अमेरिकन फेडरलचा निर्णय,रुपयाची घसरण आणी क्रूड ऑइलच्या किमतीत झालेली वाढ यामुळे भांडवली बाजारात (शेअर मार्केट) पडझड.

 अमेरिकन फेडरलचा निर्णय,रुपयाची घसरण आणी क्रूड ऑइलच्या किमतीत झालेली वाढ यामुळे भांडवली बाजारात (शेअर मार्केट) पडझड.

मुंबई, दि. 19 (एमएमसी न्यूज नेटवर्क) :या आठवड्यात बाजारावर अमेरिकन फेडरलची बैठक, अदानी समूहात गुंतवणूक करणाऱ्या तीन परदेशी फंडांची खाती गोठवण्यात आल्याचे वृत्त,रुपयात झालेली घसरण या सगळ्याचा प्रभाव राहिला.या आठवड्यात सेन्सेक्स आणि निफ्टीने नवीन उच्चतम स्तर गाठला. पुढील आठवड्यात बाजाराचे लक्ष रुपयाची वाटचाल कशी राहते याकडे असेल. येणाऱ्या काळात गुंतवणूकदारांनी सावधानता बाळगावी व खालच्या स्तरावर दीर्घकाळाकरीताच गुंतवणूक करावी.
 
पहिल्याच दिवशी बाजारात मोठी पडझड अडाणी समूहाचे शेअर्स गडगडले,दुसऱ्या सत्रात बाजार सावरला. Markets recovered smartly from the intraday lows and ends marginally higher in the volatile session. आठवड्याच्या पहिल्या दिवशी बाजाराची सुरुवात नरमाईने झाली.चीन,तैवान,व हॉंगकॉंग मधील बाजार बंद होते.अडाणी समूहाचे शेअर्स १५ ते २० टक्क्यांनी घसरले(Adani stocks tumble), या समूहात गुंतवणूक करणाऱ्या अब्दुला इन्व्हेस्टमेंट फंड, क्रेस्टा फंड आणि एपीएमएस इन्व्हेस्टमेंट फंड या तीन परदेशी फंडांची खाती गोठवण्यात आल्याचे वृत्त प्रसारित झाल्यानंतर या समूहातील शेअरमध्ये मोठी पडझड झाली.व त्यामुळे सेन्सेक्स ५०० अंकांनी घसरला. दुपारनंतर बाजरात जोरदार खरेदी झाली व बाजार थोडासा स्थिरावला.GST मध्ये घट झाल्याने फार्म व हेल्थकेअर सेक्टर मध्ये जोश होता.INFOSYS,RIL आणि Bajaj Fin या शेअर्स मधील वाढीने बाजाराला आधार मिळाला. अदानी समूहाने हे वृत्त खोटे असून गुंतवणूकदारांचे दिशाभूल करणारे आहे,अशी महत्वाची माहिती बीएसईला सादर केली, या प्रकारामुळे या समूहाला धक्का बसल्याची चर्चा बाजारात होती. Market bulls made a smart comeback on Dalal Street as brisk buying in Reliance Industries, Bajaj twins, L&T, and Infosys helped benchmarks recoup losses.
 
 
 
सेन्सेक्स व निफ्टीने नोंदवला विक्रमी उच्चतम स्तर. Sensex, Nifty end at record closing high
 
विदेशी बाजारातील चांगल्या संकेतामुळे मंगळवारी बाजरीची सुरुवात चांगली झाली. अदानी समूहातील शेअर्स मधील प्रचंड पडझडीनंतर मंगळवारी शेअर्स थोडे स्थिरावले.बाजारावर तेजीवाल्यांची चांगलीच पकड होती दिवसभरात निफ्टीने १५,९००चा नवीन उच्चतम स्तर गाठला. वरच्या स्तरावरती थोडी नफावसुली झाली. ऑइल,गॅस(Oil&Gas),सिमेंट(Cement),आय.टी(I.T),बांधकाम, ह्या क्षेत्रातील शेअर्स मध्ये तेजी होती.सेन्सेक्स आणि निफ्टीने विक्रमी बंद भाव नोंदवला.Markets extend the winning streak for the fourth consecutive day and end at fresh record closing levels.
 
