वैश्विक बाजारातील पडझडीमुळे सलग दुसऱ्या आठवड्यात भारतीय भांडवली बाजारात (StockMarket) घसरण.

 वैश्विक बाजारातील पडझडीमुळे सलग दुसऱ्या आठवड्यात भारतीय भांडवली बाजारात (StockMarket) घसरण.

मुंबई, दि. 10 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : या आठवड्यात बाजारावर फेडरल रिझर्व्हचे संकेत,अमेरिका व ऑस्ट्रेलिया येथे डेल्टा विषाणूचा वाढत असलेला प्रभाव,हॉंगकॉंग मधील बाजाराची घसरण,जपान मधील ऑलिम्पिकच्या पार्श्वभूमीवर जाहीर झालेली आणीबाणी,युरोपियन सेंट्रल बँकेची पॉलिसी,रुपयातील चढउतार,कच्या तेलाचे (Crude oil) भाव,केंद्रीय मंत्रिमंडळातील बदल, पावसाने मारलेली दडी. या सगळ्याचा प्रभाव राहिला. या आठवड्यात बाजारात खूप चढउतार होते. येणाऱ्या काळात गुंतवणूकदारांनी सावधानता बाळगावी व खालच्या स्तरावर दीर्घकाळाकरीताच गुंतवणूक करावी. Market erased gains and ended marginally lower for the week , worries over the third coronavirus wave weighed on investor sentiment
 
आठवड्याच्या पहिल्याच दिवशी बाजारात तेजी. . Markets stage a strong up move led by gains in banking and financial services shares.
 
आठवड्याच्या पहिल्याच दिवशी भारतीय भांडवली बाजाराची सुरुवात दमदार झाली.अमेरिकेतील मजबूत रोजगारीचे आकडे हे अर्थव्यवस्था(Economy) सुधारत आहे याचे लक्षण आहे व फेडरल रिझर्व्ह व्याज दर लवकर वाढवणार नाही अशी बाजाराची भावना झाली.मेटल ,ऑटो,बँकिंग, एफएमसीजी या क्षेत्रातील शेअर्स मध्ये जोश होता.रुपयात थोडी सुधारणा झाली,बाजाराच्या वाढीकरीता ती अनुकूल ठरली. कामकाजाच्या शेवटी सेन्सेक्स ३९५. ३३ अंकांनी वधारून ५२,८०० ह्या स्तरावर बंद झाला व निफ्टीने ११२.१५ अंकांची बढत घेऊन १५,८३४.३५ हा बंद भाव दिला. Market bulls were back on Dalal Street, after a volatile week, as an across-the-board buying kept benchmarks parked near day’s high levels.
 
बाजाराची विक्रमी स्तरावरून घसरण. Sensex, Nifty end flat, fail to hold record level
 
मंगळवारी आशियाई बाजाराची सुरुवात मजबूत झाली.DOW FUTURES पण वरती होते. INDEPENDENCE DAY च्या कारणामुळे सोमवारी अमेरिकन बाजार बंद होते. भारतीय बाजाराची सुरुवात सपाट झाली पण लवकरच बाजारात तेजी पसरली.सलग तिसऱ्या दिवशी बाजारात तेजीचा माहोल होता.एव्हिएशन सेक्टरला थोडा दिलासा मिळाला. देशांतर्गत प्रवासासाठी . विमान प्रवाश्यांची क्षमता वाढवून ६५% पर्यंत केली.(Government increases domestic flight capacity to 65% from 50%).सिमेंट सेक्टर मध्ये तुफान तेजी होती.AMBUJA , JK LAKSHMI CEMENT, GUJARAT SIDHEECEMENT हे शेअर्स ७ते ८ टक्क्यांनी वाढले.AMBUJA सिमेंट ALL TIME HIGH वर पोहोचला. ऑटो (Auto).आय.टी(I.T).फार्मा(Pharma) आणि मेटल(Metal) ह्या क्षेत्रातील शेअर्स मधील दबावामुळे बाजार रेकॉर्ड स्तरावरून घसरला.दिवसभरात सेन्सेक्सने ५३,१२९.३७ चा विक्रमी स्तर नोंदवला व निफ्टीने १५,९१५.६५ चा नवीन विक्रम केला. After hitting fresh record levels, markets end flat drag by the auto, IT, metal and pharma names.
 
बुधवारी विदेशी बाजार कमजोर होते. आशियाई बाजारात सुद्धा दबाव होता.अमेरिकन मार्केटमध्ये ७ दिवसांच्या तेजीनंतर घसरण झाली. बॉण्ड यील्ड खाली आल्यामुळे सोन्याची चमक वाढली. बाजरीची सुरुवात सपाट झाली.रुपयाची सुरुवात देखील नरमाईनेच झाली. बाजारा कन्सॉलिडेशन च्या मूड मध्ये होता. बँकिंग,बांधकाम या क्षेत्रात जोरदार खरेदी दिसली.SOBHA कंपनीने Q1 चे अपडेट दिल्याने शेअर मध्ये ७-८टक्क्यांपर्यंत वाढ झाली. ब्रोकिंग कंपन्यांमध्ये हि चांगलीच तेजी होती ANGEL BROKING, GEOJIT FINANCIAL, MOTILAL OSWAL ह्यांचे शेअर्स ७-८ व वाढले. टाटा मोटर्सचे शेअर्स सलग दुसऱ्या दिवशी घसरले,Jaguar Land Rover चे पार्ट्स मिळत नसल्याने सप्टेंबर तिमाहीचे आकड्यात घट होणार असल्याने शेअर्स पडले. बाजाराचे लक्ष केंद्रीय मंत्रिमंडळाच्या विस्ताराकडे होते. बाजार बंद होताना सेन्सेक्स १९३.५८ अंकांनी वाढून ५३,०५४. ७६च्या स्तरावर बंद झाला तर निफ्टीने ६१. ४०अंकांची वाढ घेऊन १५,८७९१. ६५चा बंद दिला. Markets end higher in the volatile session with Nifty above 15,850. Markets inched higher in noon deals after spending majority of the session in a range bound trade.
 
जागतिक बाजारातील कमजोरीचा भारतीय बाजारावरती परिणाम. Global sell-off grips D-Street; Sensex plunges 486 pts, Nifty holds 15,700
 
गुरुवारी जागतिक बाजारातील कमजोरीचा परिणाम भारतीय बाजारावरती जाणवत होता. वीकली एक्सपायरी असल्यामुळे सकाळपासून बाजारात दबावाचे वातावरण होतेRIL, HDFC BANK, आणि HUL ह्या शेअर्स मधील घसरणीमुळे बाजारातील दबाव वाढला.बांधकाम क्षेत्रातील समभागात मात्र तेजीचे वातावरण होते SOBHA, INDIABULL REAL हे शेअर्स चांगलेच वधारले. गुरुवारी हॉंगकॉंग मधील बाजार ६ महिन्याच्या खालच्या स्तरावर पोहोचला.युरोपियन सेंट्रल बँकेच्या(ECB)महागाई व वातावरणातील बदल ह्या संबंधीच्या पॉलिसी रिव्ह्यूच्या अगोदर तेथील बाजरात कमजोरी वाढली.अमेरिका व ऑस्ट्रेलिया येथे डेल्टा विषाणूच्या केसेस वाढत असल्यामुळे चिंतेचे वातावरण होते.अमेरिकत लवकरच बॉण्ड बाईंग मध्ये कपात होण्याची शक्यता असल्याचे संकेत फेडरल रिझर्व कडून आल्याने बाजारचा आत्मविश्वास डगमगला.अमेरिकेतील बाजारातील निर्देशांक डाऊचे फ्युचर(Dow Future) ४०० अंकांनी घसरले या सगळ्याच्या परिणाम भारतीय बाजारावरती दिसला दिवसभरात सेन्सेक्स ६०० अंकांनी गडगडला. Sensex, Nifty Register Biggest Single-Day Drop In Nearly Two Months.
 
घरापर्यंत खाद्यपदार्थ पोहोचवण्याची ऑन लाईन सेवा देणाऱ्या झोमॅटो या कंपनीच्या लवकरच भांडवली बाजारात प्रवेश. The initial public offering (IPO) of online food delivery platform Zomato will open on Wednesday, July 14, 2021
 
जगातील विषाणूच्या वाढत्या प्रभावामुळे सलग दुसऱ्या आठवड्यात बाजारात तोटा. Sensex, Nifty Log Second Weekly Loss Amid Global Virus Worries.
 
अमेरिकन बाजारातील घसरण तसेच आशियाई बाजारातील पडझड या पार्श्वभूमीवर शुक्रवारी भारतीय बाजाराची सुरुवात कमजोर झाली. बाजारात प्रचंड चढ उताराचे वातावरण होते. डेल्टा विषाणूच्या वाढत असल्यामुळे प्रभावामुळे गुंतवणूकदारांमध्ये चिंतेचे वातावरण पसरले.सलग दुसऱ्या दिवशी बाजारात घसरण झाली. ऑटो आणि बँकिंग क्षेत्रात दबाव होता. कालच्या घसरणीनंतर आज मेटल सेक्टर मध्ये थोडी सुधारणा झाली.आय.टी सेक्टर मध्ये सुद्धा घसरण झाली.TCSचा तिमाही निकालने गुंतवकणूकदारांची थोडी निराशा केली(TCS Q1 Results-Revenue Up, But Profit Falls, Margin Narrows Sequentially) बाजारात मंदीवाल्यांचा जोर होता. कामकाजाच्या शेवटी सेन्सेक्स १८२. ७५ अंकांनी वाढून ५२,३८६. १९ ह्या स्तरावर बंद झाला व निफ्टीने ३८. ३०अंकांची वाढ घेऊन १५६८९. ८०चा बंद दिला. Sensex, Nifty Decline For Second Straight Session Dragged By Banks.
 
देशातील पहिली खाजगी ट्रेन तेजसने ७-१४ ऑगस्टच्या दरम्यान पुन्हा एकदा रुळावर येण्याची तयारी सुरु केली आहे IRCTC to restore services of Ahmadabad Mumbai Tejas Express from August 7
 
जितेश सावंत
शेअर बाजार तज्ञ,
Technical and Fundamental Analyst-Stock Market
jiteshsawant33@gmail.com
Indian stock market plunges for second straight week
ML/KA/PGB
10 July 2021

mmc

Related post