राज्य शासन मराठा समाजाची दिशाभूल करत आहे, जन जागृती यात्रा काढणार रमेश केरे पाटील

 राज्य शासन मराठा समाजाची दिशाभूल करत आहे, जन जागृती यात्रा काढणार रमेश केरे पाटील

मुंबई, DI 24
राज्य शासन मराठा आरक्षणा बाबत समाजाची दिशाभूल करत असुन डिसेंबर पासून मराठवाड्‌यात आरक्षण जनजागृती यात्रा काढण्याची घोषणा मराठा क्रांती मोर्चा आणि मराठा ठोक मोर्चाच्या वतीने नानासाहेब जावळे पाटील आणि रमेश केरे पाटील यांनी मुंबई मराठी पत्रकार संघ येथे आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत घोषणा केली.

आरक्षण जनजागृती यात्रेची सुरुवात तुळजापूर येथून होणार असुन या जनजागृती यात्रेचा समारोप कायगाव ता. गंगापूर जिल्हा छत्रपती संभाजी नगर येथे होणार आहे.

१६ नोव्हेंबर २०२६ रोजी छत्रपती संभाजीनगर येथे राज्य स्तरीय मराठा आरक्षण मंथन परिषदेचे आयोजन करण्यात आले होते त्या मध्ये कायदेशीर घटनात्मक व शास्वत आरक्षण कसे मिळेल या वर सविस्तर चर्चा झाली होती. निमंत्रितांच्या राज्यस्तरीय ‘मराठा आरक्षण मंथन परिषदेत मराठा आरक्षणाचा प्रश्न अ‌द्यापही प्रलंबित असून, सरकारच्या निर्णयां मुळे समाजाची दिशाभूल होत असल्याचा आरोप मराठा आरक्षण परिषदेत झाला होता. हैद्राबाद गॅझेटिअर, एसईबीसी आरक्षण आणि कुणबी प्रमाणपत्रा बाबत सरकारने ठोस निर्णय घेतलेला नाही.

मुख्यमंत्री आणि आरक्षण उपसमिती च्या अध्यक्षांनी मराठा समाजाची फसवणूक केली आहे. एकूणच आरक्षणाची न्यायालयातील सद्य स्थिती मधील बारकावे आणि सर्वोच्च न्यायालय, घटना पीठाने केलेल्या विविध न्याय निवड्‌यांचे पॉवर पॉइंट प्रेझेंटेशन न्यायालयातील मुख्य हस्तक्षेप याचिकाकर्ते व जेष्ठ अभ्यासक डॉ राजेंद्र दाते पाटील यांनी अंत्यन्त अभ्यासु असे सादरीकरण करून १२३ पेक्षा जास्त न्यायनिवाडे एस ई बी सी आरक्षण प्रकारणाची दिशा बदलू शकतात. त्यावर राज्य शासनाने अंत्यन्त गांभीर्याने कार्यरत रहावे म्हणून हे सुधारीत असे पॉवर पॉइंट प्रेझेंटेशनचे सादरीकरण मुख्यमंत्री आणि लॉ विभागाने पहावे अशी एकमुखी मागणी आज परत एकदा करण्यात येत असल्याचे माहिती मराठा क्रांती मोर्चा आणि मराठा ठोक मोर्चाच्या वतीने नानासाहेब जावळे आणि रमेश केरे पाटील यांनी भरगच्च पत्रकार परिषदेत दिली.
केजी ते पीजी पर्यंत मराठासमाजाला ओबीसी सारख्या सवलती साठी जी आर मध्ये दुरुस्ती आवश्यक असुन, मराठा समाजाला ओबीसी सारख्या सर्व सवलती के.जी. ते पी.जी. लेव्हल पर्यंत देतांना तांत्रिक, अतांत्रिक, वैद्यकीय शिक्षण, नोकरीतील नियुक्त्या बढती आदी सर्व सवलती लागु करून खाजगी वि‌द्यापीठ, डिम्ड युनिवार्सिटी मध्ये सुद्धा ओ.बी.सी सारख्या सवलती द्याव्यात,

त्यांच्या सगळ्या वेब पोर्टल अप डेट कराव्यात, वैद्यकीय व तंत्र शिक्षण प्रवेश घेतांना प्रवेश शुल्क घेतल्या शिवाय वि‌द्यार्थी वर्गाचे चे प्रवेश निश्चित होतं नाहीत म्हणुन शासनाने परस्पर हे शुल्क मागु नये असे आदेश काढावेत, ओबीसी सारख्या सवलती देतांना या मध्ये वयाची अट शिथिलता तर ‌द्यावीच परंतु ओबीसी आणि मराठा समाजातील निर्माण झालेली स्थिती कायम स्वरूपी मिटवण्या साठी “अराजकीय आरक्षण” हा शब्द आणि वरील प्रमाणे दुरुस्ती करणारा सुधारीत शासनादेश तात्काळ निर्गमित करावे ही सुद्धा अंत्यन्त महत्वाची गेली एक दशका पासूनची मागणी असुन याच सोबत कोपर्डी प्रकारणांतील आरोपी विरुद्ध तात्काळ कारवाई होण्यासाठी गतिमान न्यायालयीन त्रुटी तात्काळ दुर करून न्याय द्यावा. सारथीला पाच हजार कोटींचा निधी तर स्व. आण्णासाहेब पाटील महामंडळास दहा हजार कोटी निधी, रखडलेल्या नियुक्त्या, आंदोलन काळा तील गुन्हे वापस घेणे आदी मागण्या सविस्तर पणे मांडल्या.
या पत्रकार परिषदेला नानासाहेब जावळे पाटील, रमेश केरे पाटील, भिमराव मराठे, गणेश कदमपाटील, राहुल पाटील, लक्ष्मणबापू शिरसाट, विलास मालुसरे, मनोज पवार पाटील, उध्दव मडके पाटील, मच्छिंद्र चिंचोले, अनिल सोळूके पाटील, मोती भाऊ वाघ, संतोष कुसेकर पाटील, अनिल केरे पाटील, धनंजय चिरेकर पाटील, अनिल कुंटे पाटील, बंडू मात्रे पाटील, मारुती पाटील, राजेंद्र वेताळ पाटील, प्रताप पवार पाटील, कल्याणराव काजूणे पाटील, एकनाथराव मराठे पाटील, सुरज साबळे. KK/ML/MS

Milind

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *