अन्यथा सचिन तेंडुलकरांचा पुतळा तोडणार !

 अन्यथा सचिन तेंडुलकरांचा पुतळा तोडणार !

अन्यथा सचिन तेंडुलकरांचा पुतळा तोडणार !

मुंबई, दि. 9 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : जागतिक क्रिकेटमध्ये 100 शतके ठोकण्याचा विश्वविक्रम करणारा भारतीय संघाचा एकमेव फलंदाज मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर यांचा छत्तीसगड मधील देवगहान – गुंडेरदेही येथे 5 एकर जागेमध्ये स्व:खर्चाने पुतळा बसवण्यात आला आहे.या ठिकाणी कारगील व चीन मधील गलवान घाटी युद्धात शहीद झालेल्या वीर जवानांचे छायाचित्रे लावण्यात आले आहे. या क्रीडांगणचे येत्या 15 आगस्ट रोजी सचिन तेंडुलकर यांच्या हस्ते उदघाटन करण्याचा मानस आहे. याबाबत त्यांच्या कार्यालयासोबत पत्रव्यवहार देखील केला आहे .मात्र त्यांच्या कार्यालयाकडून अद्याप पर्यत कुठला ही प्रतिसाद मिळाला नाही. जर सचिन तेंडुलकर या उदघाटनाला आला नाही तर त्यांचा तो पुतळा तोडून त्यांच्या जागी शहीद भगतसिंग व चंद्रशेखर आझाद यांचा पुतळा उभारण्यात येईल असा इशारा देवगहान – गुंडेरदेही माजी सरपंच लोकेंद्र साहू यांनी आज घेतलेल्या पत्रकार परिषदेत दिला.

छत्तीसगड राज्यातील बलोद जिल्ह्यातील
देवगहान – गुंडेरदेही गावातील माजी सरपंच
लोकेंद्र साहू हे शेतकरी कुटुंबातील आहे.
‘बेटी बचाव बेटी पडाव’हा संदेश स्वीकारल्यानंतर साहू यांनी दोन मुलींवर कुटुंब नियोजन करण्याचा निर्णय घेतला. लहान मुलगी कु. तान्या (३२ वर्षे) हिच्या जन्माचे औचित्य साधून त्यांनी दोन वर्षांपूर्वी महान क्रिकेटपटू भारतरत्न सचिन तेंडुलकर यांचा एक लाख रुपये खर्चून गावात गार्डन बनवून त्यांचा पुतळा बसविला.साहू हे स्वतः एक क्रिकेट खेळाडू आहे .भारतीय क्रिकेट संघात खेळण्याचे स्वप्न उराशी बाळगून ते शिक्षण सोडून २००१ – ०२ मध्ये मुंबई नॅशनल क्रिकेट क्लब (क्रॉस ग्राउंड) येथे कोचिंग घेतले,परंतु त्यांचे स्वप्न पूर्ण होऊ शकले नाही.

सचिववर असलेल्या अपार प्रेमापोटी त्यांनी गावात सचिनच्या नावाने गार्डन बनवून त्या ठिकाणी त्यांचा पुतळा बसविण्यात आला.
आता १२ लाख रुपये खर्च करून या गार्डन मध्ये पुलवामा हल्ला,कारगिल व चीनच्या गलवान घाटीच्या युद्धात शाहिद झालेल्या
वीर जवानांचे छायाचित्रे लावले.सध्या ते गावात शेती करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करत आहेत .
त्यांची धाकटी मुलगी सौ. तान्याच्या जन्म सोहळ्याला येण्यासाठी त्यांच्या पत्नी सचिन तेंडुलकर यांना सतत पत्रे लिहित आहे, पण आजतागायत उत्तर आलेले नाही.यापूर्वी अनेकवेळा मुंबईला जाऊन सचिन सरांना भेटण्याचा प्रयत्न केला पण त्यांना भेटता आले नाही, सचिन सरांची वाट पाहत मी माझ्या मुलीचा जन्म साजरा केला नाही. माझी मुलगी अजूनही सचिन सरांची वाट पाहत आहे. ती दररोज सचिनच्या पुतळ्याच्या ठिकाणी जाऊन सचिनला विचारते (सचिन सर आमच्या घरी कधी येणार)? रक्षाबंधनाच्या वेळी माझ्या मुली सचिनच्या पुतळ्याच्या मनगटावर राखी बांधतात आणि प्रत्येक सणाला शुभेच्छा देण्यासाठी जातात आणि दरवर्षी 24 एप्रिलला सचिनचा वाढदिवस पुतळ्यासमोर केक कापून साजरा करतात.
येत्या १५ आगस्ट रोजी वीर जवानांचे छायाचित्रांचे उदघाटन करण्यासाठी जर सचिन तेंडुलकर आला नाही तर त्यांचा तो पुतळा तोडून त्यांच्या जागी शहीद भगतसिंग व चंद्रशेखर आझाद यांचा पुतळा उभारण्यात येईल असा इशारा देवगहान – गुंडेरदेही माजी सरपंच लोकेंद्र साहू यांनी पत्रकार परिषदेत दिला. Otherwise Sachin Tendulkar’s statue will be broken!

ML/ML/PGB
9 July 2024

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *