मराठवाड्यात सर्वत्र पिकांसाठी उपयुक्त पाऊस…
औरंगाबाद, दि. 11 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : मराठवाड्यातील सर्व जिल्ह्यात सर्वत्र ढगाळ वातावरण असून सर्वच जिल्ह्यात दिवस भर ठीक ठिकाणी पावसाची. रीप रिप सुरूच आहेUseful rain for crops everywhere in Marathwada …
औरंगाबाद शहरासह Including Aurangabad city जिल्ह्यातील ग्रामीण भागात गेल्या तीन चार दिवसांपासून संततधार पाऊस होत आहे. अनेक भागात कापूस, सोयाबीन व इतर पिके उगवली असून पिकांसाठी पोषक वातावरण निर्माण झाले आहे. अजूनही पावसाची रिपरिप सुरूच आहे. सिल्लोड, पैठण, सोयगाव, कन्नड, खुलताबाद, फुलंब्री, गंगापूर व वैजापूर तालुक्यात आतापर्यंत चांगल्या पाऊसाची नोंद झाली आहे.
सध्या सर्व दूर भिज पाऊस आहे, आतापर्यंत सरासरी 91 टक्के पर्यंत पेरणी झालेली आहे उर्वरित ठिकाणी चार-पाच दिवसानंतर वाफसा परिस्थिती निर्माण झाल्यानंतर उर्वरित पेरणी करावी . सूक्ष्म सिंचनावर लागवड केलेल्या शेतकऱ्यांनी वाफसा आल्यानंतर अंतर मशागतीची कामे उरकून घ्यावे असे आवाहन कृषी विभागाच्या वतीने करण्यात आले आहे.
ML/KA/PGB
11 July 2022