बोगद्यात पाणी आल्याने कोकण रेल्वे दुसऱ्यांदा ठप्प

 बोगद्यात पाणी आल्याने कोकण रेल्वे दुसऱ्यांदा ठप्प

सिंधुदुर्ग, दि. १० (एमएमसी न्यूज नेटवर्क) : पेडणे येथील बोगद्यामध्ये रात्री तीन वाजता पुन्हा एकदा पाणी भरल्यामुळे रात्र तीन वाजल्यापासून या ठिकाणचे वाहतूक पुनश्च ठप्प झाली आहे , पाणी काढण्याचे काम अद्यापही सुरू आहे. कालपासून दुसऱ्यांदा हा प्रकार घडला आहे. यामुळे कोकण रेल्वे मार्गावरील काही ट्रेन्स रद्द करण्यात आलेल्या आहेत.

यामध्ये मुंबईहून सुटणारी 22229 सीएसएमटी मडगाव वंदे भारत एक्सप्रेस, 12051सीएसएमटी मडगाव जनशताब्दी एक्सप्रेस ,10103 मांडवी एक्सप्रेस ह्या मुंबईहून सुटणाऱ्या गाड्या आज रद्द करण्यात आलेल्या आहेत .तर मडगावहून आज सुटणाऱ्या 10104 मडगाव मुंबई मांडवी एक्सप्रेस, 50108 मडगाव सावंतवाडी पॅसेंजर ,22120 मडगाव मुंबई तेजस एक्सप्रेस, 12052 मडगाव मुंबई जनशताब्दी एक्सप्रेस, 10106 सावंतवाडी दिवा एक्सप्रेस या गाड्या देखील रद्द करण्यात आलेल्या आहेत .

12618 हजरत निजामुद्दीन एरणाकुलम ही काल हजरत निजामुद्दीन सुटलेली मंगला एक्सप्रेस गाडी पुणे मिरज लोंढा मार्गे वळवण्यात आलेली आहे. काल देखील याच बोगद्यात पाणी साचल्याने वाहतूक बंद करण्यात आली होती, काही वेळाने पाणी काढून धीम्या गतीने ती सुरू झाली होती मात्र आज पुन्हा पाणी भरले आहे.

ML/ML/SL

10 July 2024

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *