कोयना धरण परिसरात भूकंपाचा सौम्य धक्का

चिपळूण, दि. १७ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : महाराष्ट्राची भाग्यलक्ष्मी समजल्या जाणाऱ्या कोयना धरण परिसरातील कोयनानगर व पोफळी या गावांना बुधवार, दि. 17 रोजी भूकंपाचा सौम्य धक्का जाणवला. प्राथमिक माहितीनुसार हा भूकंपाचा धक्का दुपारी 3:26 मिनिटांनी जाणवला. त्याची तीव्रता 2. 8 रिश्टर स्केल होती. भूकंपाचा केंद्रबिंदू हा हेळवाक गावाच्या पश्चिमेला 10 किलोमीटर आणि 15 किलोमीटर खोल असल्याची माहिती कोयना धरण प्रशासनाकडून देण्यात आली. MEQ-800 या उपकरणात भूकंपाच्या तीव्रतेची नोंद झाली आहे. या भूकंपामुळे कोयना धरणाला कोणताही धोका नसल्याचे सांगण्यात आले.
SL/ML/SL
17 July 2024