शेअर मार्केट (स्टॉक मार्केट) मध्ये रिझर्व्ह बँकेने (R.B.I) भरला जोश. वरच्या स्तरावर नफावसुली.

 शेअर मार्केट (स्टॉक मार्केट) मध्ये रिझर्व्ह बँकेने (R.B.I) भरला जोश. वरच्या स्तरावर नफावसुली.

मुंबई, दि.12 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : देशभरात मोठ्या संख्येने कोरोनाने प्रभावीत होणारी रुग्णवाढ. महाराष्ट्रासारख्या देशाची आर्थिक राजधानी (financial capital) असलेल्या राज्यात सरकारद्वारा घातलेले नवीन निर्बंध. देशभरातील अनेक राज्यात जाहीर झालेला लॉकडाउन. तसेच रिझर्व्ह बँकेने जाहीर केलेले पतधोरण (RBI Policy) या सगळ्याचा परिणाम या आठवड्यात बाजारावर झाला.

आठवड्याच्या पहिल्याच दिवशी बाजार कोसळला. सेन्सेक्स १३०० अंकांनी घसरला

Indian markets saw a knee-jerk reaction on Monday .Sensex tanks 1300pts

अमेरिकन मार्केटमधून तेजीचे संकेत असताना सुद्धा  सोमवारी भारतीय बाजाराची सुरुवात अत्यंत निराशाजनक झाली. करोनाबाधितांची रोज वाढणारी विक्रमी संख्या व काही प्रमुख राज्यांमध्ये जाहीर झालेला लॉक डाउन याचे पडसाद सोमवारी भांडवली बाजारावर उमटले. बाजारात विक्रीला सुरवात झाली. व त्यातच आगीत तेल टाकणारी बातमी आली. (Adding fuel to the fire)  आरोग्य मंत्रालयाने  जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार, देशात रविवारी एकाच दिवशी १ लाखाहून अधिक  संक्रमित रुग्णांची भर पडली या बातमीने बाजारात भीतीचे वातावरण तयार झाले .पहिल्यांदाच करोना संक्रमितांच्या एका दिवसाच्या आकड्यानं लाखांचा टप्पा पार केला. दैनंदिन रुग्णवाढीमध्ये महाराष्ट्र राज्य आघाडीवर आहे. तसेच राजस्थान, कर्नाटक या राज्यामध्ये करोना झपाट्याने फैलावत आहे.

महाराष्ट्र सारख्या प्रगत राज्यात म्हणजेच पर्यायाने देशाच्या आर्थिक राजधानीत (financial capital) मुंबई येथे सुद्धा सरकारने विकेंड लॉकडाउन (weekend lock down) घोषित केला त्यामुळे औदयोगिक क्षेत्रात भीतीचे सावट पसरले. व गुंतवणूकदारांनी चौफेर विक्रीचा मारा सुरु केला

बाजारात झालेल्या चौफेर विक्रीने सेन्सेक्समध्ये तब्बल १३०० अंकांची घसरण झाली. राष्ट्रीय शेअर बाजार म्हणजेच निफ्टी  ४०० अंकांनी घसरला. बँकांचे,वित्तीय संस्थांचे तसेच बांधकाम क्षेत्रातील समभाग जोरदार आपटले.  या पडझडीत आय. टी. शेअर्सनी आपली कामगिरी उत्तम बजावली.आय. टी. शेअर्स मध्ये तुफान तेजी होती. अमेरिकन अर्थव्यवस्थेत सुधार होईल या आशेने सोमवारी अमेरिकन बाजाराने शानदार उसळी घेतली

 Indian markets saw a knee-jerk reaction on Monday after the Maharashtra government on April 4 announced new restrictions to curb the spread of corona virus. The key equity indices tanked in morning trade as banks and financial shares witnessed steep selling. IT shares bucked weak market trend. A spike in domestic corona virus cases and fresh curbs imposed by the state government dented investors sentiment . US stocks rallied on Monday with the Dow and S&P 500 closing at record levels, as a round of strong economic data buoyed investor optimism for the economic reopening and a muted climb in the 10-year US Treasury yield kept inflation worries in check.

मंगळवारी मार्केटमध्ये तेजी.

indices found some stability

 

मंगळवारी मार्केटमध्ये तेजीचे वातावरण होते अमेरिकन बाजारातील तेजीमुळे आशियाई बाजरात सकाळपासूनच तेजीचा माहोल होता याचीच री भारतीय बाजाराने ओढली सकाळच्या सत्रात ऑटो ,मेटल,व फार्मा या क्षेत्रातील समभागात चांगली तेजी होती. गुंतवणूकदारांनी वरच्या स्तरावरती नफा वसुली केली. फार्मा इंडेक्सने ७ महिन्याचा उच्चांक  नोंदवला. सोमवारच्या घसरणीनंतर मंगळवारी बाजार बंद होताना थोडा सावरला. अमेरिकन मार्केट मध्ये  उच्चतम स्तर नोंदवल्यानंतर थोडी मुनाफा वसुली झाली. indices found some stability on April 6 after falling more than a percent in the previous trading session, with the Sensex rising 42 points to 49,201 and the Nifty50 closing 45 points higher at 14,683.  Wall Street pulled back from record highs.

भारताचा आर्थिक विकासदर हा १२.५ टक्के इतका राहील- आंतरराष्ट्रीय नाणेनिधी (IMF)

The International Monetary Fund (IMF) ups India’s FY22 GDP growth forecast to 12.5%

आंतरराष्ट्रीय नाणेनिधीने भारताचा विकास दर हा १२.५ टक्के असेल असा अंदाज वर्तवला आहे. भारतीय अर्थव्यवस्थेकडून जगाला  मोठी आशा आहे. भारतीय अर्थव्यवस्था कोरोनाच्या संकटातून हळूहळू सुधारत आहे. भारत यंदाच्या वर्षात चीनलाही मागे टाकेल, असं नाणेनिधीने म्हटलं आहे.

 The International Monetary Fund (IMF) on Tuesday projected an impressive 12.5 per cent growth rate for India in 2021, stronger than that of China, the only major economy to have a positive growth rate last year during the COVID-19 pandemic.

 

रिझर्व्ह बँकेच्या (आरबी .आय) पतधोरणाचे बाजाराने केले स्वागत

RBI’s dovish stance helps bulls.

बुधवारी मार्केटमध्ये चांगलीच तेजी होती. नवीन आर्थिक वर्षाच्या रिझर्व्ह बँकेच्या पतधोरणात बँकेने व्याजदर जैसे तेच ठेवले. गेल्या काही दिवसात करोना रुग्णवाढीचा आलेख उंचावत आहे. करोना रुग्णवाढीत झालेली वाढ आर्थिक विकासाच्या वाढीत अडथळा ठरेल. नवीन निर्बंध विकासाला मारक ठरतील, अशी भीती व्यक्त करताना रिझर्व्ह बँकेने आज पतधोरणात व्याजदर जैसे थेच ठेवले. त्यामुळे कर्जदारांना दिलासा मिळाला आहे. कोरोनावर मात करून अर्थव्यवस्था सुधारेल असा विश्वास आज रिझर्व्ह  बँकेने व्यक्त केल्याने बाजारात जोश निर्माण झाला व या धोरणाचे बाजाराने जोरदार स्वागत केले मार्केटने ६०० अंकाची उसळी घेतली. ऑटो , मेटल ,बँकिंग आणि ऑइल व गॅस या समभागात चांगली खरेदी झाली. सरकारने देशातील एअर कंडिशनर (AC) आणि एलईडी (LED) उत्पादनाबाबत मोठा निर्णय घेतलाय. यानुसार आता देशातच या दोन्ही वस्तूंच्या उत्पादनावर भर दिला जाणार आहे.  बुधवारी अमेरिकन मार्केट नव्या उच्चतम स्तरावरती बंद झाले    Indian markets rose for the second day in a row on April 7 helped by positive global cues and a dovish stance by the Reserve Bank of India (RBI) assuring sufficient liquidity to the financial markets. buying was seen in auto, banks, telecom, metals and consumer discretionary stocks. Cabinet approves Rs 6,238 crore PLI scheme for air-conditioners, LED lights.

सेन्सेक्स परत ५०,००० च्या पातळीवर पोहोचला. आय.टी क्षेत्रात तुफान तेजी

Sensex regains 50,000 mark.IT stocks rose for the fifth day.

कालचा जोश गुरुवारी पुन्हा एकदा  बाजारात जाणवला. सेन्सेक्सने ५०,००० ची पातळी पुन्हा एकदा गाठली. परंतु वरच्या स्तरावरती नफावसुली झाली. बाजार बंद होताना सेन्सेक्सचा स्तर हा  ५०,००० च्या खाली होता. मेटल, आय .टी या क्षेत्रात तेजी होती. (Benchmarks come off days high). सलग  पाचव्या दिवशी  आय.टी   क्षेत्रात तुफान तेजी  होती. (IT stocks rose for the fifth day.) गुरुवारी Infosys ने आपला वर्षभरातील उच्चांक 52 wk high नोंदवला. Indian markets remained volatile on April 8 but indices managed to close in the green for the third consecutive day despite profit-taking at higher levels. buying was seen in metals, consumer durables, industrial, IT, and realty stock.The S&P BSE Sensex failed to hold on to 50,000

आठवड्याच्या शेवटच्या दिवशी बाजारात उतारचढाव. बाजार बंद होताना घसरला

शुक्रवारी मार्केटची सुरुवात नरम झाली मार्केटमध्ये  उतार चढाव जास्त होता वरच्या स्तरावर दबाव होता नफावसुली सुरु होती परंतु फार्मा शेअर्स मध्ये प्रचंड तेजी होती Lupin ,Auroparma,Cadila,Sun Pharma या समभागात खूप तेजी होती. बँकिंग,पॉवर,तसेच मेटल क्षेत्रावर आज दबाव होता. बाजार बंद होताना सेन्सेक्स १५४ अंकांनी घसरला. The Indian market snapped a three-day winning streak and closed in the red on April 9. The Sensex closed 154 points lower at 49,591 and the Nifty lost 38 points to end at 14,834. Buying was seen in healthcare, FMCG, consumer durable and IT stocks

गुंतवणूकदारांनी सावधानता  बाळगावी व शक्यतो दीर्घकाळाकरिताच गुंतवणूक करावी

( मार्केट मध्ये गुंतवणूक करताना तज्ञ व्यक्तीचा सल्ला घ्यावा )

जितेश सावंत

शेअर बाजार तज्ञ,

Technical and Fundamental Analyst-Stock Market

jiteshsawant33@gmail.com

Despite a bullish signal from the US market, the Indian market got off to a disappointing start on Monday. The record-breaking daily increase in the number of coroners and the lockdown announced in some major states hit the capital markets on Monday. Sales began in the market. And then there was the news of putting oil on the fire. (Adding fuel to the fire) According to figures released by the Ministry of Health, the news that more than 1 lakh infected patients were added to the country in a single day on Sunday created an atmosphere of fear in the market. Maharashtra is at the forefront in daily outpatient growth. Corona is also spreading rapidly in Rajasthan and Karnataka.
In an advanced state like Maharashtra, or alternatively in Mumbai, the financial capital of the country, the government declared a weekend lockdown, causing panic in the industrial sector. And investors started selling chauffeurs
GS/PGB
12 april 2021

mmc

Related post