .शहरात सर्वत्र रस्त्यांवर तळे तयार झाल्याने त्यातून मार्ग काढताना नागरिकांचे हाल झाले.
पारनेर आणि कर्जत तालुक्यातील काही भागात गारपिटीने शेती पिकांचे प्रचंड नुकसान झाले, अचानक सुटलेल्या वादळी वाऱ्यामुळे नागरिकांची तारांबळ उडाली, फळबागांचे झाले मोठे नुकसान झाले. उभी पिके भुईसपाट झाली, काढणीला आलेल्या कांद्याचे मोठे नुकसान झाले.
ML/KA/SL
9 April 2023