अमेरिकन फेडरल रिझर्व्ह च्या बैठकीच्या आधी बाजारात घसरण. Market fall ahead of US Fed decision
आशियाई बाजारातील संमिश्र संकेत,क्रूड ऑइलच्या(CrudeOil) किमतीत झालेली वाढ आणि चार दिवसांच्या सलग तेजी नंतर बाजाराने बुधवारी विश्रांती घेतली.बाजारात नफावसुली दिसली. ऑइल सेक्टर मध्ये तेजी होती. कंपनीने आपली बाजू मांडल्यानंतर सुद्धा अदानी समूहाच्या शेअर्स मध्ये नरमाईच होती. रिलायन्स(Reliance), एच.डी.एफ.सी(HDFC), तसेच अदानी पोर्ट्स(ADANI PORTS) या शेअर्स मधील घसरणीमुळे निफ्टीवर दबाव आला. एफ.एम.सी.जी(FMCG) शेअर्स मधील तेजीने(HUL,TATACONSUMER,ITC ) बाजाराला थोडासा आधार मिळाला. अमेरिकन फेडरल रिझर्व्ह च्या बैठकीआधी बाजराने थोडी सावध भूमिका घेतली व त्यामुळे बाजार बंद होताना निफ्टी १०२ अंकांनी व सेन्सेक्स २७५ अंकांनी घसरला. Sensex, Nifty fall over half-a-percent each. Markets extend the losses in noon trading amid volatility, due to weakness in index heavyweight Reliance Industries and metal stocks
 
सलग दुसऱ्या दिवशी बाजारात घसरण. आय टी क्षेत्रात तेजी. Sensex, Nifty Decline For Second Straight Session; IT Shares Outperform.
 
गुरुवारी सकाळी बाजारात कमजोरी होती, अमेरिकन फेडरल रिझर्व्हने दरात कुठलाही बदल न केल्याने व लवकरच दर वाढवण्याचे संकेत दिल्याने आशियाई बाजारात सकाळपासूनच कमजोरी होती,याच पार्श्वभूमीवर भारतीय बाजाराची सुरुवात देखील पडझडीने झाली.विकली एक्सपायरी असल्याने बाजारात खालच्या स्तरावरून खरेदी झाली परंतु बाजारात पुन्हा घसरण झाली. डॉलरच्या तुलनेत रुपयात चांगलीच घसरण झाली रुपयाने ६ आठवड्याचा आपला निच्चांक गाठला.( The rupee recorded its sharpest fall in two months on Thursday) रुपयातील घसरणीमुळे आय.टी. सेक्टर मध्ये तेजी होती. मेटल,ऑटो आणि वित्तीय संस्थेच्या शेअर्स मध्ये दबाव होता. Markets decline for second straight session mirroring losses in global markets after the US Federal Reserve hinted that it may raise interest rates at a much faster pace than assumed.
 
प्रचंड उतार चढावानंतर बाजाराने दिला सपाट बंद भाव. Sensex, Nifty end flat amid volatility.
 
शुक्रवारी बाजाराची सुरवात मजबुतीने झाली.सेन्सेक्स २०० अंकांनी वाढला परंतु वरच्या स्तरावरती दबाव वाढला रुपयातील कमजोरी आणि अमेरिकन फेडच्या(US Fed) संकेतांमुळे बाजारात थोडे निराशेचे वातावरण होते. ३ मे नंतर रुपयाने आपली खालची पातळी गाठली रिलायन्स (Reliance)आयसीआयसीआयबँक (ICICI Bank) आणि स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI) या शेअर्स मधील घसरणीमुळे बाजारात दबाव वाढला. सेन्सेक्स ७०० अंकांनी घसरला परंतु प्रचंड उतार चढाव असलेल्या दिवशी शेवटच्या एका तासात मार्केटमध्ये खरेदी झाली व बाजार सपाट बंद झाला. Sensex snaps two-day losing streak; Nifty ends in red.
 
(मार्केट मध्ये गुंतवणूक करताना तज्ञ व्यक्तीचा सल्ला घ्यावा )
जितेश सावंत
शेअर बाजार तज्ञ,
Technical and Fundamental Analyst-Stock Market
jiteshsawant33@gmail.com
Markets decline for second straight session mirroring losses in global markets after the US Federal Reserve hinted that it may raise interest rates at a much faster pace than assumed.
ML/KA/PGB
19 Jun 2021

mmc

Related post