ONGC मध्ये 2236 पदांसाठी भरती

मुंबई, दि. ८ (एमएमसी न्यूज नेटवर्क) :
ऑइल अँड नॅचरल गॅस कॉर्पोरेशन लिमिटेड (ONGC) मध्ये 2236 शिकाऊ पदांसाठी भरती करण्यात येणार आहे. त्यासाठी अर्ज भरण्याची प्रक्रियाही सुरू झाली आहे. या पदांसाठी इच्छुक असलेले उमेदवार 5 ऑक्टोबर 2024 ते 25 ऑक्टोबर 2024 या कालावधीत ONGC ongcindia.com च्या अधिकृत वेबसाइटद्वारे ऑनलाइन अर्ज करू शकतात. भरतीसाठी अधिकृत अधिसूचना ओएनजीसी वेबसाइट (ongcindia.com) वर प्रसिद्ध झाली आहे.
सर्व निकष पूर्ण करणारे उमेदवार त्यांचे अर्ज ऑनलाइन सबमिट करू शकतात. अर्ज प्रक्रियेची सुरुवात 5 ऑक्टोबर 2024 आहे आणि अर्ज करण्याची अंतिम तारीख 25 ऑक्टोबर 2024 आहे. निवड प्रक्रियेचा निकाल 15 नोव्हेंबर 2024 रोजी जाहीर होणे अपेक्षित आहे.
बीए, बीकॉम., बीएससी., बीबीए., बीई आणि बीटेक पात्रता असलेल्या तरुणांची ओएनजीसीमध्ये अनेक ट्रेडसाठी भरती केली जाईल.
SL/ ML/ SL
8 Oct. 2024