मनोरमा खेडकर अखेर पोलिसांच्या ताब्यात

पुणे, दि. १८ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : वादग्रस्त प्रशिक्षणार्थी आयएएस पूजा खेडकरची आई मनोरमा खेडकर यांनी अखेर पुणे ग्रामीण पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. पौंड पोलिसांनी मनोरमाला रायगडमधून ताब्यात घेतले आहे. बंदूक रोखून एका शेतकऱ्याला धमकवल्याच्या आरोपासह इतर तक्रारी देखील मनोरमावर आहेत. याप्रकरणी पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल झाला होता. तेव्हापासून मनोरमा आणि त्यांचे पती गायब होते.
आयएएस पूजा खेडकर हे प्रकरण गाजत असताना एक व्हिडिओ व्हायरल झाला होता. यामध्ये पूजा खेडकरची आई मनोरमा खेडकर मुळशीमध्ये एका शेतकऱ्याला धमकावत असल्याचे दिसले होते. यावेळी त्यांच्या हातात पिस्तूल दिसत होती. सोशल मीडियावर हा व्हिडिओ व्हायरल झाला होता.
त्यानंतर शेतकऱ्याच्या तक्रारीवरून याप्रकरणी मनोरमा आणि पती दिलीप खेडकर यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. पोलीस या दोघांच्या शोधात होते. गेले अनेक दिवस पोलिसांनी चौकशीसाठी बोलवून ही ते दोघे समोर येत नव्हते , त्यांच्या बाणेर येथील बंगल्यावर चौकशीसाठी गेलेल्या पोलिसांवर दादागिरी केल्याचा आणि पुणे मेट्रोला अडथळा निर्माण केल्याचा आरोप ही त्यांच्यावर आहे.
ML/ML/SL
18 July 2024