हनुमान जन्मोत्सवानिमित्त जोर, बैठकांचा हनुमानाला अभिषेक

 हनुमान जन्मोत्सवानिमित्त जोर, बैठकांचा हनुमानाला अभिषेक

सिंधुदुर्ग, दि. 6 (एमएमसी न्यूज नेटवर्क): जिल्ह्यात हनुमान जन्मोत्सव मोठ्या भविकतेने साजरा करण्यात आला, वेंगुर्ले येथील हनुमान मंदिरात हनुमान जन्मदिन साजरा करण्यात आला. पहाटे हनुमानाची विधीवत पूजा केल्यानंतर मंदिरामध्ये हनुमान जन्म सोहळ्यावर किर्तन सांगण्यात आले. यानंतर मारुती जन्म सोहळा साजरा करण्यात आला.On the occasion of Hanuman Janmotsava, emphasis, meetings are dedicated to Hanuman

मारुती जन्मदिनानिमित्त मंदिरात विविध झाडे ,फुले व फळे यांची मंदिरात सजावट केलेली होती. विशेष म्हणजे राम ,सीता व हनुमान फळ हे सजावटीत लक्षवेधी ठरत होते मंदिराला आकर्षक विद्युत रोषणाई अधिकच शोभा वाढवणारी ठरत होती.

श्री हनुमान हे दैवत व्यायामपटूंचे आदराचे दैवत आहे म्हणूनच बलशाली शरीर व उत्तम आरोग्यासाठी श्री हनुमानाची आराधना केली जाते .हनुमान जन्मोत्सवाचे औचित्य साधत वेंगुर्ले येथील सातेरी व्यायाम शाळा यांच्या शरीर सौष्ठवपटूनी दहा हजार जोर व बैठकां काढून हनुमानाला बलिष्ठ असा अभिषेक अर्पण केला .उत्तम आरोग्य , निर्व्यसनी आणि बलशाली राहण्यासाठी व्यायाम हा एकमेव पर्याय आहे असा संदेश यावेळी देण्यात आला.

ML/KA/PGB
6 Apr. 2023

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *