सांगलीमध्ये २०० वर्षांची परंपरा असलेल्या चोर गणपतीचे आगमन

 सांगलीमध्ये २०० वर्षांची परंपरा असलेल्या चोर गणपतीचे आगमन

सांगली, दि. ४ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : राज्यात घरोघरी गणपतीच्या स्वागताची जोरदार तयारी सुरु झाली आहे. प्रथेप्रमाणे आपल्या घरी चतुर्थीला गणरायाचे आगमन होते. मात्र सांगलीमध्ये गणेशाचे आगमन चार दिवस आधीच होते. याला चोर गणपती म्हणून ओळखले जाते. ही २०० वर्षांची परंपरा आहे. सांगलीच्या मंदिरात चोर गणपती विराजमान झाला आहे. गणपती हे सांगलीकरांचे आराध्य दैवत आहे. इथल्या प्रसिद्ध गणेश मंदिरात चोर गणपती बसवण्याची ही परंपरा शेकडो वर्षांपासून आजतागायत सुरु आहे. गणेश चतुर्थीच्या चार दिवसांपूर्वी बाप्पाच्या मूर्तीची स्थापना केली जाते. हा गणपती सांगलीतील श्री गणपती पंचायतन संस्थानाच्या सांगलीतील प्रसिद्ध गणपती मंदिरात हा चोर गणपती बसवला जातो.

गणेश चतुर्थीला सर्वत्र थाटामाटात गणेशाचे आगमन होते. परंतु, सांगलीत चार दिवसांपूर्वीच गणपतीचे आगमन होते. भाद्रपद शुद्ध प्रतिपदा ते भाद्रपद शुद्ध पंचमी या काळात हा गणपती बसवला जातो. हा गणपती कोणालाही माहित न पडता त्याची स्थापना केली जाते. म्हणून या प्रथेला चोर गणपती म्हणतात. सांगलीमध्ये ही परंपरा मागली दोनशे वर्षांपासून सुरु आहे.

सांगलीतील चोर गणपतीची मूर्ती ही कागदी लगदयापासून बनवली जाते. या मूर्तीचे विसर्जन केले जाते. ही मूर्ती पर्यावरण पूरक असते. या मूर्तीचे जतन करुन ती सुखरुप ठिकाणी ठेवली जाते.

या मंदिरातील पुजारी रमेश पाठणकर यांनी दिलेल्या माहितीनुसार, या गणपती बरोबरच गणेश चतुर्थीला नियमित गणेशाची स्थापना होते. या ठिकाणी हा पाच दिवसाचा आराधनेचा सोहळा असतो. राजे विजयसिंह पटवर्धन यांच्या श्री गणपती पंचायतन संस्थानच्या या सोहळ्यासाठी अनेक राज्यातील शेकडो भाविक येतात. या ठिकाणचे गणपती मंदिर प्रसिध्द असून हा नवसाला पावणारा गणपती आहे. या परिसरातील प्रतिपदेला पहाटे पाच वाजता पारंपरिक पद्धतीने “चोर’ गणपतीची प्रतिष्ठापना झाली. साडेतीन फुटांच्या दोन मूर्तींची प्रतिष्ठापना होते.

दोनशे वर्षांपूर्वी कागदाच्या लगद्यापासून पर्यावरणपूरक मूर्ती तयार करण्यात आली होती. तेव्हापासून ती तशीच आहे. दरवर्षी रंगरगोटीशिवाय तिला हात लावला जात नाही. मुख्य मूर्तीच्या डाव्या-उजव्या बाजूला दोन्हीही मूर्ती बसवण्यात येतात. भाविक-भक्तांना हात लावून दर्शन घेता येते. उत्सवानंतर मूर्ती सुरक्षितस्थळी ठेवण्यात येतात. या परिसरातील एकात्मता मंदिर असून येथे सर्व धर्मियांचे पवित्र धर्म ग्रंथ ठेवण्यात आले आहेत. पाचव्या दिवशी मिरवणुकीने येथील गणेशमूर्तीचे विसर्जन केले जाते .

SL/ML/SL

4 Sept 2024

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *