आशिया कपसाठी टीम इंडियाची घोषणा

 आशिया कपसाठी टीम इंडियाची घोषणा

मुंबई, दि. २१ (एमएमसी न्यूज नेटवर्क) :

बऱ्याच कालावधीनंतर भारत-पाकीस्तान क्रिकेट संघ आमने सामने येणार असल्याने आशिया कप स्पर्धेकडे क्रिकेट चाहत्यांचे लक्ष लागून राहीले आहे.३० ऑगस्टपासून पाकीस्तान आणि श्रीलंकेत घेतल्या जाणाऱ्या आशिया कप स्पर्धेसाठी आज
BCCI ने टीम इंडियाची घोषणा केली. संघाचे कर्णधारपद रोहित शर्माकडे सोपवण्यात आले आहे. हार्दिक पांड्या संघाचा उपकर्णधार असेल. विकेटकीपर केएल राहुल आणि श्रेयस अय्यर टीम इंडियात परतले आहेत. त्याचबरोबर फिरकीपटू युजवेंद्र चहलला संघात स्थान मिळालेले नाही. मात्र, वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह आशिया कपमध्ये खेळणार आहे.फलंदाज सूर्यकुमार यादव आणि तिलक वर्मा यांची सर्वाधिक चर्चेत असलेल्या क्रमांक-4 वर निवड झाली आहे.

आशिया कपसाठी टीम इंडिया

रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल, विराट कोहली, केएल राहुल, श्रेयस अय्यर, तिलक वर्मा, सूर्यकुमार यादव, ईशान किशन, हार्दिक पंड्या (उपकर्णधार), जडेजा, शार्दुल ठाकूर, अक्षर पटेल, कुलदीप यादव, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज, मोहम्मद शमी आणि प्रसिद्ध कृष्णा.

बॅकअप यष्टिरक्षक- संजू सॅमसन.

आशिया चषक 30 ऑगस्टपासून पाकिस्तान आणि श्रीलंकेत खेळवला जाणार आहे. भारताचा पहिला सामना 2 सप्टेंबरला पाकिस्तानशी होणार आहे. या स्पर्धेत भारताला पाकिस्तान आणि नेपाळसह अ गटात ठेवण्यात आले आहे. त्याचबरोबर ब गटात श्रीलंका, बांगलादेश आणि अफगाणिस्तानला स्थान देण्यात आले आहे.

यष्टिरक्षक राहुलसह ईशानचा समावेश
ईशान किशनची यष्टिरक्षक म्हणून संघात निवड करण्यात आली. शुभमन गिल वरच्या फळीत रोहित शर्मासोबत असेल. बॅकअप यष्टिरक्षक म्हणून संजू सॅमसन श्रीलंकेला जाणार आहे.

राहुलने या वर्षी 22 मार्च रोजी भारतासाठी शेवटची वनडे खेळली होती. यानंतर तो आयपीएल खेळायला गेला, पण मेमध्ये क्षेत्ररक्षण करताना दुखापत झाली. यानंतर त्याच्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली आणि आता तो पूर्णपणे तंदुरुस्त असून आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळण्यासाठी तयार आहे.

SL/KA/SL

21 Aug 2023

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *