भांडवली बाजार(Stock Market) स्थिरावला.

 भांडवली बाजार(Stock Market) स्थिरावला.

मुंबई, दि. 11 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : जितेश सावंत  गेल्या काही दिवसांच्या पडझडीनंतर या आठवडयात बाजाराने सावरण्याचा प्रयत्न केला. नवीन विषाणू तितकासा घातक नसल्याचे मत व्हाईट हाऊसचे मुख्य मेडिकल ऑफिसर (White House’s chief medical advisor, Dr. Anthony Fauci )यांनी केल्याने व त्यामुळे अर्थव्यवस्थेला कमी धोका असल्याने गुंतवणूकदारांची बाजारातील सक्रियता वाढली.भारतीय बाजाराने देखील तेजी अनुभवली. आरबीआयचे गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी आपल्या पतधोरणात व्याजदर स्थिर ठेवले तसेच जीडीपी अंदाजात देखील कोणताही बदल केला नाही यामुळे निफ्टीने १७,५४३ चा वरचा टप्पा गाठला. तांत्रिकद्रुष्ट्या निफ्टीला खालच्या स्तरावर १७,००० चा चांगला सपोर्ट आहे.

शुक्रवारी भारतीय बाजार बंद झाल्यानंतर देशाच्या औदयोगिक उत्पन्नाचे ऑक्टोबरचे आकडे आले. औदयोगिक उत्पन्नात ३.२%वाढ झाली आहे.Industrial Production Rises Marginally To 3.2%. या आठवडयात रुपया ७५.८० या स्तरापर्यंत घसरला गेल्या दीड वर्षातील निच्चांक गाठला. या आठवडयात FII नी ९,०९२ करोड रुपयांची विक्री व DII नी ७,१८६करोड रुपयांची खरेदी केली.

येणाऱ्या आठवडयात गुंतवणूकदारांचे लक्ष १३ नोव्हेंबर महिन्याचे कंझ्युमर प्राईस इंडेक्सचे (CPI numbers)आकडे. १४ डिसेंबर रोजी ITC कंपनीची पहिलीवाहिली (first-ever) Institutional Investors and Financial Analysts ची बैठक. US FOMC ची सुरु होणारी दोन दिवसीय मीटिंग. १५ डिसेंबर रोजी US FED चा व्याजदर निर्णय. १६डिसेंबर रोजी जपान मधील तसेच युरोपियन सेंट्रल बँक(ECB) व्याजदर निर्णय. रुपयाची वाटचाल या कडे असेल.

सेन्सेक्स १,००० अंकांनी गडगडला. Sensex falls 1,000 pts.

भारतीय बाजारात घसरणीचा सिलसिला सुरूच होता. आठवड्याच्या पहिल्याच दिवशी बाजारात प्रचंड घसरण झाली. सकाळच्या सकारात्मक सुरुवातीनंतर बाजार वरच्या स्तरावर तग धरू शकला नाही. .बाजारात चौफेर विक्री झाली. पडझडीची प्रमुख कारणे, भारतात रविवारी नव्या विषाणूचे(Omicron) एकाच दिवशी सापडलेले १७ रुग्ण,FIIची जबरदस्त विक्री,तसेच RBI Policy च्या अगोदर गुंतवणूकदारांचा सावध पवित्रा. सोमवारच्या सत्रात IT क्षेत्राला सर्वाधिक फटका बसला त्या खालोखाल Nifty Bank, Auto, Financial Services, FMCG, Metal आणि Pharma क्षेत्रात घसरण झाली. बाजार बंद होताना सेन्सेक्स ९४९ अंकांनी घसरून ५६,७४७ या स्तरावर बंद झाला व निफ्टी २८४ अंकांनी घसरून १६,९१२ चा बंददिला. Markets crash as investor sentiment was dented by rising cases of the Omicron variant over the weekend.

निफ्टीने १७,१०० चा टप्पा केला पार Nifty reclaims 17,100.

सलग दोन दिवसांच्या घसरणीला मंगळवारी चांगलाच ब्रेक लागला अमेरिकन बाजारातील तेजीने आशियाई बाजारात जोश भरला निफ्टीने १७,१०० चा स्तर पार केला.दिवसभरात निफ्टीने १७,१७१ व सेन्सेक्सने ५७,६४२ चा उच्चतम स्तर गाठला. नवीन विषाणूबाबत सुरवातीच्या अभ्यासानंतर हा विषाणू तितकासा घातक नसल्याचे मत White House’s chief medical advisor, Dr. Anthony Fauci यांनी केल्याने अमेरिकन बाजारात जोश भरला व त्यामुळे अर्थव्यवस्थेला कमी धोका असल्याने गुंतवणूकदारांचा उत्साह वाढला जगभरातील बाजारात तेजी पसरली,भारतीय बाजारात देखील चौफेर खरेदी झाली.metal, PSU bank, Auto, capital goods, IT, oil & gas आणि power या क्षेत्रात दमदार खरेदी झाली. Indian markets make a strong comeback as the early findings suggest that Omicron is unlikely to cause a severe illness.

सेन्सेक्समध्ये १,०१६ अंकांची वाढ. आरबीआयने ठेवले व्याजदर स्थिर. Sensex up 1,016 points as RBI holds rates steady.

सलग दुसऱ्या दिवशी भारतीय बाजारात वाढ झाली. ओमिक्राॅन संकटाच्या पार्शवभूमीवर बाजाराचे लक्ष आरबीआयच्या पतधोरणकडे होते.परंतु गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी पतधोरणात व्याजदर स्थिर ठेवले तसेच जीडीपी अंदाजात देखील कोणताही बदल केला नाही यामुळे बाजारात जोश पसरला. ओमिक्राॅनचे संकट थोडेसे निवळले असल्याने तसेच जागतिक बाजारातील तेजीने बाजाराच्या वाढीत अजून भर टाकली.बाजारात चहुबाजूनी खरेदी झाली. दिवसभरात सेन्सेक्सने १,००० अंकांची उसळी घेतली. बाजार बंद होताना सेन्सेक्स१,०१६अंकांनी वधारून ५८,६४९ या स्तरावर बंद झाला व निफ्टी २९३ अंकांनी वधारून १७,४६९ चा बंददिला. Markets end strong for the second consecutive day after Reserve Bank of India (RBI) kept the key rates unchanged.

सलग तिसऱ्या दिवशी बाजाराने दिला सकारात्मक बंद. Markets close with gains for the third straight trading session.

सलग दोन दिवसांच्या तेजीनंतर बाजाराची सुरुवात चांगली झाली परंतु वरच्या स्तरावरती नफावसुली झाली. दिवसभर बाजार एका विशिष्ट पातळीभोवती फिरत होता.परंतु दिवसअखेर पुन्हा तेजी पसरली.FMCG, oil & gas आणि capital goodsसमभागात झालेल्या खरेदीमुळे बाजाराला आधार मिळाला.गुंतवणूकदारांचे लक्ष अमेरिकेतील महागाईच्या आकड्यांकडे लागले होते (US inflation data) कारण याच आधारावर फेड (Fed) चा आर्थिक पॅकेज चा निर्णय ठरणार आहे (decision on rolling back economic stimulus). बाजार बंद होताना सेन्सेक्स १५७ अंकांनी वधारून ५८,८०७ या स्तरावर बंद झाला व निफ्टी ४७ अंकांनी वधारून १७,५१६चा बंददिला. Sensex, Nifty Extend Gains For Third Session Aided By Reliance, L&T.

चढउतारामुळे बाजार सपाट बंद. Markets end on a flat note in the highly volatile session.

सलग तीन दिवसांच्या तेजीनंतर शुक्रवारी बाजारात हलकी नफावसुली झाली. जागतिक बाजारात देखील नरमाई होती. शेवटच्या तासात थोडी खरेदी झाली परंतु बाजार सपाट बंद झाला. realty आणि PSU banking क्षेत्रातील खरेदीमुळे बाजार सावरला. बाजार बंद होताना सेन्सेक्स २० अंकांनी घसरून ५८,७८६ या स्तरावर बंद झाला व निफ्टी ५ अंकांनी घसरून १७,५११ चा बंददिला.भांडवली बाजार(Stock Market) स्थिरावला.
(लेखक शेअर बाजार तज्ञ, तसेच Technical and Fundamental Analyst आहेत.)

jiteshsawant33@gmail.com

ML/KA/PGB

11 Dec 2021

mmc

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *