टाटा पॉवरकडून वीज दरात मोठी कपात

मुंबई, दि. २९ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : उन्हाळ्याच्या तीव्र झळा सोसणाऱ्या मुंबईकरांसाठी एक दिलासादायक बातमी टाटा पॉवरने दिली आहे. महाराष्ट्र वीज नियामक आयोगाने (MERC) आर्थिक वर्ष २०२५-२६ ते आर्थिक वर्ष २०२९-३० साठीच्या बहु-वर्षीय दर (MYT) प्रस्तावाला मान्यता दिल्यानंतर आता टाटा पॉवरकडून देखील वजी दरात कपात केली जाणार आहे, ज्याचा फायदा मुंबईतील तब्बल ८ लाख ग्राहकांना होणार आहे, पाच वर्षांमध्ये २८ टक्के एवढी वीज दरात कपात होणार आहे.
महाराष्ट्र वीज नियामक आयोगाने (MERC) आर्थिक वर्ष २०२५-२६ ते आर्थिक वर्ष २०२९-३० साठीच्या बहु-वर्षीय दर (MYT) प्रस्तावाला मान्यता दिल्यानंतर, शहराच्या उपनगरीय भागात टाटा पॉवरचे देखील ०-१०० kWh आणि १००-३०० kWh श्रेणीतील दर कमी केले जाणार आहेत.
टाटा पॉवरचे सरासरी दर हळूहळू कमी होत जाणार आहेत, जे कि ९. १७ रुपये प्रति kWh वरून २०२९-३० या आर्थिक वर्षांमध्ये ६ . ६३ रुपये प्रति kWh पर्यंत कमी होतील, याचाच अर्थ पुढील पाच वर्षांत २८ टक्के कपात वीज दरामध्ये केली जाणार आहे.
SL/ML/SL
29 March 2025