महिला विनयभंगाविरोधात महिलांचं श्रृंगार आंदोलन

मुंबई, दि. 14 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : वसईतील शासकीय यंत्रणेतील भ्रष्टाचार पराकोटीला पोहोचला असून नागरिकांच्या विविध कामांकरता यापूर्वी टेबलाखालून पैशाची मागणी होत असे मात्र ,आता भ्रष्ट कर्मचारी नागरिकांच्या कामाची पूर्तता करण्यासाठी आलेल्या महिलेची अब्रू मागत असल्याची घृणास्पद घटना वासळई तलाठी कार्यालयात घडली होती. शासकीय यंत्रणा आरोपीला वाचवत असल्याची भावना निर्माण झाल्याने या निंदनीय प्रकारा विरोधात वसईकरांच्या मनातली तीव्र खदखद बुधवारी मोर्चाच्या स्वरूपातून बाहेर पडली.
वासळई तलाठी कार्यालयात एका शिक्षक महिलेला फेरफार संदर्भातील काम पूर्ण करून घेण्यासाठी, येथील तलाठी विलास करे याने अश्लील कृत्य केले होते. आरोपीच्या विरोधात संबंधित महिलेची तक्रार नोंदविण्याची प्रक्रिया ते आरोपीला बोलवून अटक न करता सोडून देण्याचा प्रकार वसई पोलिसांनी केला होता. तसेच न्यायालयात हजर केल्यावर आरोपीस पोलीस कोठडीची मागणी न करता त्याला जामीन होण्यापर्यंतच्या कार्यपद्धतीत पोलिसांनी बजावलेली भूमिका संशयास्पद असल्याचा आरोप करण्यात आला आहे. याच विरोधात बुधवारी वसई तहसीलदार व वसई पोलीस ठाणे दोन्ही ठिकाणी ‘श्रृंगार त्याग’ व त्याचे ‘अर्पण’ असे मोर्चाचे आयोजन केले होते.
Women’s makeup movement against female molestation
ML/ML/PGB
14 Jun 2024