भांडवली(stock market )बाजारात प्रचंड चढउतार. डेल्टा विषाणू व क्रूड ऑइल मधील भाववाढीचे बाजारावर सावट
मुंबई, दि. 3 (एमएमसी न्यूज नेटवर्क) :या आठवड्यात बाजारावर कच्या तेलाच्या(Crude oil) भावातील वाढ,अर्थमंत्र्यानी केलेल्या घोषणा,डेल्टा विषाणूचे सावट(Delta variant) व त्यामुळे काही देशात नव्याने जाहीर झालेले प्रतिबंध व डीसीजीआयने सिप्ला कंपनीला मॉर्डना कंपनीच्या लसीच्या आयातीची दिलेली परवानगी(DCGI nod to import Moderna’s Covid vaccine) या सगळ्याचा प्रभाव राहिला. येणाऱ्या काळात गुंतवणूकदारांनी सावधानता बाळगावी व खालच्या स्तरावर दीर्घकाळाकरीताच गुंतवणूक करावी.
पहिल्याच दिवशी बाजार बंद होताना घसरला,अर्थमंत्र्यानी केल्या महत्वाच्या घोषणा. Markets end lower with Nifty below 15,850 amid Finance Minister Sitharaman announced another stimulus package.
सोमवारी बाजाराने सुरुवातीला विक्रमी स्तरावर झेप घेतली निफ्टीने १५९१५चा स्तर गाठला. शुक्रवारी अमेरिकन बाजारात सुद्धा तेजी होती व त्याचे पडसाद सकाळी भारतीय बाजारात उमटले परंतु हि तेजी टिकली नाही कारण सलग पाचव्या आठवड्यात आंतरराष्ट्रीय बाजारात कच्या तेलाच्या भावाने गाठलेले शिखर (क्रूड ऑइल प्रति डॉलर ७६, ऑक्टोबर २०१८ चे भाव) व आशियाई खंडात कोरोनाच्या रुग्णसंख्येत झालेली थोडी वाढ. अर्थमंत्री सीतारामन यांच्यादुपारी होणाऱ्या पत्रकार परिषदेच्या घोषणेमुळे बाजारात जोश भरला,सरकारी बँकांमध्ये तेजी पसरली.Tata Steel, Axis bank, DRL आणि HUL ने बाजारात जोश भरला. अर्थव्यवस्थेला चालना देण्याकरिता अर्थमंत्र्यांनी काही घोषणा केल्या विविध उद्योगांना मिळून तब्बल ६ लाख २८ हजार ९९३ कोटींची घोषणा आज सीतारामन यांनी केली. आरोग्य सेवा, कृषी, निर्यात, पर्यटन, कारखाना उत्पादन, उर्जा क्षेत्राला याचा लाभ मिळणार आहे. पर्यटन क्षेत्राला चालना देण्यासाठी 5 लाख पर्यटकांना मोफत व्हिसा देण्याचीही घोषणा केली. बाजार बंद होताना घसरला निफ्टीने १५,८०० चा भाव टिकवण्यात यश मिळवले Sensex, Nifty Decline Led By Losses In Infosys, TCS, Reliance Industries
सलग दुसऱ्या दिवशी बाजारात घसरण निफ्टीने १५,८०० च्या खाली दिला बंद भाव. Markets end lower in the second consecutive session with Nifty below 15,750.
मंगळवारी वैश्विक बाजारात संमिश्र संकेत होते.अमेरिकन बाजाराने सलग तिसऱ्या दिवशी विक्रमी बंद दिला. परंतु आशियाई बाजार नरम होते.भारतीय बाजाराची सुरुवात देखील सपाट झाली.अर्थमंत्र्यांनी जाहीर केलेल्या आर्थिक मदतीमुळे हॉटेल व एविएशन शेअर्स मध्ये तेजी होती. बाजारात सलग दुसऱ्या दिवशी नफावसुली झाली. डेल्टा या नवीन कोरोना विषाणूच्या व्हेरिएंटच्या रुग्णसंख्येतील वाढ तसेच एशिया,युरोप,साऊथ आफ्रिका,साऊथ अमेरिका येथे नव्याने जाहीर झालेले प्रतिबंध याचा परिणाम बाजारावरती जाणवला, गुंतवणूकदार थोडे धास्तावले व याचा परिणाम म्हणून मार्केट खाली आले.फार्मा(Pharma) व एफएमसीजी(FMCG) वगळता सगळे इंडेक्स लाल होते. निफ्टीतील IOC, ONGC, Hindalco, Kotak Mahindra Bank आणि Coal India हे शेअर्स घसरले व Power Grid Corp, Cipla, HUL, NTPC आणि Divis Labs हे शेअर्स वधारलॆ. बाजार बंद होताना सेन्सेक्स १८५.९३ अंकांनी घसरून ५२,५४९. ह्या स्तरावर बंद झाला व निफ्टी ६६.२५ अंकांनी घसरून १५,७४८.४५चा बंद दिला. Markets fall for second straight session dragged by losses in banking shares as they came under selling pressure.
अमेरिकेमधील मॉर्डना कंपनीची लस लवकरच भारतात उपलब्ध होईल डीसीजीआयने सिप्ला कंपनीला मंगळवारी दिली आयातीची परवानगी.Cipla gets DCGI nod to import Moderna’s Covid vaccine for restricted emergency use in India.
दुपारच्या सत्रात नफावसुली झाल्याने निफ्टीने तोडला १५,८००चा स्तर.Profit booking hits Nifty
ग्लोबल बाजारातील मजबूत संकेतानुसार बुधवारी बाजाराची सुरुवात मजबूत झाली.रुपयाची सुरुवात नरमाईने झाली.चीन,जपान,कोरीया,युक्रेन येथून इम्पोर्ट होणाऱ्या स्टील वर लागणाऱ्या अँटी डम्पिंग ड्युटी ला मुदतवाढ मिळाल्याने JSPL, SAIL, TATA STEEL हे शेअर्स चमकले.Centre extends antidumping duty on certain steel items till Dec 15. बाजाराचे लक्ष गुरुवारी जाहीर होणाऱ्या वाहन विक्रीच्या आकड्यांवरती सुद्धा होते. बाजारात दुपारच्या सत्रात जोरदार विक्री झाली. Reuters च्या एका रिपोर्ट नुसार कोरोनाचे आकडे पुन्हा वाढताना दिसत आहेत व यूएस जॉब डेटा जाहीर होण्याअगोदर युरोपियन व अमेरिकन बाजारात अनिश्चिततेचे वातावरण आहे असे नमूद केले होते त्यामुळे यूएस इंडेक्स फ्युचर घसरले,भारतीय बाजार देखील घसरले. निफ्टीने १५,७२१ व सेन्सेक्सने ५२,४८२ चा बंद दिला. Markets erase all the intraday gains and end lower in the highly volatile session. Sensex, Nifty end lower amid volatility.
विकली एक्सपायरीच्या दिवशी बाजारात चढउतार बाजार बंद होताना घसरला. Markets settle in the negative territory in the highly volatile session.
गुरुवारी विकली एक्सपायरीच्या दिवशी बाजरीची सुरुवात चांगली झाली परंतु बाजार बढत कायम ठेवण्यात अयशस्वी ठरला सलग चौथ्या दिवशी बाजारात नफावसुली सुरुच होती. रुपयाची सुरुवात देखील कमजोरीने झाली.बाजार एक्सपायरीच्या दिवशी सुस्त होता. auto, FMCG, pharma आणी PSU bank ह्या क्षेत्रात खरेदी झाली.Dr Reddys Labs, Hindalco Industries, Bajaj Auto, Tata Motors आणि Sun Pharma हे निफ्टीतील टॉपचे शेअर्स ठरले.बाजार बंद होताना सेन्सेक्स १६१ अंकांनी घसरून ५२,३१८. ६० ह्या स्तरावर बंद झाला तर निफ्टीने ४१.५० अंक घसरून १५,६८० चा बंद भाव दिला. Dalal Street investors continued to stay on the sidelines as new Delta and Delta plus variants of novel coronavirus push Covid-19 cases higher across the globe. Markets settle in the negative territory in the highly volatile session.
सलग चार दिवसांच्या मंदी नंतर आठवड्याच्या शेवट तेजीने Markets snap the four day losing streak and end higher in the volatile session.
आशियाई आणि अमेरिकन बाजारातून आलेल्या चांगल्या संकेतामुळे शुक्रवारी भारतीय बाजाराची सुरुवात चांगली झाली.डॉलरच्या तुलनेत रुपयाची सुरुवात मात्र कमजोरीने झाली.बाजारातील कामकाजात दिवसभरात फारच चढउतार होते.फार्मा क्षेत्रात तेजी होती.AURO PHARMA,LUPIN, DIVIS,NATCO या कंपन्यांच्या शेअर्स मध्ये वाढ झाली. सलग चार दिवसांच्या मंदी नंतर आठवड्याच्या शेवटच्या दिवशी बाजार बढत घेऊन बंद झाला. सेन्सेक्सने ५२,४८४. ६७ व १५,७२२ चा बंद भाव दिला. Markets snap their four-day losing run and end near day’s high as gains in pharma and banking counters, and select heavyweights lent support to the indices.
(मार्केट मध्ये गुंतवणूक करताना तज्ञ व्यक्तीचा सल्ला घ्यावा )
जितेश सावंत
शेअर बाजार तज्ञ,
Technical and Fundamental Analyst-Stock Market
jiteshsawant33@gmail.com
JS/KA/PGB
1 July 2021