शेअर बाजारात (Stock Market) 8 महिन्यांतील सर्वात मोठी साप्ताहिक घसरण

 शेअर बाजारात (Stock Market) 8 महिन्यांतील सर्वात मोठी साप्ताहिक घसरण

मुंबई, दि. 25 (जितेश सावंत):  मागील आठवड्यातील चांगल्या वाढीनंतर , 24 फेब्रुवारीला संपलेल्या आठवड्यात भारतीय भांडवली बाजारात घसरण होताना दिसली.निर्देशांक 2.5 टक्क्यांनी घसरले.या आठवड्यात सेन्सेक्स 1,530 अंकांनी घसरला, गेल्या 8 महिन्यांतील ही सर्वात मोठी घसरण ठरली.

जागतिक बाजाराचे परिणाम,वाढत्या महागाईवर नियंत्रण ठेवण्यासाठी अधिक दर वाढ दर्शवणारे फेड मिनिट्स , यामुळे FII ची झालेली विक्री, व युक्रेनमधील युद्धावर रशियाने पाश्चिमात्य देशाना पुन्हा एकदा अण्वस्त्र हल्ल्याची दिलेली धमकी या सगळ्याच्या परिणाम बाजारावर होताना दिसला.

अदानी समूहाच्या शेअर्सची सातत्याने होत असलेली पिटाई हे देखील एक कारण ठरले यामुळे गुंतवणूकदारांच्या भावना विचलित झाल्या. सलग सहाव्या दिवशी तोटा नोंदवून देशांतर्गत बाजारपेठात आत्मविश्वासाचा अभाव दिसला. शुक्रवारी यूएस स्टॉकमध्ये देखील झपाट्याने घसरण झाली, गेला आठवडा अमेरिकन बाजारासाठी 2023 मधील सर्वात वाईट आठवडा ठरला.

मार्केटमध्ये येणाऱ्या काळात प्रचंड चढउतार दिसतील ३१ डिसेंबरच्या लेखात नमूद केल्याप्रमाणे जागतिक व्याजदर वाढ,,९ राजांच्या विधानसभा निवडणुका,अमेरिकेची अर्थव्यवस्था या सगळ्याच्या परिणाम येणाऱ्या वर्षभरात जाणवेल म्हणून गुंतवणूकदारानी सातत्याने व दीर्घकाळाकरिता चांगल्या समभागात गुंतवणूक करावी.

येणाऱ्या आठवड्यात गुंतवणूकदारांचे लक्ष २८ फेब्रुवारी रोजी जाहीर होणाऱ्या भारताचे GDP व FISCAL DEFICIT चे आकडे या आकडे तसेच FII च्या वाटचालीकडे असेल.

Technical view on nifty-शुक्रवारी निफ्टीने 17421 चा तळ गाठला. पुढील आठवड्यात निफ्टीसाठी 17353 हा स्तर अत्यंत महत्वपूर्ण राहील जर ही पातळी तोडली तर 17315-17287-17217-17188-17147-17112-16957 हे स्तर निफ्टी गाठू शकेल त्याचप्रमाणे वर जाण्याकरिता 17517-17691-17720-17753-17772 हे महत्वपूर्ण स्तर पार करावे लागतील.

मार्केट ओव्हरसोल्ड आहे परंतु टेक्निकली कमकुवत आहे. मार्केट बाउन्सबॅक होताना दिसेल परंतु वरच्या स्तरावर विक्रीचा मारा होताना दिसेल.

सेन्सेक्स ३११ अंकांनी घसरला. Sensex falls 311 points
आठवड्याच्या पहिल्याच दिवशी आणि सलग दुसऱ्या दिवशी बाजारात घसरण पाहावयास मिळाली. सपाट सुरुवातीनंतर बाजाराने गती पकडली फर्स्ट हाफ मध्ये बाजार तेजीत होता परंतु आयटी आणि ऑटो वगळता खास करून बँक आणि वित्तीय समभागांमध्ये झालेल्या विक्रीमुळे आज बाजाराचा मूड खराब झाला. बुधवारी फेड मिनिट्स रिलीझ होण्याआधी बाजारात कमकुवतपणा जाणवला.दिवसभराच्या अखेरीस सेन्सेक्स 311 अंकांनी घसरून 60,691 वर बंद झाला.

दुसरीकडे निफ्टीत 99 अंकांची घट होऊन निफ्टीने 17,844 चा बंद दिला.
बाजाराचा सपाट बंद. Market ends flat
अत्यंत चांगल्या पद्धतीने बाजाराची सुरुवात होऊन देखील जागतिक बाजारातील नकारात्मकतेची छाया भारतीय बाजारावर पडली. यूएस फेडच्या बैठकीवर लक्ष ठेवून असल्याने गुंतवणूकदार थोडे नर्व्हस दिसले चलनवाढीची चिंता व एल निनोची भीती बाजारावर साफ दिसत होती.

दिवसभराच्या अखेरीस सेन्सेक्स 18अंकांनी घसरून 60,672 वर बंद झाला.दुसरीकडे निफ्टीत 17 अंकांची घट होऊन निफ्टीने 17,826 चा बंद दिला.सेन्सेक्स ९२८ अंकांनी कोसळला.
Sensex crashes 928 points बुधवारी सलग चौथ्या दिवशी नकारात्मक जागतिक संकेतांमुळे देशांतर्गत बाजारातील गुंतवणूकदार बॅकफूट वर दिसले. मध्यवर्ती बँकांद्वारे आणखी दर वाढ आणि युक्रेनमधील युद्धावर रशियाने पाश्चिमात्य देशाना पुन्हा एकदा अण्वस्त्र हल्ल्याची धमकी दिल्याने गुंतवणूदारांच्या चिंतेत भर पडली.

रिझव्‍‌र्ह बँक ऑफ इंडिया आणि यूएस फेडरल रिझव्‍‌र्हच्या धोरणात्मक बैठकांचे इतिवृत्त जाहीर होण्याआधी गुंतवणूकदारांनी सावधगिरी बाळगली. सेन्सेक्स ९०० अंकांहून अधिक गडगडला, बाजारातील दोन महिन्यांतील एका दिवसातील सर्वात मोठ्या घसरणीने गुंतवणूकदारांची ३.७ लाख कोटी रुपयांची संपत्ती नष्ट झाली.
दिवसभराच्या अखेरीस सेन्सेक्स 927 अंकांनी घसरून 59,744 वर बंद झाला.दुसरीकडे निफ्टीत 272 अंकांची घट होऊन निफ्टीने 17,554 चा बंद दिला.

निफ्टी, सेन्सेक्स गुरुवारी लाल रंगात बंद झाला. Nifty, and Sensex ended in the red on Thursday
भारतीय इक्विटी बाजारांनी सलग पाचव्या दिवशी घसरणीचा सिलसिला सुरु ठेवला.नकारात्मक जागतिक संकेत व रिझव्‍‌र्ह बँक ऑफ इंडियाच्या चलनविषयक धोरण समिती तसेच यूएस फेडरल रिझर्व्हच्या समितीने केलेल्या टिप्पण्यांमुळे गुंतवणूकदार घाबरले.दिवसभराच्या अखेरीस सेन्सेक्स 139 अंकांनी घसरून 59,605 वर बंद झाला.दुसरीकडे निफ्टीत 43 अंकांची घट होऊन निफ्टीने 17,511 चा बंद दिला.

निफ्टी १७,५०० च्या खाली.Nifty slips below 17,500
आठवड्याच्या शेवटच्या दिवशी चांगली सुरुवात केल्यानंतर, बाजार पहिले दोन तास सकारात्मक राहिला तथापी, दुपारच्या सत्रात प्रॉफिट बुकींगने सुरुवातीचा नफा खोडून काढला त्यामुळे विक्रीचा जोर वाढला.मार्च सिरीजच्या पहिल्या ट्रेडिंग सत्रात निफ्टीत १७,४०० च्या पातळी पर्यंत घसरण झाली. भारतीय बेंचमार्क निर्देशांक सलग सहाव्या दिवशी घसरले. महागाईला आळा घालण्यासाठी यूएस फेडरल रिझर्व्हने व्याजदर आणखी वाढवण्याच्या भीतीने प्रमुख शेअर निर्देशांकांनी शुक्रवारी लवकर नफा गमावला.

दिवसभराच्या अखेरीस सेन्सेक्स 141 अंकांनी घसरून 59,463 वर बंद झाला.दुसरीकडे निफ्टीत 45 अंकांची घट होऊन निफ्टीने 17,465 चा बंद दिला.

(लेखकशेअरबाजार तज्ञ, तसेच Technical and Fundamental Analyst आहेत.)

jiteshsawant33@gmail.com

ML/KA/PGB
25 Feb. 2023

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *