देशातील परकीय चलन साठा विक्रमी उच्चांकावर

 देशातील परकीय चलन साठा विक्रमी उच्चांकावर

मुंबई, दि.10 (एमएमसी न्यूज नेटवर्क): देशातील परकीय चलन साठा (Foreign Exchange Reserves) 2 जुलैला संपलेल्या आठवड्यात 1.013 अब्ज डॉलरने वाढून 610.012 अब्ज डॉलरच्या पातळीवर गेला आहे. अशाप्रकारे देशाचा परकीय चलन साठा आतापर्यंतच्या विक्रमी उच्चांकी पातळीवर पोहोचला आहे. भारतीय रिझर्व्ह बँकेने (RBI) जाहीर केलेल्या आकडेवारीत ही माहिती देण्यात आली आहे. याआधी 25 जून 2021 रोजी संपलेल्या आठवड्याच्या सुरुवातीला चलन साठा 5.066 अब्ज डॉलरने वाढून 608.999 अब्ज डॉलरच्या पातळीवर पोहोचला होता.

परकीय चलन मालमत्तेत लक्षणीय वाढ
Significant increase in foreign exchange assets

परकीय चलन मालमत्तेत (FCA) झालेल्या वाढीमुळे आढावा घेण्यात आलेल्या आठवड्यात परकीय चलन साठ्याने (Foreign Exchange Reserves) विक्रमी उच्चांकाची पातळी गाठली आहे. परकीय चलन साठ्यात परकीय चलन मालमत्तेचा वाटा सर्वात मोठा असतो.
भारतीय रिझव्‍‌र्ह बँकेने (RBI) जाहीर केलेल्या साप्ताहिक आकडेवारीनुसार या आठवड्यात, परकीय चलन मालमत्ता (FCA) 748 दशलक्ष डॉलरने वाढून 566.988 अब्ज डॉलरवर पोहोचली आहे. परकीय चलन मालमत्तांमध्ये डॉलरसह युरो, पाउंड आणि येन सारख्या चलनांचाही समावेश केला जातो. त्यांचे मूल्यांकन देखील डॉलरच्या दरानुसारच केले जाते.

सुवर्ण साठ्यातही वाढ
Gold stocks also increased

दरम्यान, आढावा घेण्यात आलेल्या आठवड्यात सोन्याचा साठा (Gold Reserves) 76 दशलक्ष डॉलरने वाढून 36.372 अब्ज डॉलरवर पोहोचला आहे. त्याच वेळी, 2 जुलैला संपलेल्या आठवड्यात आंतरराष्ट्रीय नाणेनिधीमधून (IMF) पैसे काढण्याचा विशेष हक्क (Special Drawing Rights) 49 दशलक्ष डॉलरने वाढून 1.548 अब्ज डॉलरवर गेला आहे.
भारतीय रिझर्व्ह बँकेने (RBI) जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार, दोन जुलैला संपलेल्या आठवड्यात आंतरराष्ट्रीय नाणेनिधीकडे (IMF) असलेली देशाची राखीव स्थितीही 139 दशलक्ष डॉलरने वाढून 5.105 अब्ज झाली आहे.
 
The country’s foreign exchange reserves rose by 1.013 billion to 610.012 billion dollers in the week ended July 2. Thus, the country’s foreign exchange reserves have reached an all-time high. This is according to the data released by the Reserve Bank of India.
PL/KA/10 JULY 2021
 

mmc

Related post