अमेरिकन फेडचे व्याजदार वाढविण्याचे संकेत,भांडवली बाजारात (Stock Market) अस्थिरता

 अमेरिकन फेडचे व्याजदार वाढविण्याचे संकेत,भांडवली बाजारात (Stock Market) अस्थिरता

मुंबई, दि. 18 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : जितेश सावंत
गेला संपूर्ण आठवडा बाजारासाठी निराशाजनक ठरला.एक दिवस वगळता उरलेल्या दिवशी बाजारात मोठ्या प्रमाणात घसरण झाली.जागतिक बाजारातील महागाई, विदेशी गुंतवणूकदारांची सातत्याने होणारी विक्री(FIIselling),अमेरिकन फेडचे(USFed) व्याजदार वाढविण्याचे संकेत,रुपयाची ऐतिहासिक घसरण (Rupee is at nearly 20 months low), बँक ऑफ इंग्लंडने तीन वर्षानंतर व्याजदरात केलेली वाढ (The Bank of England has raised interest rates for the first time in more than three years) ओमिक्रॉनचे भारतातील वाढते रुग्ण,ब्रिटन मधील नव्या विषाणूमुळे झालेला जगातील पहिल्या मृत्यू,भारतातील घाऊक बाजारातील (WPI Inflation)महागाईने १२ वर्षानंतरगाठलेली उच्चांकी पातळी, या कारणांनी बाजार कोसळला.अर्थसंकल्प सादर होईपर्यंत बाजारात चढ उताराचे प्रमाण अधिक राहील.
या आठवड्यात निफ्टीने १७,००० चा आपला भक्कम स्तर तोडला.निफ्टीसाठी १६,८००-१६,७००हे महत्वाचे स्तर आहेत. जर निफ्टी हे स्तर टिकवण्यात यशस्वी नाही ठरली तर येणाऱ्या काळात निफ्टी १६,४०० -१६,२५० चा स्तर देखील  गाठू शकेल. तसेच वरती जाण्याकरिता १७,२०० चा स्तर अत्यंत महत्वाचा आहे.

येणाऱ्या आठवडयात गुंतवणूकदारांचे लक्ष विदेशी गुंतवणूकदारांचे खरेदी/विक्रीचे आकडे,२३ डिसेंबर रोजी संपणारे संसदेचे हिवाळी अधिवेशन,रुपयाची वाटचाल याकडे असेल.दिनांक २४-२६ डिसेंबर रोजी काही जागतिक बाजार ख्रिसमसच्या निमित्याने बं द राहतील.

सेन्सेक्स ५०० अंकांनी घसरला.Sensex falls 500 points

दमदार सुरुवातीनंतर सोमवारी बाजारात घसरण झाली. निफ्टीने १७,६३९.५० ची दिवसभराची उच्चतम पातळी गाठल्यानंतर बाजारात नफावसुली झाली.IT वगळता सगळ्या क्षेत्रात खास करून realty, oil & gas आणी PSU banking समभागात प्रचंड घसरण झाली.कामकाजाच्या नंतर जाहीर होणाऱ्या inflation data व FII ची सतत होणारी विक्री यामुळे बाजारावर दबावाचे वातावरण होते.निफ्टीने दिवसभरात १७,३५५.९५ चा निच्चांक गाठला. बाजारात चढ उताराचे प्रमाण जास्त होते.. बाजार बंद होताना सेन्सेक्स ५०० अंकांनी घसरून ५८,२८३ या स्तरावर बंद झाला व निफ्टी १४३ अंकांनी घसरून १७,३८६ चा बंददिला.

सोमवारी संध्याकाळी किरकोळ महागाईचे नोव्हेंबरमधील आकडे ४.९%.असे जाहीर झाले ह्यात किंचित वाढ झाली आहे. Retail inflation rate rises to 4.91% in November 2021.

महागाईने गाठली १२ वर्षांतील उच्चांकी पातळी.WPI inflation accelerates to a12-year high of 14.23% in November

ब्रिटन मध्ये नव्या विषाणूच्या प्रभावाने झालेल्या जगातील पहिल्या मृत्यूच्या नोंदीने अमेरिकन बाजार कोसळले त्या पार्श्वभूमीवर मंगळवारी भारतीय बाजाराची सुरुवात खराब झाली auto, banking ,financial services आणि realty क्षेत्रातील समभाग घसरले. Asian markets मधील कमजोरी तसेच आगामी US Fed policy बैठक यामुळे बाजारावरील दबाव आणखीनच वाढला.कामकाज सुरु असताना घाऊक बाजारातील महागाई दराचे आकडे जाहीर झाले. १९९१ नंतर महागाई दराने उच्चांकी पातळी गाठली. नोव्हेंबर महिन्यात घाऊक बाजारातील महागाई दर तब्बल १४.२३ टक्के इतका वाढला(WPI Inflation At Its Highest Since 1991) यामुळे बाजाराचा मूड खराब झाला. बाजार बंद होताना सेन्सेक्स १६६ अंकांनी घसरून ५८,११७ या स्तरावर बंद झाला व निफ्टी ४३ अंकांनी घसरून १७,३२४ चा बंददिला. Markets end the session on a negative note.

सेन्सेक्स ३०० अंकांनी घसरला.Sensex down300 points

सलग चवथ्या दिवशी विकली एक्सपायरीच्या अगोदर बाजारात चढ उताराचे प्रमाण जास्त होते. बाजरीची सुरुवात सपाट झाली परंतु दिवसभर बाजारावर दबावाचे वातावरण होते. जागतिक बाजारातील कमजोरी तसेच अमेरिकन फेडचा व्याज दर निर्णयाच्या अगोदर बाजार दबावात होता.बाजारात रिकव्हरी झाली. परंतु बाजार दिवसभरातील निचांकी पातळीजवळ बंद झाला. विदेशी गुंतवणूकदारांची विक्री सुरूच होती. ऑटो क्षेत्र वगळता बाकी क्षेत्रात घसरण झाली. बाजार बंद होताना सेन्सेक्स ३२९ अंकांनी घसरून ५७,७८८ या स्तरावर बंद झाला व निफ्टी १०३ अंकांनी घसरून १७,२२१ चा बंददिला. Sensex, Nifty Decline For Fourth Straight Session.

डॉलरच्या तुलनेत रुपयात पुन्हा कमकुवत झाला. रुपयाने २४ एप्रिल २०२० नंतरच्या खालच्या पातळीवर ३६ पैसे कमजोर होऊन ७६.२३चा बंद दिला.

जागतिक बाजारातील तेजीच्या जोरावर गुरुवारी भारतीय बाजारात वाढ झाली. निफ्टीने १७,२०० चा टप्पा पार केला बाजारात नफावसुली देखील झाली परंतु पुन्हा बाजाराने उसळी घेतली. अमेरिकन फेड च्या बैठकीत व्याजदरात वाढ न करण्याचा निर्णय झाला.परंतु पुढील वर्षभरात किमान तीनदा व्याजदर वाढवण्याचे संकेत फेड ने दिले.(The Federal Reserve chairman Jeremy Powell announced to double the pace of asset tapering by early 2022 rather than a mid-2022, paving the way for possible three interest rate hikes).होताना सेन्सेक्स११३ अंकांनी वधारून ५७,९०१या स्तरावर बंद झाला व निफ्टी २७ अंकांनी वधारून १७,२४८ चा बंददिला.

निफ्टीने १७,००० चा स्तर तोडला.Nifty below 17,000

एक दिवसाच्या विश्रांतीनंतर पुन्हा एकदा बाजारात घसरण झाली. जागतिक बाजारातील पडझड,वाढती महागाई,विदेशी गुंतवणूकदारांची सातत्याने होणारी विक्री,फेडचे संकेत,ओमिक्रॉनचे संकट या सगळ्या मिश्रणामुळे बाजार गडगडला. दिवसभरामध्ये निफ्टीने १७,००० चा स्तर तोडला.सेन्सेक्स ८००अंकांपेक्षा अधिक घसरला. IT क्षेत्रातील तेजीमुळे घसरण कमी झाली अन्यथा बाजार अधिक घसरला असता.. बाजार बंद होताना सेन्सेक्स ८८९ अंकांनी घसरून ५७,०११ या स्तरावर बंद झाला व निफ्टी २६३ अंकांनी घसरून १६,९८५ चा बंददिला.

(लेखक शेअर बाजार तज्ञ, तसेच Technical and Fundamental Analyst आहेत.)

jiteshsawant33@gmail.com

JS/KA/PGB

18 Dec 2021

 

mmc

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *