FDA ने रद्द केला Inducare Pharma कंपनीचा परवाना

 FDA ने रद्द केला Inducare Pharma कंपनीचा परवाना

पुणे, दि. २४ : पुण्यातील Inducare-pharmaceutical कंपनीवर FDA कडून मोठी कारवाई करण्यात आली आहे. कंपनीची 9 औषधं अप्रमाणित आणि बनावट असल्याचं समोर आलं आहे. FDA कडून कंपनीचा औषध उत्पादन परवाना रद्द करण्यात आला आहे. पिंपरी चिंचवडच्या वायसीएम रुग्णालयातून इंडुकेअरचा 1.72 कोटींचा औषध साठा जप्त करण्यात आला आहे. परवानगीशिवाय 9 औषधांचे उत्पादन आणि विक्री केल्याप्रकरणात ही कारवाई करण्यात आली आहे. इंडुकेअरची सर्व 9 औषधं अप्रमाणित आणि बनावट असल्याचं उघड झालं आहे.

दरम्यान सप्टेंबर 2026 मध्ये देखील 25 गंभीर त्रुटींमुळे ‘इंडुकेअर फार्मास्युटिकल’ कंपनीचा परवाना रद्द करण्यात आला होता. आता ही दुसरी वेळ आहे. आता दुसऱ्यांदा ‘इंडुकेअर फार्मास्युटिकल’ कंपनीचा औषध उत्पादन परवाना पुन्हा एकदा रद्द करण्यात आला आहे.

SL/ML/SL

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *