रिझर्व्ह बँकेच्या सेंट्रल बोर्डाची क्रिप्टोकरन्सी आणि सीबीडीसीवर चर्चा

 रिझर्व्ह बँकेच्या सेंट्रल बोर्डाची क्रिप्टोकरन्सी आणि सीबीडीसीवर चर्चा

नवी दिल्ली, दि.18 (एमएमसी न्यूज नेटवर्क): भारतीय रिझर्व्ह बँकेची (RBI) सर्वोच्च धोरण-निर्धारण संस्था केंद्रीय बोर्डाने केंद्रीय बँक डिजिटल चलन (CBDC) आणि खासगी क्रिप्टोकरन्सीशी (cryptocurrency) संबंधित सर्व पैलूंवर चर्चा केली. सरकार क्रिप्टोकरन्सीच्या नियमनासाठी कायदा आणण्याच्या तयारीत आहे. संसदेच्या चालू हिवाळी अधिवेशनात क्रिप्टोकरन्सी आणि अधिकृत डिजिटल चलन नियमन विधेयक 2021 सादर करण्याची योजना आहे. मात्र, सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, या अधिवेशनात हे विधेयक मांडले जाण्याची शक्यता कमी आहे.

रिझर्व्ह बँकेने (RBI) एका निवेदनात म्हटले आहे की, गव्हर्नर शक्तीकांत दास यांच्या नेतृत्वाखाली लखनऊ येथे केंद्रीय बोर्डाची बैठक झाली. या बैठकीत केंद्रीय बँक डिजिटल चलन (CBDC) आणि खासगी क्रिप्टोकरन्सीशी (cryptocurrency) संबंधित सर्व पैलूंवर चर्चा करण्यात आली. रिझर्व्ह बँकेने बँक नोटांच्या व्याख्येमध्ये सुधारणा करण्यासाठी रिझर्व्ह बँक कायदा 1934 मध्ये सुधारणा करण्याचा प्रस्ताव सरकारला दिला आहे. यामध्ये डिजिटल चलनाचाही समावेश करण्याची योजना आहे.

रिझर्व्ह बँकेने (RBI) क्रिप्टोकरन्सीच्या (cryptocurrency) विरोधात अनेक वेळा आपले मत व्यक्त केले आहे. देशाच्या आर्थिक स्थैर्यासाठी ते गंभीर मानतात. त्यामुळेच आगामी काळात रिझर्व्ह बँक स्वत:च्या नियमनात एक डिजिटल चलन (CBDC) आणण्याची तयारी करत आहे. रिझर्व्ह बँकेने आपल्या निवेदनात म्हटले आहे की केंद्रीय बोर्डाने सध्याची आर्थिक परिस्थिती आणि आव्हानांचाही आढावा घेतला. सध्याची देशांतर्गत आणि जागतिक परिस्थिती लक्षात घेता, आवश्यक पावले देखील विचारात घेण्यात आली.

केंद्रीय बोर्डाने 30 सप्टेंबर 2021 रोजी संपलेल्या सहामाहीसाठी रिझर्व्ह बँकेच्या अर्धवार्षिक उत्पन्न विवरणावर चर्चा केली. याशिवाय रिझर्व्ह बँकेच्या विविध कामकाजावरही चर्चा झाली. या बैठकीत डेप्युटी गव्हर्नर महेश कुमार जैन, मायकेल देबव्रत पात्रा, एम राजेश्वर राव आणि टी रविशंकर हे देखील उपस्थित होते. बैठकीत केंद्रीय बोर्डाचे इतर संचालक सतीश के मराठे, एस गुरुमूर्ती, रेवती अय्यर आणि सचिन चतुर्वेदी यांच्याव्यतिरिक्त वित्तीय सेवा विभागाचे सचिव देबाशीष पांडा देखील उपस्थित होते.

The Central Board, the apex policy-making body of the Reserve Bank of India (RBI), discussed all aspects related to Central Bank Digital Currency (CBDC) and private cryptocurrency. The government is preparing to enact legislation to regulate cryptocurrency. The Cryptocurrency and Official Digital Currency Regulation Bill 2021 is planned to be introduced in the current winter session of Parliament.

PL/KA/PL/18 DEC 2021

 

mmc

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *