भारतात गुंतवणुकीच्या अनेक संधी

 भारतात गुंतवणुकीच्या अनेक संधी

नवी दिल्ली, दि.18 (एमएमसी न्यूज नेटवर्क): वॉशिंग्टन डीसीमध्ये जागतिक उद्योग जगतातील दिग्गजांना संबोधित करताना अर्थमंत्री निर्मला सीतारामन (Nirmala Sitaraman) यांनी सांगितले की जागतिक पुरवठा साखळीची नव्या पद्धतीने रचना केली जात आहे. सर्व गुंतवणूकदार आणि उद्योगांच्या भागधारकांसाठी भारतात (India) गुंतवणुकीच्या प्रचंड संधी आहेत.
अर्थमंत्री जागतिक बँक आणि आंतरराष्ट्रीय नाणेनिधीच्या वार्षिक बैठकीला उपस्थित होत्या. उद्योग मंडळ फिक्की आणि अमेरिका-भारत धोरणात्मक मंचाने आयोजित केलेल्या गोलमेज परिषदेत त्यांनी जागतिक उद्योग दिग्गजांना संबोधित केले.
निर्मला सीतारामन (Nirmala Sitaraman) यांनी सांगितले की, जागतिक पुरवठा साखळीचे पुनर्नियोजन आणि भारताच्या (India) स्पष्ट भूमिका घेणार्‍या नेतृत्वामुळे सर्व गुंतवणूकदार आणि उद्योग भागधारकांसाठी देशात प्रचंड संधी आहेत. भारतातील स्टार्टअप कंपन्या खूप वेगाने वाढल्या आहेत आणि आता त्यापैकी अनेक भांडवली बाजारातून निधी उभारत आहेत. याच वर्षी सुमारे 16 स्टार्टअप्स युनिकॉर्न क्लबमध्ये सामील झाले आहेत.
भारताने (India) आव्हानात्मक काळातही डिजिटलायझेशनचा पुरेपूर फायदा घेतला आहे. अर्थ मंत्रालयाने निर्मला सीतारामन (Nirmala Sitaraman) यांचा संदर्भ देत ट्विट केले आहे की, आर्थिक क्षेत्रातील तंत्रज्ञानामुळे आर्थिक समावेशनाला प्रोत्साहन मिळत आहे. आर्थिक तंत्रज्ञान कंपन्या यामध्ये महत्वाची भूमिका बजावत आहेत.
निर्मला सीतारामन (Nirmala Sitaraman) यांनी शनिवारी मास्टरकार्डचे कार्यकारी अध्यक्ष अजय बंगा आणि मास्टरकार्डचे मुख्य कार्यकारी अधिकारी मायकल मेबॅक, फेडएक्स कॉर्पोरेशनचे अध्यक्ष आणि मुख्य कार्यकारी अधिकारी राज सुब्रमण्यम, सिटी़च्या मुख्य कार्यकारी अधिकारी जेन फ्रेझर आणि आयबीएमचे अध्यक्ष आणि मुख्य कार्यकारी अधिकारी अरविंद कृष्णा, प्रूडेंशियल फायनान्स इंकचे आंतरराष्ट्रीय व्यवसायाचे प्रमुख स्कॉट स्लीस्टर आणिलेगाटमचे मुख्य गुंतवणूक अधिकारी फिलिप वासिलिओ यांचीही भेट घेतली.
बंगा यांनी बैठकीनंतर सांगितले की, भारत सतत सुधारणांमुळे मजबूत मार्गावर आहे. विशेष करुन उत्पादन आधारित प्रोत्साहन (पीएलआय) योजनेने ते विशेष प्रभावित झाले आहेत. मेबॅक यांनी सांगितले की, मास्टरकार्ड भारतात गुंतवणूक सुरु ठेवेल. सुब्रमण्यम यांनी सांगितले की, भारतात (India) फेडएक्सचा व्यवसाय खूप वेगाने वाढत आहे. भारताबद्दल ते खूप उत्सुक आहोत. त्यांच्याकडे जागतिक हवाई नेटवर्क आहे या वस्तुस्थितीमुळे भारतात गरज असेल तेव्हा ते कोविड-19 संबंधी साहित्य पोहोचवू शकतात.
Addressing global industry giants in Washington DC, Finance Minister Nirmala Sitharaman said the global supply chain is being redesigned. There are huge investment opportunities in India for all investors and industry stakeholders.
PL/KA/PL/18 OCT 2021
 

mmc

Related post