बनावट पॅथोलोजिकल लॅब रोखण्यासाठी लवकरच कायदा

 बनावट पॅथोलोजिकल लॅब रोखण्यासाठी लवकरच कायदा

मुंबई, दि. ९ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : राज्यात बनावट पॅथॉलोजी लॅब वर नियंत्रण ठेऊन त्यांच्यावर कठोर कारवाई करण्यासाठी स्वतंत्र कायदा आणला जाईल त्यात दर नियंत्रण , कलेक्शन सेंटर नोंदणी याचीही तरतूद करण्यात येईल अशी माहिती प्रभारी मंत्री उदय सामंत यांनी सभागृहात दिली.

याबाबतचा प्रश्न सुनील राणे यांनी उपस्थित केला होता, त्यावर अजय चौधरी, आशिष शेलार, योगेश सागर, राजेश टोपे, प्रकाश आबिटकर आदींनी उप प्रश्न विचारले.
या कायद्यात फौजदारी कारवाई ची देखील तरतूद असेल , तोवर राज्यभर जिल्हावार पथके तयार करून लॅब ची तपासणी केली जाईल, कायदा आणण्यासाठी वेळ लागत असेल तर सध्याच्या नर्सिंग कायद्यात सुधारणा करून कारवाई केली जाईल असं मंत्री म्हणाले.

बेस्ट भंगार विक्रीची चौकशी

मुंबईतील बेस्ट बस आणि इतर सुट्या भागांची भंगार विक्रीची चौकशी उच्च स्तरीय समिती नेमून केली जाईल अशी घोषणा प्रभारी मंत्री उदय सामंत यांनी केली. १९७१ पासून बेस्टच्या भंगार विक्रीत मोठा गैरव्यवहार झल्याबाबतचा प्रश्न लहू कानडे यांनी उपस्थित केला होता.

यासंदर्भातील कागदपत्रे बेस्ट उपक्रमाकडे उपलब्ध आहेत , सभागृहात यासंदर्भात झालेल्या आरोपांचा समावेश चौकशीत करण्यात येईल असं मंत्री म्हणाले. यावर विजय वडेट्टीवार, आशिष शेलार, नितेश राणे यांनी उप प्रश्न विचारले.

भगवती रुग्णालयाचे नूतनीकरण लवकरच

मुंबईतील बोरिवली येथील भगवती रुग्णालयाच्या नूतनीकरणाचे काम येत्या ऑक्टोबर महिन्यात पूर्ण करण्यात येईल अशी माहिती प्रभारी मंत्री उदय सामंत यांनी दिली. याबाबतचा प्रश्न मनिषा चौधरी यांनी उपस्थित केला होता. या रुग्णालयात एका खासगी व्यक्तीला औषधाचे दुकान सुरू करायला परवानगी का दिली याचीही चौकशी केली जाईल असं ते म्हणाले.

ML/ML/SL

9 July 2024

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *