पावसाने ओढ दिल्यामुळे शेतकरी संकटात

 पावसाने ओढ दिल्यामुळे शेतकरी संकटात

पुणे, दि. 3 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : पावसाचा सलग बारा ते पंधरा दिवस खंड पडल्यामुळे राज्यतील लाखो हेक्टर क्षेत्रावरील पिके कोमेजू लागली आहेत. शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे संकट उभे टाकल्याने तो अडचणीत आला आहे .Farmers in crisis due to rains राज्यात अनेक ठिकाणी खरीपाच्या पेरण्या पूर्ण झाल्या, मात्र पावसा अभावी माळरानावरील पेरण्या पूर्णपणे थांबल्या आहेत.
दोन पावसातील अंतराने शेतकरीवर्ग एकीकडे हबकून गेला आहे. पावसाच्या भरवशावर शेतकऱ्यांनी खरीपाच्या पेरण्या केल्या. पण पावसाअभावी लोकांची पंचाईत झाली आहे. ज्यांच्याकडे सिंचनाची व्यवस्था आहे, असे शेतकरी स्प्रिंकलरने अथवा अन्य मार्गाने पाणी देण्यासाठी धावाधाव करीत आहेत. मध्य आणि उत्तर पश्चिम महाराष्ट्रात स्थिती जास्त खराब होते आहे .The gap between the two rains has left the farmers in a state of shock. Relying on rains, farmers sowed kharif crops. But due to lack of rain, there is a shortage of people. Farmers who have irrigation systems are rushing to irrigate by sprinklers or other means. The situation is getting worse in Central and North West Maharashtra.
राज्यातील लघु आणि मध्यम पाटबंधारे प्रकल्पात जेमतम पाणी शिल्लक आहे. त्यामुळे मोठ्या जिरायती क्षेत्रात पाण्याचा प्रश्न गंभीर बनला आहे. पुढील आठ दिवस पाऊस जोर धरण्याची शक्यता नसल्याचे हवामान खात्याने म्हटले आहे, तरी शेतकऱ्यांचे लक्ष आभाळाकडे लागून राहिले आहे. गेला आठवडाभर ढगाळ वातावरण आहे पण पाऊस पडत नाही. मका, ज्वारी , बाजरी , भुईमूग, सोयाबीन , तूर , कापूस इत्यादी पिकांचे मोड येण्यापूर्वीच पुरेशी ओल नसल्यामुळे मोड कोमेजू लागले आहेत. केवळ त्याकडे पहात राहण्या शिवाय शेतकऱ्यांपुढे दुसरा पर्याय राहिलेला नाही.
जून महिन्यात सुरुवातीला चांगल्या पावसाची नोंद झाली, पण जुलै महिन्यात त्याचे सरासरी प्रमाण कमी राहण्याची शक्यता आहे. जुलै महिन्यात केवळ 96 ते 98 टक्के पावसाचा अंदाज हवामान खात्याने दिला आहे. पावसाने दीर्घकाळ उघडीप दिल्यामुळे पेरणी केलेल्या पिकाबाबत भवितव्याचा प्रश्न निर्माण झाला आहे.The state’s small and medium irrigation projects have the same water balance. Therefore, the problem of water has become serious in large agricultural areas. The meteorological department has forecast no heavy rains for the next eight days, but farmers are keeping a close eye on the sky. It has been cloudy for the last week but it is not raining. Maize, sorghum, millet, groundnut, soybean, tur, cotton, etc., have started to wither due to insufficient moisture before the onset of the crop. Farmers have no choice but to keep looking at it.
ML/KA/PGB
3 July 2021

mmc

Related post