पिकांना ग्रासले गोगलगायीनी, शेतकरी त्रस्त…

 पिकांना ग्रासले गोगलगायीनी, शेतकरी त्रस्त…

बीड, दि. 11 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : बीड जिल्ह्यात पावसाने उशिरा का असेना पण दमदार हजेरी लावली असून या काळात उगवलेल्या सोयाबीन सह अन्य पिकांना गोगलगायीनी मोठ्या प्रमाणात ग्रासले आहे.Crops devoured by snails, farmers suffer …

जिल्ह्यातील बहुतांश भागात गोगलगायींच्या प्रादुर्भावाने उगवलेली सोयाबीन पिके पूर्णत: नष्ट झाली आहेत, तर सोयाबीन सह इतरही पिकांना गोगलगाईच्या नुकसानीचा मोठा फटका बसला असून, याबाबत कृषी व महसूल यंत्रणेने तात्काळ पंचनामे करून राज्य सरकारने संबंधित शेतकऱ्यांना हेक्टरी 50 हजार रुपये मदत जाहीर करावी, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.Such a demand has been made by the farmers.

बीड जिल्ह्यात पेरणीनंतर पाऊस काही काळ लांबणीवर होता, मात्र जुलै महिन्याच्या पहिल्या आठवड्याच्या शेवटी पावसाने दमदार हजेरी लावली. याच काळात बीड जिल्ह्यात पेरणी करण्यात आलेल्या प्रमुख पिकांपैकी सोयाबीनचे क्षेत्र गोगलगायींच्या भक्ष्यस्थानी पडले.

पेरणी करून 100% नुकसान झाल्यानंतर आता गोगलगायीचे नियंत्रण करणे व दुबार पेरणी करणे असे मोठे दुहेरी संकट बीड जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या समोर ठाकले आहे. Such a big double crisis is facing the farmers of Beed district.

ML/KA/PGB
11 July 2022

mmc

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *