जूनमध्ये महागाई सात महिन्यांच्या उच्चांकी पातळीवर राहण्याची शक्यता

 जूनमध्ये महागाई सात महिन्यांच्या उच्चांकी पातळीवर राहण्याची शक्यता

नवी दिल्ली, दि.9 (एमएमसी न्यूज नेटवर्क): अन्नधान्याच्या आणि इंधनाच्या वाढत्या किंमतीच्या पार्श्वभूमीवर किरकोळ महागाई (Retail inflation) सात महिन्यांच्या उच्चांकी पातळीवर पोहोचु शकेल. वृत्तसंस्था रॉयटर्सने केलेल्या सर्वेक्षणानुसार जून मध्ये सलग दुसर्‍या महिन्यात ती रिझर्व्ह बँकेच्या (RBI) कम्फर्ट झोनच्या वर राहू शकेल.

पुरवठा समस्या कायम
Supply problems persist

कोविड (covid-19) रोखण्यासाठी बहुतांश राज्यांमध्ये लादलेली टाळेबंदी (Lockdown) आणि निर्बंध कमी करण्यात आला आहे. असे असूनही, पुरवठ्याची बाजु म्हणजेच उत्पादन आणि त्याची वाहतुक यासंदर्भातील समस्या कायम आहे. याशिवाय पेट्रोलियम पदार्थांवर करांचा दर जास्त असल्यामुळे महागाईवर (Retail inflation) दबाव कायम आहे.

जूनमध्ये महागाई 6.58 टक्के वाढू शकते
Inflation is expected to rise to 6.58 per cent in June

5 ते 7 जुलै दरम्यान झालेल्या सर्वेक्षणात सहभागी असलेल्या 37 अर्थतज्ञांच्या अंदाजानुसार जूनमध्ये महागाई गेल्या वर्षीच्या तुलनेत 6.58 टक्के जास्त असू शकते. मे महिन्यात किरकोळ महागाई (Retail inflation) 6.30 टक्के होती. जर असे झाले तर महागाई दर सलग दुसर्‍या महिन्यात रिझर्व्ह बँकेच्या (RBI) कम्फर्ट झोन्च्या (2 टक्के ते 6 टक्के) बाहेर राहील.

वाहतुकीचा खर्च वाढला
Transportation costs increased

अर्थतज्ञ कुणाल कुंडू यांच्या मते, जूनमध्ये महागाई (Retail inflation) वाढण्याचे सर्वात मोठे कारण म्हणजे इंधनाच्या उच्च किंमती आणि त्यामुळे वाहतुकीच्या किंमतीत झालेली वाढ आहे. देशातील पेट्रोलियम पदार्थांवरील कराचा दर खूप जास्त आहे.

महागाई अनेक महिने 6 टक्क्यांच्या वर राहू शकते
Inflation can stay above 6 per cent for several months

स्कॉटीयाबँकच्या एशिया पॅसिफिक इकॉनॉमिक्सचे प्रमुख टली मॅक्ली यांच्या म्हणण्यानुसार, “येत्या काही महिन्यांमध्ये महागाई दर 6 टक्क्यांच्या वर राहू शकेल. पुरवठ्याची बाजु म्हणजेच उत्पादन किंमत आणि माल वाहतुकीच्या वाढत्या खर्चामुळे महागाईचा दबाव आहे. जास्त मागणीमुळे महागाई वाढत नाही, म्हणूनच भारतीय रिझर्व्ह बँक (RBI) त्याचे उच्च दर वर्षभर सहन करू शकेल.

विकास आणि महागाई यांच्यात समतोल राखण्याचा प्रयत्न
Trying to strike a balance between growth and inflation

भारतीय रिझर्व्ह बँक (RBI) विकासाला चालना देण्यासाठी आणि महागाईवर नियंत्रण राखण्यासाठी संतुलन ठेवण्याचा प्रयत्न करत आहे. त्यांचे लक्ष आर्थिक विकासाच्या दराला चालना देण्यावर आहे, परंतु जूनमध्ये झालेल्या चलनविषयक धोरण समितीच्या बैठकीतील तपशील त्यांची नजर महागाईवर असेल असे संकेत देत आहे.

घाऊक महागाई दर जूनमध्ये 12.23 टक्के राहील
Wholesale inflation stood at 12.23 per cent in June

एएनझेडच्या सुप्रसिद्ध अर्थतज्ञांच्या म्हणण्यानुसार रिझर्व्ह बँकेसमोर (RBI) एकीकडे आड आणि दुसरीकडे विहीर आहे. उच्च महागाईमुळे विकासाला चालना देण्यासाठी आर्थिक उपाययोजना करण्याची शक्यता कमी होते. अर्थतज्ञांच्या मते जूनमध्ये घाऊक महागाई (Wholesale inflation) दर 12.23 टक्के रहाण्याची शक्यता आहे. मेमध्ये ती 15-वर्षाच्या उच्चांकी स्तर 12.94 टक्क्यांपर्यंत पोहोचली होती.
Retail inflation could reach seven-month highs on rising food and fuel prices. For the second month in a row in June, it could stay above the Reserve Bank’s comfort zone, according to a Reuters Survey.
PL/KA/PL/9 JULY 2021
 

mmc

Related post