बहुप्रतिक्षित ‘पंचायत 3’ ची रिलीज डेट अखेर जाहीर

 बहुप्रतिक्षित ‘पंचायत 3’ ची रिलीज डेट अखेर जाहीर

मुंबई, दि. २ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : बहुप्रतिक्षीत वेब सीरिज ‘पंचायत 3’ ची (Panchayat Season 3 Release) रिलीज डेट अखेर जाहीर झाली आहे. मागील काही दिवसांपासून या वेब सीरिजची उत्सुकता ताणली गेली होती. प्राईम व्हिडीओनेदेखील युजर्सना कोडं देत तारीख कोणती असेल असा प्रश्न विचारला. त्यानंतर आज ‘पंचायत 3’ ची रिलीज डेट जाहीर झाल्यानंतर यु्जर्सकडून भन्नाट कमेंट्स येऊ लागल्या आहेत. एका युजर्सने म्हटले की, ‘देख रहे हो बिनोद, कैसे रिलीज डेट बताया जा रहा है।’ तर, एका युजरने अतिशय वाईट प्रमोशननंतर रिलीज डेट जाहीर केली. मागील काही दिवसांपासून प्राईम व्हिडीओकडून (Prime Video) ‘पंचायत 3’च्या रिलीज डेटबाबत हिंट दिली जात होती. त्यानंतर आज रिलीज डेटवरून पडदा उघडण्यात आला आहे. त्यामुळे फुलेरा गावातील मंडळींना भेटण्यास उत्सुक असणाऱ्या प्रेक्षकांना आता फक्त काही दिवसच प्रतीक्षा करावी लागणार आहे.

एका खेडेगावात घडणाऱ्या घटनांभोवती वेब सीरिजचे कथानक गुंफण्यात आले आहे. या वेब सीरिजचा पहिला सीझन 2020 मध्ये रिलीज झाला होता. या सीझनला तुफान प्रतिसाद मिळाला. त्यानंतर 2022 मध्ये दुसरा सीझन आला. या दुसऱ्या सीझनलाही तुफान प्रतिसाद मिळाला. आता ‘पंचायत’चा तिसरा सीझन (Panchayat Season 3) येणार आहे. या सीझनमध्ये मोठा ट्विस्ट येणार आहे. प्राईम व्हिडीओने आज आपल्या सोशल मीडिया हँडलवर ‘पंचायत 3’ची रिलीज डेट जाहीर केली आहे. ही वेब सीरिज आता 28 मे 2024 पासून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

SL/ML/SL

2 April 2024

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *