रिझर्व्ह बँकेच्या घोषणेमुळे दलाल स्ट्रीट वर तेजी,निफ्टीने पार केला १४,८०० चा टप्पा.
मुंबई, दि.8 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : भांडवली बाजारासाठी हा आठवडा चांगला गेला. दोन दिवसाच्या उतारचढावा नंतर सलग तीन दिवस तेजी राहिली. निवडणुकीचे निकाल,वाहन विक्रीचे आकडे, जी.एस.टी च्या(GST) एप्रिल महिन्यातील करवसुलीचे आकडे, चौथ्या तिमाहीचे निकाल आणि रिझर्व्ह बँकेची अचानक झालेली घोषणा या सगळ्याचा प्रभाव बाजारावरती दिसला.
पहिल्याच दिवशी बाजाराची सुरुवात निराशाजनक
आठवड्याच्या पहिल्याच दिवशी बाजाराची सुरुवात निराशाजनक झाली. सेन्सेक्स ६०४ अंकांनी घसरला. विदेशी बाजारातून मिश्र संकेत होते. जपानचे मार्केट बंद होते.अमेरिकन मार्केटचा निर्देशांक ‘डाऊ जोन्स’चे (DowJones) फ्यूचर १५० अंकांनी वधारले होते जी.एस.टी च्या(GST) एप्रिल महिन्यातील करवसुलीचे आकडे १.४१ लाख करोड म्हणजेच विक्रमी होते, सलग ७व्या महिन्यात १ लाख करोडचा आकडा पार केला होता त्यामुळे आर्थिक मोर्च्याकरिता चांगली बातमी होती,परंतु सकाळपासूनच बाजारावरती दबाव होता. पश्चिम बंगालमध्ये केंद्रातील सत्ताधारी पक्ष भारतीय जनता पक्ष सत्ता स्थापन करू शकला नसल्याने सकाळच्या सत्रात गुंतवणूकदारांमध्ये थोडीशी मरगळ होती. मेटल सेक्टरमध्ये तेजी होती, साखर( शुगर) क्षेत्रातील कंपन्यांनी सुद्धा आपल्या समभागांची गोडी थोडी वाढवली होती. बँकिंग सेक्टरवर दबाव होता या सेक्टरने बाजाराला खाली खेचण्यास मदत केली. शेवटच्या तासात बाजारात खालच्या स्तरावर थोडी खरेदी झाली. Last Hour Comeback Helps Sensex, Nifty End Little Changed.. Markets came off intraday low levels and erased gains in the last hour of trade on the back of buying interest in metal, banking, auto and pharma shares.
वाहन कंपन्यांचे आकडे निराशाजनक COVID-19 halts auto sales recovery
एप्रिल महिन्यातील वाहन विक्रीच्या( Auto Sales numbers) आकड्यावरती ताळेबंदीचा असर साफ दिसत होता. मारुती वगळता बाकी वाहन कंपन्यांचे आकडे निराशाजनक होते टाटा मोटर्स ,एस्कॉर्टस ,आयचर आणि अशोक लेलँड या कंपन्यांचे विक्रीचे आकडे घसरले होते. हिरो मोटोकॉर्पने ३५% वाहनविक्री केली.
बाजारात प्रचंड उतार चढाव वरच्या स्तरावरती नफावसुली
Profit booking at higher levels
सोमवारी अमेरिकन मार्केटमध्ये तेजी होती मे महिन्याची सुरुवात चांगली झाली. आशियाई बाजारात पण तेजीचा माहोल होता त्यामुळेच दुसऱ्या दिवशी भारतीय बाजाराची सुरुवात तेजीने झाली सेन्सेक्स सकाळी २६७ अंकानी वधारला.सलग तिसऱ्या दिवशी कोरोनाच्या रुग्णसंख्येत घट झाली. महाराष्ट्रात सुद्धा परिस्थिती हळूहळू सुधारली आहे एक महिन्यानंतर रुग्णसंख्या ५०,००० च्या खाली आली. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा प्रभाव तीव्र आहे,केंद्र सरकारने राज्य सरकारांना ज्या विभागात १०% पेक्षा जास्त संसर्ग आहे अश्या विभागात १४ दिवसाची टाळेबंदी करावी असे आदेश दिले. ज्यामुळे संक्रमणाची साखळी तोडण्यात मदत होईल. शुगर(साखर) सेक्टर मध्ये चांगलीच तेजी होती व त्याचे प्रमुख कारण म्हणजे ब्राझील मधील उत्पादनात घट ,तसेच देशात एथेनॉल ब्लेंडींग च्या ४२२ प्रस्तावांना मंजुरी. के .सी पी(K.C.P) ,शक्ती(SAKTHI),द्वारकेश(DWARIKESH SUGAR),हे शेअर्स या आठवड्यात २५-३०% वाढले. सकाळी निफ्टीला वर जाण्याकरिता आय.सी आय.सी. आय (ICICI), कोटक(KOTAK), एस.बी. आय(SBI), ऍक्सिस (AXIS BANK) या बँकांकडून चांगलाच सपोर्ट मिळाला. दुपारनंतर मार्केटमध्ये वरच्या स्तरावरती नफावसुली झाली व बाजार ५६०अंकांनी घसरला. फार्मा क्षेत्र व रिलायन्स यांच्यावरील दबावामुळे बाजार खाली आला. Markets have slid almost one percent in the late afternoon to touch the lows of the day, amid a volatile session of trading, dragged by weakness in pharma stocks.
रिझर्व्ह बँकेच्या घोषणेनंतर बाजारात तेजी.
RBI lifts market mood
बुधवारी बाजाराची सुरुवात अत्यंत मजबूत झाली सेन्सेक्स ३१४ अंकांनी वधारला, रिझर्व्ह बँकेचे प्रमुख शक्तिकांता दास यांनी सकाळी १० वाजता प्रेस कॉन्फरन्स घेणार अशी माहिती बाजाराची सुरुवात होण्याअगोदर दिली होती. त्यामुळे मार्केट मध्ये एक उत्साहाचे वातावरण होते, कोरोनाच्या दुसऱ्या लाटेच्या प्रभावाने अर्थव्यवस्था फारच डळमळीत झाली आहे व ती पूर्वपदावर आणण्यासाठी काही खंबीर पावले उचलण्याची जरूर आहे असे शक्तिकांत दास यांनी सांगितले,रिझर्व्ह बँक या परिस्थितीवर लक्ष ठेवून आहे,पहिल्या लाटेनंतर परिस्थिती सुधारत होती परंतु दुसऱ्या लाटेच्या प्रभावाने अर्थव्यवस्थेला पुन्हा एकदा खिंडार पडत आहे. सरकार लसीकरण मोहीम वेगाने राबवण्याचा पर्यंत करीत आहे त्यामुळे येणाऱ्या काळात परिस्थिती सुधारेल,जागतिक अर्थव्यवस्था हळूहळू सुधारत आहे,आगामी काळात समाधानकारक पावसामुळे ग्रामीण भागात सुद्धा अर्थव्यवस्थेला चालना मिळेल, असे हि दास यांनी सांगितले व त्यांनी काही घोषणा केल्या ,हेल्थ केयर सेक्टर साठी त्यांनी मोठी घोषणा केली हाॅस्पिटल्स, ऑक्सिजन ,लस निर्मिती आणि वाहतूक करणाऱ्या कंपन्यांसाठी ५०००० कोटींचा अतिरिक्त निधी उपलब्ध केला त्यामुळे फार्म सेक्टरमध्ये तुफान तेजी आली लुपिन (Lupin) ,ऑरोबिंदो फार्मा (Aurobindo Pharma,कॅडीला(Cadila Healthcare) ,सन फार्मा(Sun Pharma) ह्या शेअर्स मध्ये तुफान तेजी होती Priority Sector साठी त्वरित कर्ज उपलब्ध करून दिले जाईल,बँक कोविड लोन बुक बनविले जाईल ,लघु वित्त बँकांसाठी १० हजार कोटींचा अतिरिक्त निधी उपलब्ध करून दिला जाईल असे त्यांनी सांगितले या घोषणांनंतर बाजारात रौनक आली. Markets end higher after RBI Governor Shaktikanta Das in an unscheduled speech on Wednesday provided more liquidity support by announcing various measures. Markets extend gains in noon deals on the back of buying interest in banking, pharma, information technology and PSU banking shares. The Nifty Pharma index climbed over 4 per cent.
निफ्टीने पार केला १४,७०० चा टप्पा
Nifty back above 14700
विदेशी बाजराकडून आलेल्या मजबूत संकेत, लसीकरणामुळे लवकरच रुग्णसंख्या कमी होण्याची आशा यामुळे गुरुवारी भारतीय बाजरीची सुरुवात चांगली झाली. सलग दुसऱ्या दिवशी बाजारात तेजी होती मेटल,आय .टी,आणि ऑटो क्षेत्रातील तेजीमुळे आज सेन्सेक्सने ४९,०००चा स्तर पार केला. मेटल सेक्टर ची घोडदौड चालूच होती या आठवड्यात नाल्को(NALCO),एन .एम .डी .सी(NMDC),आणि सेल(SAIL) या कंपन्यांचे समभाग ७ते ११ %पर्यंत वाढले. मार्केटमध्ये वरच्या स्तरावरती नफावसुली झाली. Markets ends on a strong note with the Nifty 50 scaling above 14,700 levels. Markets second straight session paced by gains in metal, auto, information technology and oil & gas shares.
आठवड्याच्या शेवटच्या दिवशी बाजारात तेजी
Nifty back above 14,800 levels on a closing basis
आठवड्याच्या शेवटच्या दिवशी शुक्रवारी बाजारात तेजी होती सलग तिसऱ्या दिवशी बाजारात तेजी पाहावयास मिळाली. सकाळी निफ्टीने १४,८०० चा स्तर पार केला. दुपारी वरच्या स्तरावरती नफावसुली पाहावयास मिळाली. एच डी.एफ.सी(HDFC) व एच डी.एफ.सी बँक(HDFC Bank) या समभागात चांगलीच तेजी होती, बाजाराला वरच्या स्तरावरती नेण्यास या समभागांची मदत झाली. मेटल आणि शुगर सेक्टर मध्ये चांगलीच तेजी होती. Sensex, Nifty Gain For Third Day In A Row .Sensex, Nifty Log Second Week Of Gains Helped By A Rally In Metal Stocks.
भारतातील अग्रगण्य दुचाकी वाहन कंपनी हिरो मोटो कॉर्पचे चौथ्या तिमाहीचे निकाल हे अनुमानापेक्षा चांगले आले.
Hero MotoCorp Q4 result beats estimates
शुक्रवारी मार्केटच्या कामकाजानंतर एच डी.एफ.सी(HDFC) चे निकाल जाहीर झाले कंपनीच्या नफ्यात ८.७%नी वाढ झाली. कंपनीने प्रति समभाग रुपये २३ असा लाभांश जाहीर केला. HDFC Q4 profit rises 8.7% The lender’s board approved a final dividend of Rs. 23 per share for the financial year ended March.
कोरोनाचा प्रभाव रोखण्यास केंद्र सरकार अपयशी ठरले असून या सरकारमध्ये दूरदृष्टीचा अभाव आहे असे मत रिझर्व्ह बँकेचे माजी गव्हर्नर रघुराम राजन यांनी व्यक्त केले. Raghuram Rajan: Lack of leadership, complacency behind India’s Covid-19 crisis
अमेरिकेतील व्हाईट हाऊस चे मुख्य चिकित्सा सल्लागार Dr. Anthony Fauci यांनी भारतात लसीकरणाच्या वेगाबरोबरच , कमीतकमी २/३ आठवड्यांच्या ताळेबंदीची गरज आहे असे मत व्यक्त केले. Dr Anthony Fauci on India’s Covid Crisis- Shut down the country for a few weeks
(मार्केट मध्ये गुंतवणूक करताना तज्ञ व्यक्तीचा सल्ला घ्यावा )
जितेश सावंत
शेअर बाजार तज्ञ,
Technical and Fundamental Analyst-Stock Market
jiteshsawant33@gmail.com
JS/KA/PGB
8 may 2021