हिरव्या मिरच्यांची भाजी!
मुंबई, दि. 29 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : प्रत्यक्षात लागणारा वेळ:
४५ मिनिटे
लागणारे जिन्नस:
३ वाटया तूरडाळ
अर्धा किलो आंबटचुका
साडेतीन वाटया मिर्चीचे तुकडे (यात पोपटी मीरची अर्धी वाटी. बाकी तिखट मिरच्या)
तीन मध्यम मोठे कांदे
दोन लसूण गड्ड्या सोलून
दोन इंच आल्याचा तुकडा
एक नारळ खोवून
अर्धी/पाऊण वाटी शेंगदाणे, जाडसर कूट करून
३-४ चमचे गोडा मसाला
मीठ चवीनुसार
दीड ते दोन वाट्या तेल
क्रमवार पाककृती:
चुका, तूर आणि मिर्ची कुकरमध्ये शिजवायची. नेहेमीप्रमाणे.
कांदे; आल+लसूण यांची वेगवेगळी पेस्ट करायची
तेल तापवून मोहोरी, हळद घालून फोडणी करायची. यात आधी कांद्याची पेस्ट नंतर लसूण पेस्ट अन त्यानंतर खोबरे, दाणेकूट घालून तेल सुटेस्तो परतायाचं. यावर शिज़लेला माल घालून, जरा पाणी घालोन बर्यापैकी पातळ करायच. भरपूर उकळ येउ द्यायची आणि मग गोडा मसाला, मीठ add करून अजून जरावेळ आचेवर ठेवायचं.
भाजी तय्यार.
ही भाकरीसोबत चुरूनच खाण्यात मज़ा आहे.
आजच्या भाजीला पालक नव्हता
या प्रमाणात १२ लोक अगदी पोटभर जेवले.
वाढणी/प्रमाण:
या प्रमाणात १२ लोक अगदी पोटभर जेवले. १५ मोठाल्या भाकरी केल्या होत्या ज्वारीच्या. त्यापैकी १३/१४ लागल्या. (उगा अंदाज असावा म्हणून हे दिलेलं आहे)
Vegetables of green chilies!
ML/ML/PGB
29 May 2024