उत्तर कोरियाच्या हुकूमशहाने दिली ३० सरकारी अधिकाऱ्यांना फाशी

 उत्तर कोरियाच्या हुकूमशहाने दिली ३० सरकारी अधिकाऱ्यांना फाशी

प्योंगयांग, दि. ४ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : उत्तर कोरियाचा क्रूर हुकुमशाह किम जोंग उन यांनी आता पुन्हा एकदा एक भयंकर निर्णय आमलात आणला आहे. त्यानं तब्बल 30 सरकारी अधिकाऱ्यांना फासावर लटकवले आहे. उत्तर कोरियात पुरानंतर निर्माण झालेली परिस्थिती हातळण्यात अपयशी ठरल्याचा ठपका त्यांच्यावर ठेवण्यात आला होता. या चुकीसाठी किम जोंग उननं सर्वांना फासावर लटकवलं आहे. याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, उत्तर कोरियामध्ये भूस्खलन आणि पुरामुळे 1000 पेक्षा जास्त नागरिकांचा मृत्यू झाला होता. हे नैसर्गिक संकट हाताळ्यात सरकारी अधिकाऱ्यांना अपयश आलं. त्यांच्यावर भ्रष्टाचार तसंच कामात हलगर्जीपणा केल्याचा आरोप ठेवण्यात आला होता.

दक्षिण कोरियामधील अनेक रिपोर्टमध्ये याबाबत माहिती देण्यात आली आहे. दक्षिण कोरियन मीडिया चॅनल Chosun TV नुसार उत्तर कोरियाच्या पूर प्रभावित क्षेत्रामधील या अधिकाऱ्यांना एकाच वेळी फाशी देण्यात आली आहे. फाशी देण्यात आलेल्या अधिकाऱ्यांची ओळख जाहीर करण्यात आलेली नाही. मीडिया रिपोर्टनुसार, उत्तर कोरियामध्ये पूरामुळे मोठं नुकसान झालं आहे. भूस्खलन आणि पूरामुळे चागांग प्रांतामधील काही भागांना मोठा फटका बसला आहे. या दुर्घटनेत 1000 पेक्षा जास्त उत्तर कोरियन नागरिकांचा मृत्यू झाला. हुमकशाह किमनं पूरग्रस्त भागाचा दौरा केला होता. या दौऱ्यात झालेलं नुकसान पाहून किम संतापला आणि त्यानं तातडीनं निष्काळजीपणाचा आरोप ठेवत 30 सरकारी अधिकाऱ्यांना फाशीची शिक्षा सुनावली.

उत्तर कोरियाच्या हुकमशाहनं पूरामध्ये मोठ्या प्रमाणात नागरिकांचा मृत्यू झाल्याचं वृत्त फेटाळलं आहे. त्यानं दक्षिण कोरियावर देशाच्या आंतरराष्ट्रीय प्रतिमेचं नुकसान करण्यासाठी ही अफवा पसरवल्याचा आरोप केला आहे. किम जोंग उनच्या क्रूरपणाचे हे काही पहिलं उदाहरण नाही. त्याने कारकि‍र्दीच्या सुरुवातीपासूनच अनेक कठोर शिक्षा आमलात आणल्या आहेत. त्यानं यापूर्वी त्याच्या 67 वर्षांचे काका किम जोंग थाएक यांना 120 उपाशी शिकारी कुत्र्यांच्या पिंजऱ्यात सोडलं होतं. थाएक यांच्या मृत्यूबाबत आवाज उठवणाऱ्या त्यांच्या पत्नीलाही विष देऊन मारण्यात आलं. त्यानंतर त्यांचा मृत्यू हार्ट अटॅकनं झाल्याचं जाहीर करण्यात आलं. किम जोंग उननं फेब्रुवारी 2015 मध्ये त्याचा सावत्र भाऊ किम जोंग नामची मलेशीयामध्ये हत्या घडवून आणली होती. किम जोंग नामवर उत्तर कोरियाच्या विरोधात हेरगिरी केल्याचा आरोप ठेवण्यात आला होता. मलेशियातील विमानतळावर दोन मुलींनी विषारी पिन टोचवून त्यांची हत्या केली होती.

SL/ML/SL

4 Sept 2024

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *