भारत आपले वित्तीय तूटीचे लक्ष्य गाठण्यात अपयशी ठरु शकतो

 भारत आपले वित्तीय तूटीचे लक्ष्य गाठण्यात अपयशी ठरु शकतो

नवी दिल्ली, दि.8 (एमएमसी न्यूज नेटवर्क): चालू आर्थिक वर्षात भारत अंदाजित वित्तीय तूटीचे (fiscal deficit) लक्ष्य गाठण्यात अपयशी ठरु शकतो. याचे मुख्य कारण महसूल प्राप्तीमध्ये घट होणे असेल. फिच सोल्यूशनने (Fitch Solutions) शुक्रवारी हे सांगितले आहे. चालू आर्थिक वर्षात (एप्रिल 2021 ते मार्च 2022) वित्तीय तूट सकल देशांतर्गत उत्पादनाच्या (जीडीपी) (GDP) तुलनेत 6.8 टक्के रहाण्याचा अंदाज सरकारने वर्तविला आहे. सरकारचे एकूण उत्पन्न आणि एकूण खर्च यातील फरकाला वित्तीय तूट असे म्हणतात.
 

वित्तीय तूट जीडीपीच्या 8.3 टक्के राहण्याचा अंदाज
The fiscal deficit is projected at 8.3 percent of GDP

फिच सोल्यूशनने म्हटले आहे की, “फिच सोल्यूशनमध्ये आम्ही भारताच्या केंद्र सरकारची वित्तीय तूट (fiscal deficit) 2021- 22 च्या अखेरीस जीडीपीच्या (GDP) 8.3 टक्के रहाण्याचा अंदाज व्यक्त करतो. वित्तीय तूट वाढण्याचे मुख्य कारण महसूल प्राप्तीत (revenue collection) घट होणे हे असेल. या काळात सरकार आपले खर्च करण्याचे लक्ष्य राखून ठेवेल असा आमचा अंदाज आहे. फिच सोल्युशन्सने (Fitch Solutions) याआधी वित्तीय तूट आठ टक्के रहाण्याचा अंदाज वर्तवला होता. संस्थेने म्हटले आहे की वित्तीय तूटीच्या अंदाजा मध्ये आमच्या सुधारणाचे मुख्य कारण म्हणजे महसूल स्थितीतील घट. भारतात कोरोना विषाणूचे (corona virus) वाढते रुग्ण आणि त्यासंदर्भात लावण्यात आलेले टाळेबंदीचे (Lockdown) उपाय यामुळे भारताच्या आर्थिक सुधारणांच्या गतीवर परिणाम होईल. याचा वित्तीय महसुलाच्या प्राप्तीवर नकारात्मक परिणाम होईल.
 

आर्थिक सुधारणेची स्थिती पूर्वीच्या तुलनेत कमकुवत
The state of economic recovery is weaker than before

वर्षाकाठी सरकारचा खर्च अंदाजे 34.8 लाख कोटी या अंदाजित पातळीवर असण्याची अपेक्षा आहे. सरकार साथीच्या काळात खर्चाची पातळी उच्च ठेवेल जेणेकरून आर्थिक सुधारणेची गती कायम राखता येईल. त्याच्याउलट, सरकारची महसुली प्राप्ती त्याच्या अंदाजपत्रकाच्या 17.8 लाख कोटी रुपयांच्या अंदाजापेक्षा कमी होऊन 16.5 लाख कोटी रहाण्याचा अंदाज आहे. देशातील सध्याच्या आरोग्य संकटामुळे भारताची आर्थिक सुधारणेची (economic recovery) स्थिती पूर्वीच्या तुलनेत कमकुवत दिसते. अशा परिस्थितीत सरकारकडून अर्थसंकल्पीय अंदाजापेक्षा जास्त खर्च होण्याची अपेक्षा दिसत नाही. 2021-22 च्या अर्थसंकल्पात, सरकारची मुख्यत्वेकरुन वाहतूक, नागरी विकास आणि वीज या क्षेत्रांव्यतिरिक्त आरोग्य सेवा, कृषी आणि ग्रामीण विकास या क्षेत्रावर खर्च करण्याची योजना आहे.
 
In the current financial year, India may fail to meet its projected fiscal deficit target. The main reason for this is the decline in revenue collection. Fitch Solutions said on Friday. In the current financial year (April 2021 to March 2022), the government has projected a fiscal deficit of 6.8 per cent of GDP. The difference between the total revenue of the government and the total expenditure is called the fiscal deficit.
PL/KA/PL/8 MAY 2021
 

mmc

Related post