सीआयआयकडून 3 लाख कोटी रुपयांच्या आर्थिक पॅकेजचे समर्थन

 सीआयआयकडून 3 लाख कोटी रुपयांच्या आर्थिक पॅकेजचे समर्थन

नवी दिल्ली, दि.18 (एमएमसी न्यूज नेटवर्क): इंडस्ट्री चेंबर सीआयआयच्या (CII) मते भारतीय अर्थव्यवस्थेला (Indian economy) तीन लाख कोटी रुपयांच्या आर्थिक पॅकेजची आवश्यकता आहे. चेंबरच्या म्हणण्यानुसार, कोरोना साथीच्या काळात आर्थिक विकासाला आधार देण्यासाठी या पॅकेअंतर्गत जनधन खात्यात थेट रोख मदत देखील उपलब्ध करुन द्यायला हवी. या व्यतिरिक्त सीआयआयने लसीकरण जलद गतीने व्हावे यासाठी ‘व्हॅक्सिन झार’ च्या (Vaccine Czar) नेमणुकीचे समर्थन केले आहे.

अर्थव्यवस्थेत 9.5 टक्क्यांनी वाढ होईल अशी सीआयआयला अपेक्षा
The CII expects the economy to grow by 9.5 per cent

सीआयआयचे (CII) अध्यक्ष टी व्ही नरेंद्रन यांनी देखील सांगितले की, 2021-22 या आर्थिक वर्षात अर्थव्यवस्थेत (Indian economy) 9.5 टक्क्यांनी वाढ होईल अशी चेंबरला अपेक्षा आहे. ते म्हणाले की इतर देशांकडून जोरदार मागणी आणि मोठ्या प्रमाणावरील लसीकरणामुळे आर्थिक घडामोडी पुन्हा सुरू होण्यास मदत होईल आणि यामुळे चालू आर्थिक वर्षाच्या उत्तरार्धात भक्कम वाढ होईल. लसीकरणाला गती देण्यासाठी “व्हॅक्सीन झार” (Vaccine Czar) नेमण्याची शिफारसही त्यांनी केली. नव्या अध्यक्षांनी सांगितले की कोव्हिड-19 च्या (covid-19) दुसर्‍या लाटेमुळे बाधित झालेल्या लोकांवरील दबाव कमी करण्यासाठी योग्य वित्तीय उपाययोजना करणे ही काळाची गरज आहे.

भारतीय अर्थव्यवस्था ही खर्चावर आधारित आहे
The Indian economy is based on expenditure

त्यांनी पत्रकारांना सांगितले की भारतीय अर्थव्यवस्था (Indian economy) ही खर्चावर आधारित अर्थव्यवस्था आहे आणि साथीमुळे ग्राहकांच्या मागणीवर परिणाम झाल्याचे पहायला मिळाले आहे. या कारणास्तव चेंबरने (CII) रोख हस्तांतरणातून अनेक उपाययोजना करण्याचे आवाहन केले आहे. नरेंद्रन यांनी सांगितले की तीन लाख कोटी रुपयांच्या वित्तीय प्रोत्साहन पॅकेजची (Fiscal stimulus) गरज आहे. तीन लाख कोटी रुपयांचे अतिरिक्त प्रोत्साहन पॅकेज देण्याची संधी आहे. ते म्हणाले की या प्रोत्साहन पॅकेजचे समायोजन करण्यासाठी भारतीय रिझर्व्ह बँकेला (RBI) आपला ताळेबंद खर्च करायला हवा. त्यामुळे कर्ज एका मर्यादेत राहील.
 
According to the industry chamber CII, the Indian economy needs a financial package of Rs 3 lakh crore. According to the chamber, the package should also provide direct cash assistance to the Jandhan account to support economic growth during the Corona pandemic. The CII has supported the appointment of Vaccine Czar to expedite vaccination.
 
PL/KA/PL/18 JUNE 2021

mmc

Related post