कर्ज वसुलीसाठी स्टेट बँक विकणार विजय माल्ल्याच्या तीन कंपन्यांचे समभाग

 कर्ज वसुलीसाठी स्टेट बँक विकणार विजय माल्ल्याच्या तीन कंपन्यांचे समभाग

मुंबई, दि.19 (एमएमसी न्यूज नेटवर्क): देशातील सर्वात मोठी बँक भारतीय स्टेट बँकेच्या (SBI) नेतृत्वाखालील बँकांचा एक गट कर्जाची वसुली करण्यासाठी फरार उद्योजक विजय माल्ल्या (Vijay Mallya) याच्या तीन कंपन्यांचे समभाग विकणार आहे. त्यातून सुमारे 6,200 कोटी रुपये वसूल होणे अपेक्षित आहे. हे कर्ज विजय माल्ल्या याने त्याची विमान कंपनी किंगफिशरसाठी (Kingfisher) घेतले होते.
23 जून रोजी होणार्‍या या लिलावात स्टेट बँकेकडून (SBI) युनायटेड ब्रुअरीज लिमिटेड, युनायटेड स्पिरिट लिमिटेड आणि मॅक्डोनाल्ड होल्डिंग्स लिमिटेडचे ​​समभाग विकले जातील. जर समभागांची विक्री यशस्वी झाली तर किंगफिशर प्रकरणात बँकांची ही पहिली मोठी वसुली असेल.

मुळ रकमेसह व्याजचीही वसू्ली
Recovery of interest along with principal amount

मनीकंट्रोलच्या वृत्तानुसार समभागांची विक्री बेंगळुरुच्या डेब्ट रिकव्हरी ट्रिब्यूनलच्या (डीआरटी) माध्यमातून केली जाईल. या अंतर्गत, वसुली अधिकारी 6,203 कोटी रुपयांसह खर्च आणि 25 जून 2013 ते वसुलीच्या तारखेपर्यंतच्या 11.5 टक्के व्याजाचीही वसूल करतील. या महिन्याच्या सुरुवातीला पीएमएलए न्यायालयाने बँकांना माल्ल्याची (Vijay Mallya) मालमत्ता आणि इतर वस्तू विकण्यास परवानगी दिली. बँकेने सांगितले की बँका मालमत्ता व इतर संपत्ती विकून बँक आपले काही पैसे वसूल करू शकते.

सर्वात जास्त युनायटेड ब्रूव्हरीजच्या समभागांची विक्री
The highest selling share of United Breweries

23 जूनला वसुली अधिकारी युनायटेड ब्रूव्हरीजच्या 4.13 कोटी, युनायटेड स्पिरिट्सच्या 25.02 लाख आणि मॅकडोनल्ड्स होल्डिंग्जच्या 22 लाख समभागांची ब्लॉक डील अंतर्गत विक्री करतील. वृत्तानुसार, जर ब्लॉक डील अंतर्गत समभागांची विक्री झाली नाही तर ते 24 जूनपासून घाऊक किंवा किरकोळ मोडद्वारे विकले जातील.

मार्च 2016 पासून विजय माल्ल्या भारताबाहेर
Vijay Mallya out of India since March 2016

आर्थिक संकटामुळे माल्ल्याची विमान कंपनी किंगफिशर 20 ऑक्टोबर 2012 पासून उड्डाणे करू शकलेली नाही. कर्ज परतफेड न केल्यामुळे आणि बँकांची कथित फसवणूक केल्याप्रकरणी विजय माल्ल्याला (Vijay Mallya) जानेवारी 2019 मध्ये एक फरारी आर्थिक गुन्हेगार म्हणून घोषित करण्यात आले आहे. माल्ल्याने 2 मार्च 2016 मध्ये भारत सोडला होता.

17 बँकांचे जवळपास 9 हजार कोटी रुपये अडकले आहेत
About Rs 9,000 crore of 17 banks

विजय माल्ल्याने 17 बँकांचे सुमारे 9 हजार कोटी रुपये आणि त्यांचे व्याज अद्याप दिलेले नाही. यात भारतीय स्टेट बँकेसह (SBI) पंजाब नॅशनल बँक, आयडीबीआय बँक, बँक ऑफ बडोदा, अलाहाबाद बँक, फेडरल बँक, अ‍ॅक्सिस बँकेचाही समावेश आहे.
A group of banks led by State Bank of India (SBI), the country’s largest bank, will sell shares of three companies owned by fugitive entrepreneur Vijay Mallya to recover loans. It is expected to recover about Rs 6,200 crore. The loan was taken by Vijay Mallya for his airline Kingfisher.
PL/KA/PL/19 JUNE 2021
 

mmc

Related post