मुस्लिम जोडप्याने मुलीचे नाव ठेवलं ‘महालक्ष्मी’

 मुस्लिम जोडप्याने मुलीचे नाव ठेवलं ‘महालक्ष्मी’

मुंबई, दि. ११ (एमएमसी न्यूज नेटवर्क) :मीरा रोड येथील 31 वर्षीय महिला फातिमा खातून यांनी त्यांच्या नवजात मुलीचे नाव महालक्ष्मी ठेवलं आहे. मुस्लिम असूनही हिंदू देवीचे नाव मुलीला ठेवल्याने या दाम्पत्याची चांगलीच चर्चा रंगली आहे. या नामकरणामागचे कारणही रंजक आहे. फातिमा खातून यांनी 6 जून रोजी मुलीला जन्म दिला. जेव्हा त्यांना प्रसूती कळा येऊ लागल्या तेव्हा त्या कोल्हापूर-मुंबई महालक्ष्मी एक्स्प्रेसने प्रवास करत होत्या. ट्रेनने लोणावळा स्थानक मागे टाकताच त्यांना प्रसूती वेदना सुरू झाल्या. त्यानंतर ट्रेनमध्ये असलेल्या नागरिकांनीच त्यांनी प्रसूती केली. फातिमा आणि त्यांचे पती तैयब यांना ट्रेनचा हा प्रवास नेहमी अविस्मरणीय राहिलं. फातिमा आणि तैयब म्हणतात की, ट्रेनमध्ये असलेल्या प्रवाशांनी त्यांच्या मुलीला पाहिलं तेव्हा त्यांनी ती देवीस्वरुप वाटली त्यामुळं त्यांनी तिचं नाव महालक्ष्मी ठेवलं.

फातिमा यांना डॉक्टरांनी डिलिव्हरीची तारीख 20 जून दिली होती. यांचे कुटुंबिय मुंबई येथे राहतात. त्यामुळं ते लोक कोल्हापूरवरुन मुंबईला डिलिव्हरीसाठी जात होते. 6 जून रोजी त्यांनी कोल्हापुर ते मुंबईपर्यंतच ट्रेनचे तिकिट बुक केले होते. मात्र, ट्रेनचे इंजिन फेल झाल्यामुळं ट्रेन लोणावळा येथे दोन तासांपेक्षा जास्त वेळ थांबली होती. जेव्हा 11 वाजण्याच्या सुमारास ट्रेनच्या इंजिनमध्ये बिघाड झाला. त्यावेळीच फातिमा यांना प्रसुती कळा सुरु झाल्या, सोबतच्या महिला प्रवाशांनी त्यांना धीर दिला, आवश्यक ती मदत केली आणि त्यांनी ट्रेनमध्ये एका गोंडस मुलीला जन्म दिला.

ट्रेनमधील जीआरपीच्या एका कॉन्स्टेबलने तैयब यांना जीआरपी हेल्पलाइनला फोन करण्यास सांगितले तसंच, त्यांना सर्व परिस्थितीबद्दल सांगितले. जेव्हा ट्रेन कर्जत स्थानकात पोहोचली तेव्हा तैयब आणि फातिमा ट्रेनमधून उतरले. कर्जत जीआरपीचे एपीआय मुकेश ढांगे यांनी दिलेल्या माहितीनुसार, आम्ही कर्जत उप-जिल्हा रुग्णालयाला सूचना दिली तेव्हा नर्स शिवांगी साळुंखे आणि कर्मचारी स्थानकात पोहोचले. महिला आणि मुलीला पुढील उपचारांसाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले.

SL/ML/SL

11 June 2024

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *