रिझर्व्ह बँकेच्या गव्हर्नरांनी गुंतवणूकदारांना दिला हा इशारा

 रिझर्व्ह बँकेच्या गव्हर्नरांनी गुंतवणूकदारांना दिला हा इशारा

नवी दिल्ली, दि.13 (एमएमसी न्यूज नेटवर्क): रिझव्‍‌र्ह बँकेचे गव्हर्नर शक्तिकांत दास (RBI Governor Shaktikant Das) यांनी गुंतवणूकदारांना इशारा दिला आहे की मोठ्या कमाईच्या मागे धावताना सावधगिरी बाळगा कारण त्यात मोठी जोखीम असते. गव्हर्नर दास यांनी सांगितले की, गुंतवणूकदारांनी किंवा ठेवीदारांनी स्वत: जाणकार असण्याची आवश्यकता आहे. हे लक्षात घेणे महत्त्वाचे आहे की उच्च परतावा किंवा उच्च व्याजदर हे नेहमीच उच्च जोखमीशी संबंधित असतात. केवळ एखादी बँक जास्त व्याज देत आहे त्यामुळे त्याच्या मागे धावत पैसे गुंतवण्यापूर्वी खूप सावधगिरी बाळगली पाहिजे.

रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर (RBI Governor Shaktikant Das) म्हणाले की अशा काही संस्था देखील आहेत ज्या उच्च परतावा देत आहेत आणि त्या आर्थिकदृष्ट्या सक्षमही आहेत, परंतु ठेवीदारांनी नेहमीच सावध असले पाहिजे. दिल्लीत आयोजित करण्यात आलेल्या ‘डिपॉझिटर्स फर्स्ट’ कार्यक्रमात बोलताना गव्हर्नर दास म्हणाले की, बँकिंग प्रणाली मजबूत आणि लवचिक राहावी यासाठी रिझर्व्ह बँक वचनबद्ध आहे, परंतु ही एक सामायिक जबाबदारी आहे. ते म्हणाले की, प्रत्येक हितधारक मग ते बँकांचे व्यवस्थापन असो, बँकांचे मंडळ असो, बँकांच्या विविध समित्या असो, लेखापरीक्षण समिती असो, जोखीम व्यवस्थापन समिती असो किंवा इतर कोणतेही नियामक प्राधिकरण असो, आपली सर्वांची संयुक्त जबाबदारी आहे.

बँका किंवा वित्तीय संस्था बुडण्याच्या स्थितीत ठेवीदारांना त्यांच्या ठेवींच्या बदल्यात देण्यात येणाऱ्या विमा रकमेबाबत गव्हर्नर शक्तिकांत दास (RBI Governor Shaktikant Das) म्हणाले की, ही रक्कम हा शेवटचा पर्याय असायला हवा. रिझव्‍‌र्ह बँक बँकांसाठी नियामक मार्गदर्शक तत्त्वे मजबूत करून देखरेख यंत्रणा सक्षम करत आहे, जेणेकरून बँकांचे कामकाज अधिक लवचिक पद्धतीने पुढे चालू शकेल.

सर्वसाधारण अर्थसंकल्पाच्या घोषणेनुसार रिझर्व्ह बँकेने कोणतीही बँक किंवा वित्तीय संस्था अडचणीत आल्यास बँकांमध्ये असलेल्या ठेवींपैकी जास्तीत जास्त पाच लाख रुपये देण्यासाठी ठेव विमा धोरण लागू केले आहे. यामध्ये खात्यात जमा झालेली रक्कम किंवा जास्तीत जास्त पाच लाख रुपये बँकेच्या ठेवीदाराला परत करण्याची तरतूद आहे.

RBI Governor Shaktikant Das on Sunday warned investors to be cautious in pursuing high earnings as it carries high risk. Governor Das said investors or depositors need to be self-aware. It is important to note that higher returns or higher interest rates are always associated with higher risk.

PL/KA/PL/13 DEC 2021

mmc

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *