भांडवली(शेअर मार्केट)बाजारात प्रचंड उतार चढाव. जागतिक महागाईत होत असलेल्या वाढीमुळे बाजाराला चिंता

 भांडवली(शेअर मार्केट)बाजारात प्रचंड उतार चढाव. जागतिक महागाईत होत असलेल्या वाढीमुळे बाजाराला चिंता

मुंबई, दि. 15 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : भारतीय भांडवली बाजारावरती या आठवड्यात विदेशी बाजाराकडून आलेले संकेत,अमेरिकेतील वाढती महागाई, रिझर्व्ह बँकेने मागील आठवड्यात उचललेली पावले,आंतरराष्ट्रीय रेटिंग एजन्सीसचे अंदाज,तैवान मधील बाजारातील ऐतिहासिक घसरण,महागाईचे व औद्योगिक उत्पादनाचे आकडे,कोरोना रुग्णसंख्या व देशभरात टाळेबंदी जाहीर होईल याची भीती. या सर्व बाबींचा प्रभाव दिसला.या आठवड्यात मार्केटमध्ये फारच उतार चढाव होता.This week Market was very volatile.
 
 
 
सलग चौथ्या दिवशी बाजारात तेजी निफ्टी १५,००० च्या दिशेने
 
Markets rise for the fourth session in a row
 
आठवड्याच्या पहिल्याच दिवशी बाजाराची सुरुवात अत्यंत मजबुतीने झाली, शुक्रवारी अमेरिकन मार्केटमधील रेकॉर्ड तेजी, आशियाई बाजारातील तेजीचे संकेत,रुग्णसंख्येतील घट, नुकतीच रिझर्व्ह बँकेने पैसा खेळता राहावा म्हणून उचललेली पावले, यामुळे निफ्टीने बाजार उघडताच १४,९०० चा टप्पा पार केला. सलग चौथ्या दिवशी बाजारात तेजीचा माहोल होता. फार्मा(Pharma) क्षेत्रात तुफान तेजी होती. मेटल आणि फार्मा सेक्टरच्या जोरावर निफ्टीने पहिल्याच दिवशी आपला बंद भाव हा १४,९०० च्या वरती दिला. ऑटो(Auto),एनर्जी(Energy),इन्फ्रा(Infra),आणि पब्लिक सेक्टर बँक (PSU) या क्षेत्रात देखील चांगलीच तेजी होती. निफ्टी फार्मा व मेटल इंडेक्सने आपला सर्वाधिक उचांक नोंदवला. Markets rise for the fourth session in a row paced by gains in metal, pharma, auto and PSU banking shares. Markets end higher for the fourth straight session helped by metal and pharma names.
 
सलग चार दिवसांच्या तेजीनंतर मार्केट मध्ये नरमी
 
Markets snap four-day winning streak
 
अमेरिकन मार्केट मधील घसरण,आशियाई बाजारांतून आलेले नरमाईचे संकेत,एच.डी.एफ.सी(HDFC),एच.डी.एफ.सी बँक(HDFCBank),आय.सी.आय.सी.आय बँक(ICICIBank) आणि कोटक बँक(KOTAKBank) या समभागात बाजाराची सुरुवात होताना झालेली घसरण यामुळे मंगळवारी सेन्सेक्स सुरुवातीला ४५० अंकांनी घसरला. परंतु सकाळी फार्मा कंपन्यांच्या शेअर्स मध्ये तेजी होती. निफ्टी फार्मा इंडेक्सने आपल्या आत्तापर्यंतच्या उच्चतम स्तरापर्यंत जाण्याचा प्रयत्न केला ऑरोबिंदो फार्मा(Aurobindo) या कंपनीने आपला नवीन उच्चतम स्तर गाठला.सन फार्मा(Sun),ग्लेनमार्क(Glenmark),कॅडीला(Cadila) ह्या समभागात सुद्धा चांगलीच तेजी होती. सलग चार दिवसांच्या तेजीनंतर मार्केट मध्ये थोडी नरमी होती. परंतु निफ्टीने आपला बंद भाव १४,८००च्या वरती ठेवण्यात यश मिळवले जागतिक स्तरावरती महागाई मध्ये वाढ होईल या भीतीने बाजाराने आपली प्रतिक्रिया नोंदवली. Markets remained in a firm bear grip as Dalal Street investors participated in-line with global peers. Markets snap four-day winning streak with the Nifty50 falling below 14,900 levels as banking & financials and IT stocks were under pressure.
 
 
 
‘मुडीस’ या आंतरराष्ट्रीय रेटिंग एजन्सीने भारताचे २०२२ या आर्थिक वर्षाचे पूर्वी अंदाजलेले वृद्धी दर १३.७ वरून ९. ३% केले,.Moody’s cuts India FY22 GDP growth forecast sharply to 9.3%
 
 
 
तैवान मधील बाजारात हाहाकार
 
अमेरिकेत महागाई भडकेल या भीतीने तेथील मार्केट मंगळवारी ४७५ अंकांनी कोसळले .आशियाई बाजारातून नरमाईचे संकेत, तैवान येथील बाजारा ८% पडले,१९९४ नंतर प्रथमच अश्या प्रकारची घसरण तेथील बाजारात पाहावयास मिळाली,कोरोनाचे वाढते संक्रमण पाहता तेथील सरकारने कडक निर्बंध लावण्याचे जाहीर केल्यामुळे बाजारात घसरण झाली, ‘मुडीस’ या आंतरराष्ट्रीय रेटिंग एजन्सीने भारताचे २०२२ या आर्थिक वर्षाचे जी.डी.पीचे पूर्वी अंदाजलेले वृद्धी दर १३.७ वरून ९.% केले (Moody’s cuts India FY22 GDP growth forecast sharply to 9.3%), या पार्श्वभूमीवर भारतीय बाजाराची सुरुवात घसरणीने झाली. सकाळी हिंदुस्थान युनिलिव्हर (HUL), आय.सी.आय.सी.आय बँक(ICICI Bank),कोटक बँक ( Kotak Mah Bk) या समभागात दबाव होता. भारतात जास्तीत जास्त ठिकाणी ६ ते ८ आठवड्याची संपूर्ण टाळेबंदी जाहीर करावी असे मत आय.सी.एम आर च्या प्रमुखांनी व्यक्त केले,या बातमीने आगीत अजून तेल ओतले(‘add fuel to the fire’) व दुपारनंतर बाजार ६०० अंकांनी घसरला. Sensex, Nifty End Lower After Seesaw Session. Markets fall 1% on the back of weak global cues.
 
बाजाराचे सत्र झाल्यानंतर संध्याकाळी जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार एप्रिलमधील किरकोळ महागाईचा दर ४.२९% व मार्च मधील देशाचा औद्योगिक उत्पादन निर्देशांक २२.४% एवढा जाहीर झाला. हे आकडे थोडेसे दिलासादायक होते. April retail inflation eases to 4.29%; March IIP grows 22.4%
गुरुवारी रमजान ईद असल्याने भांडवली बाजाराचे कामकाज बंद होते.
 
अमेरिका या आशियाई बाजरातून आलेल्या मजबूत संकेतामुळे आठवड्याच्या शेवटच्या दिवशी बाजाराची सुरुवात चांगली झाली परंतु तेजीं टिकली नाही. आठवड्याच्या शेवटच्या दिवशी मार्केटमध्ये फारच उतार चढाव होता. एशियन पेंट(ASIAN PAINTS),रिलायन्स(RIL).आय.टी.सी(ITC) आणि हिंदुस्थान युनिलिव्हर(HUL) या समभागांनी बाजाराला सावरण्यास मदत केली पावसाळा जवळ आल्याने फर्टीलायझर(Fertilizer) शेअर्स मध्ये तेजी होती. Markets end flat, with a negative bias, on the last trading day of the week, amid choppiness.
Markets remained in a firm bear grip as Dalal Street investors participated in-line with global peers. Markets snap four-day winning streak with the Nifty50 falling below 14,900 levels as banking & financials and IT stocks were under pressure.
 
 
(मार्केट मध्ये गुंतवणूक करताना तज्ञ व्यक्तीचा सल्ला घ्यावा )
 
जितेश सावंत
 
शेअर बाजार तज्ञ,
 
Technical and Fundamental Analyst-Stock Market
 
jiteshsawant33@gmail.com
JS/KA/PGB
15 may 2021
 

mmc

Related post