रुपेरी पडद्यावर उलगडणार कर्मवीर भाऊराव पाटील यांचा जीवनप्रवास

 रुपेरी पडद्यावर उलगडणार कर्मवीर भाऊराव पाटील यांचा जीवनप्रवास

मुंबई, दि. २ (एमएमसी न्यूज नेटवर्क) :

महाराष्ट्रातील खेडापाड्यातर, बहुजन-वंचित समाजामध्ये शिक्षणाची ज्ञानगंगा पोहोचवण्याचा प्रयत्न करणारे कर्मवारी भाऊराव पाटील (Karmaveer Bhaurao Patil) यांचा जीवनपट आता रुपेरी पडद्यावर साकारणार आहे. रयत शिक्षण संस्थेच्या माध्यमातून कर्मवीर अण्णांनी राज्यातील लाखो विद्यार्थ्यांना शिक्षण दिले. कर्मवीरांचा जीवनपट मांडणाऱ्या “कर्मवीरायण” या चित्रपटाने अनेक चित्रपट महोत्सव गाजवल्यानंतर प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.महाराष्ट्राच्या खेडोपाडी शिक्षणाचा प्रसार करणाऱ्या, रयत शिक्षण संस्थेच्या माध्यमातून गरीब, गरजू, कष्टकऱ्यांच्या मुलांना शिक्षणाच्या प्रवाहात आणणारे शिक्षण महर्षी कर्मवीर भाऊराव पाटील यांचं जीवनचरित्र आता मोठ्या पडद्यावर येत आहे. अभिनेते किशोर कदम यांनी कर्मवीरांची भूमिका साकारली आहे. अनेक महोत्सवांमध्ये गौरवलेला हा चित्रपट आता 17 मे पासून महाराष्ट्रात प्रदर्शित होत आहे. कर्मवीर अण्णांच्या जीवनातील काही निवडक प्रसंग आणि घटना यांचा समावेश या चित्रपटात करण्यात आला आहे.

ट्रान्सएफएक्स स्टुडिओज प्रा. लि. यांनी निर्मिती केलेल्या “कर्मवीरायण” चित्रपटाची प्रस्तुती 7 वंडर्सचे पुष्कर मनोहर यांनी केली आहे. धनंजय भावलेकर यांनी चित्रपटाचं दिग्दर्शन केलं आहे. अनिल सपकाळ आणि धनंजय भावलेकर यांनी चित्रपटाची पटकथा लिहिली आहे. किशोर कदम, सुहास शिरसाट, उपेंद्र लिमये, देविका दफ्तरदार, उषा नाईक अशा दिग्गज कलाकारांचा समावेश या चित्रपटात असणार आहे

भाऊराव पाटील यांनी शिक्षणाचं महत्त्व ओळखून ग्रामीण भागात शिक्षण संस्था सुरू करण्याचा निर्णय घेतला. त्या काळात समाजात वर्चस्ववाद बोकाळला होता. त्यामुळे गरीब आणि बहुजनांची मुले शिक्षणापासून वंचित राहत होती. त्या मुलांनाही शिकण्याचा समान हक्क आहे असा भाऊराव पाटील यांचा ठाम विचार होता. त्या काळी अनेक लोकांनी भाऊरावांना विरोध केला. मात्र विरोधाला ज जुमानता शिक्षणाच्या प्रसाराचं कार्य सुरूच राहिलं आणि विविध शिक्षण संस्था उभ्या राहिल्या. शहरातील विद्यार्थ्यांप्रमाणेच ग्रामीण भागातील विद्यार्थीही शिक्षणाकडे वळू लागले. त्यामुळेच ग्रामीण भागातील साक्षरतेचे प्रमाण वाढण्यास मदत झाली. महाराष्ट्राला शिक्षणाच्या मार्गावर नेणारे भाऊराव कर्मवीर झाले. शिक्षणासाठी धडपडणाऱ्या एका ऋषीतुल्य व्यक्तिमत्त्वाचा जीवनपट आता चित्रपटाद्वारे पाहता येणार आहे.

ML/ML/SL

2 May 2024

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *