जगातील पहिली CNG बाइक Bajaj Freedom 125 बाजारात दाखल

मुंबई, दि. ५ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : CNG वाहनांना भारतीय ग्राहकांकडून गेल्या काही वर्षांपासून अधिक पसंती लाभत आहे, सरकारकडूनही CNG च्या वापराला प्रोत्साहन दिले जात आहे. CNG बाइकच्या निर्मितीत भारतानं जगात आघाडी घेतली आहे. बजाज ऑटोनं कॉम्प्रेस्ड नॅचरल गॅस (CNG) वर चालणारी जगातील पहिली मोटारसायकल बाजारात आणली आहे. Bajaj Freedom 125 असं या बाइकचं नाव आहे. १२५ सीसीची ही कम्युटर बाइक पेट्रोल आणि सीएनजी अशी दोन्हीवर चालते. सीएनजी बाइकची ऑपरेशनल किंमत कमी करणं हा यामागचा उद्देश आहे.
या विशेष CNG बाइकची एक्स-शोरूम किंमत ९५ हजार ते १ लाख १० हजार रुपये (एक्स-शोरूम) इतकी आहे. सुरुवातील ही बाइक गुजरात व महाराष्ट्रात उपलब्ध होत आहे. येत्या काळात इजिप्त, टांझानिया, पेरू, इंडोनेशिया आणि बांगलादेश या बाजारपेठांमध्ये बाइक निर्यात करण्याची कंपनीची योजना आहे.
Bajaj Freedom 125 ही बाइक मध्यमवर्गीय ग्राहकांना डोळ्यापुढं ठेवून विकसित करण्यात आली आहे. ही बाइक अन्य प्रतिस्पर्धी बाइकच्या तुलनेत इंधन खर्चात ५० टक्के कपात करते. छोटी पेट्रोल टाकी आणि सीएनजी सिलिंडरनं सुसज्ज असलेली ही मोटारसायकल आहे. हँडलबार-माउंटेड स्विचचा वापर करून चालक सीएनजी वरून पेट्रोल किंवा पेट्रोलवरून सीएनजी असं स्विच करू शकतात. पेट्रोल टाकीची क्षमता २ लिटर, तर सीएनजी टँकची क्षमता २ किलो आहे.
बजाज चा दावा आहे की फ्रीडम 125 केवळ सीएनजीवर 213 किमी पर्यंत अंतर कापू शकते, पेट्रोल टँकद्वारे अतिरिक्त 117 किमी प्रदान केले जाऊ शकते, ज्याची रेंज एकूण 330 किमी आहे. सीएनजीसाठी इंधन कार्यक्षमता 102 किमी प्रति किलो आणि पेट्रोलसाठी 64 किमी / लीटर आहे.
स्टाईलच्या दृष्टीने, Freedom 125 मध्ये डीआरएल सह गोल हेडलॅम्पसह आधुनिक-रेट्रो Aesthetics अवलंब केला आहे. बाईकच्या डिझाइनमध्ये फ्लॅट सीट, रुंद हँडलबार आणि न्यूट्रल रायडिंग पोझिशनसाठी सेंटर-सेट फूट पेग चा समावेश आहे. सेमी-डिजिटल इंस्ट्रूमेंट क्लस्टर कमी सीएनजी अलर्ट आणि न्यूट्रल गिअर इंडिकेटर अशी विविध वैशिष्ट्ये या बाइकमध्ये समाविष्ट आहेत.
ML/ML/SL
5 July 2024