रिझर्व्ह बँकेकडून भारतीय स्टेट बँकेला एक कोटी रुपयांचा दंड

 रिझर्व्ह बँकेकडून भारतीय स्टेट बँकेला एक कोटी रुपयांचा दंड

नवी दिल्ली, दि.19 (एमएमसी न्यूज नेटवर्क): भारतीय रिझर्व्ह बँकेने (RBI) देशातील सर्वात मोठी सार्वजनिक क्षेत्रातील बँक भारतीय स्टेट बँकेला (SBI) दंड (Penalty) ठोठावला आहे. रिझर्व्ह बँकेने नियामक निर्देशांचे पालन न केल्याबद्दल देशातील सर्वात मोठी कर्ज देणारी स्टेट बँक ऑफ इंडियाला एक कोटी रुपयांचा जबरदस्त दंड ठोठावला आहे.
रिझर्व्ह बँकेने या प्रकरणी म्हटले आहे की स्टेट बँकेकडून रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या (फ्रॉड्स क्‍लासिफिकेशन अँड रिपोर्टिंग बाय कमर्शियल बँक्‍स अँड सिलेक्टेड फाइनेंशियल इंस्‍टीट्यूशंस) निर्देश 2016 चे पालन न केल्याबद्दल ही दंडाची (Penalty) कारवाई करण्यात आली आहे.
रिझर्व्ह बँकेने (RBI) या प्रकरणी म्हटले आहे की भारतीय स्टेट बँकेने (SBI) व्यावसायिक बँका आणि निवडक वित्तीय संस्थांकडून ग्राहकांच्या झालेल्या फसवणुकीचे वर्गीकरण आणि त्याचा अहवाल देण्याच्या नियमांचे उल्लंघन केले आहे. रिझर्व्ह बँकेने म्हटले आहे की, बँकिंग नियमन अधिनियम, 1949 च्या कलम -47 ए (1) (सी) च्या तरतुदीनुसार मिळालेल्या अधिकारांचा वापर करून त्यांनी हा दंड (Penalty) आकारला आहे. रिझर्व्ह बँकेने असेही म्हटले आहे की ही कारवाई नियामक अनुपालनातील त्रुटींवर आधारित आहे. मात्र बँकेने ग्राहकांसोबत केलेल्या कोणत्याही व्यवहाराच्या किंवा कराराच्या वैधतेवर याचा परिणाम होणार नाही.
वास्तविक, रिझर्व्ह बँकेने (RBI) भारतीय स्टेट बँकेकडून (SBI) देखरेख करण्यात येत असलेल्या एका ग्राहकाच्या खात्याची चौकशी केली. या तपासणीत असे आढळून आले की स्टेट बँकेने रिझर्व्ह बँकेच्या सूचनांचे पालन करण्यास विलंब केला आहे. रिझर्व्ह बँकेने ग्राहकाच्या खात्यासह त्याच्याशी संबंधित पत्रव्यवहार आणि अन्य बाबींचीही तपासणी केली.
त्यात असे दिसून आले की, भारतीय स्टेट बँकेकडून (SBI) खात्यातील फसवणुकीची माहिती रिझर्व्ह बँकेला (RBI) उशिरा देण्यात आली. एवढेच नाही, त्यानंतर या प्रकरणात बँकेला कारणे दाखवा नोटीस बजावून विचारण्यात आले की सूचनांचे पालन न केल्याबद्दल त्यावर दंड का आकारला जाऊ नये? यावर स्टेट बँकेने दिलेल्या उत्तरावर विचार केल्यानंतर रिझर्व्ह बँकेने देशातील सर्वात मोठ्या कर्ज देणार्‍या भारतीय स्टेट बँकेला एक कोटी रुपयांचा दंड ठोठावण्याचा निर्णय घेतला.
The Reserve Bank of India (RBI) has imposed a penalty on the country’s largest public sector bank, State Bank of India (SBI). The Reserve Bank of India (RBI) has slapped a hefty fine of Rs 1 crore on the country’s largest lender, State Bank of India, for non-compliance with regulatory guidelines.
PL/KA/PL/19 OCT 2021
 

mmc

Related post